• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • कुरकुरीत कीडे, चॉकलेटमधील टोळ, मीलवर्मचा पास्ता...; Insect food ला अन्न सुरक्षा संस्थेचीही मंजुरी

कुरकुरीत कीडे, चॉकलेटमधील टोळ, मीलवर्मचा पास्ता...; Insect food ला अन्न सुरक्षा संस्थेचीही मंजुरी

असंतुलित आहार देखील मुरुम होण्याचं कारण आहे. जास्त तेलकट, जंक फूड आणि फास्ट फूड खाल्ल्याने पाठीवर मुरुम येऊ लागतात.

असंतुलित आहार देखील मुरुम होण्याचं कारण आहे. जास्त तेलकट, जंक फूड आणि फास्ट फूड खाल्ल्याने पाठीवर मुरुम येऊ लागतात.

कीड्यांच्या डिशचा आस्वाद घेण्यासाठी दूरहून लोक या रेस्टॉरंटमध्ये येतात.

 • Share this:
  पॅरिस, 01 जून : आपण बोंबिल, पापलेट, बांगडा, कोलंबी असं नॉनव्हेज तर खातच आलो आहोत. पण त्याऐवजी तुम्हाला कुणी कुरकुरीत कीडे, चॉकलेटमधील टोळ, मीलवर्म पास्ता असे कीटकयुक्त पदार्थ (Food with insects) दिले तर... सध्या फ्रान्समधील एका रेस्टॉरंटमध्ये अशाच काही डिश (Insects food) खायला मिळत आहे. विशेष म्हणजे असे कीडे-कीटक खायला  युरोपियन अन्न सुरक्षा संस्थेनंही (EFSA) मंजुरी दिलेली आहे. काही दिवसांपूर्वीच केंब्रिज युनिव्हर्सिटीट्या एका संशोधनात भविष्यात लोकांसमोर खाण्याचं संकट निर्माण होईल आणि लोक तेव्हा कीटक-कीडे खायला सुरुवात करतील असं सांगितलं होतं.  दरम्यान फ्रान्समध्ये भविष्यातील अशा कीटकयुक्त अन्नपदार्थांचा प्रयोग आतापासूनच सुरू झाला आहे. फ्रान्समधील एका रेस्टॉरंटमध्ये कीडे-कीटक यांच्यापासून तयार केलेल्या डिश दिल्या जात आहेत. शेफ लॉरेंट वियतनेआपल्या टेस्टिंग मेन्यूमध्ये कीड्यांपासून तयार केलेल्या डिशचा समावेश केला आहे. वियत यांच्या मेन्यू कार्डमध्ये प्रॉन सलाड, पिवळे मीलवर्म, भाज्या यांच्यासह कुरकुरीत कीडे आणि चॉकलेटमधील टोळ यांचाही समावेश आहे. हे वाचा - एका छोट्याशा पक्ष्याला वाचवण्यासाठी शार्कजवळ गेला आणि...; समुद्रातील थरारक VIDEO वियत मीलवर्मची निर्मिती करतात. त्यांना ओट्स, भाज्या देतात. मीलवर्म दिसायला खूप विचित्र असतात पण त्यांच्यामध्ये प्रोटिन, फॅट आणि फाइबर भरपूर असतो. करी किंवा सलाडमध्ये अख्खे टाकून खाऊ शकता किंवा पास्ता, बिस्कीट किंवा ब्रेडसाठी वापरल्या जाणारं पीठ तुम्ही यापासून बनवू शकता. वियत यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं की, पहिल्यांदाचा खाणाऱ्यांसाठी हे आदर्श असं व्यंजन आहे. या लोकांना मीलवर्मच्या पिठापासून बनलेला पास्ता आणि हल्के फ्राय केलेले कीट कीट लार्व्हा दिले जात आहेत. यापैकी काहींचं चव खूपच उत्तम आहे. अनेकांना ही आवडत आहे. वियतच्या या विचित्र डिशचा आनंद घेण्यासाठी दूरदूरहून लोक येत आहेत आणि कीड्यांपासून बनवलेल्या या डिशचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत. वियतच्या रेस्टॉरंटमध्ये सोहेल अयारी आपल्या दोन मुलींसोबत जेवण करायला आले. त्यांनी सांगितलं. मला असं वाटलं की मी एका पारंपारिक रेस्टॉरंटमझ्ये आहे आणि मी जे काही खात आहे, ते वेगळंच आहे. प्रामाणिकपणे सांगतो, की याची चव दररोजच्या अन्नपदार्थांसारखीच आहे.  तर अयारी यांच्या छोट्या मुलीने सांगितलं, ही पर्यावरणासाठी अनुकूल आहे. यापेक्षा अधिक आणखी काय हवं, हे चांगलं आहे. हे वाचा - तुम्ही बनावट तूप तर खात नाही ना? अशी ओळखा तुपातील भेसळ जानेवारीत युरोपियन अन्न सुरक्षा संस्थेनंही (EFSA) मीलवर्म कीडे माणसांच्या खाण्यासाठी उपयुक्त मानले होते. मेमध्ये बाजारात यांच्या विक्रीलाही परवानगी देण्यात आली.  मीलवर्मसह आणखी काही कीड सामान्यपणे भविष्यात एक लो कार्बन फूड सोर्स होईल. युरोपियन आयोगाच्या आरोग्य आणि अन्न सुरक्षा प्रवक्ते स्टीफन डी कीर्समाइकर यांनी सांगितलं, कीड पौष्टीक असतात. हे आपल्याला जास्त हेल्दी आणि एक निश्चित आहाराकडे जाण्यास मदत करू शकतात.
  Published by:Priya Lad
  First published: