मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

चष्म्यापासून लवकर मुक्तता हवी; आहारात समाविष्ट करा फक्त हे 5 पदार्थ

चष्म्यापासून लवकर मुक्तता हवी; आहारात समाविष्ट करा फक्त हे 5 पदार्थ

डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आहारही महत्त्वाचा आहे.

डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आहारही महत्त्वाचा आहे.

डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आहारही महत्त्वाचा आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 31 ऑगस्ट :  सध्या अगदी कमी वयातच चष्मा लागतो. मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही यांच्या वापराचं वाढतं प्रमाण, अभ्यास आणि कामाचा ताण याचा परिणाम डोळ्यांवर (Eye problem) होतो आणि डोळ्यांची नजर (Eye health) कमजोर होऊ लागते. परिणाम चष्मा लावण्याची वेळ ओढावते. बहुतेकांना चष्मा लावायला आवडत नाही. तुम्हालाही चष्मा लावायचा कंटाळा येत असेल आणि यापासून लवकरात लवकर सुटका हवी असेल तर आहारतही (Food for eye) बदल महत्त्वाचा आहे.

डोळे हा आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील भाग आहे. दैनंदिन आयुष्यात डोळ्यांचे आरोग्य राखणे फार गरजेचे असते. हल्लीच्या काळात मोबाईल आणि वर्क फ्रॉम होममुळे डोळ्यांवर याचा विपरीत परिणाम होतो आहे. डोळे निरोगी राहावेत, डोळ्यांची दृष्टी वाढावी यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा जाणून घेऊयात.

आवळा - आवळा हे फळ डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. आवळा हे उपाशीपोटी घेतले तर याचा फायदा डोळ्यांच्या स्पष्टतेवर होत असतो. विशेष म्हणजे आवळ्यात सी जीवनसत्व असल्याने हे फक्त डोळ्यांसाठीच नाही तर निरोगी केसांनाही उपयुक्त ठरतो त्यामुळे आवळ्याचे दोन्ही फायदे होतात.

गाजर - गाजर हे डोळ्यांच्या आयुष्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे. ते डोळ्याला निरोगी आणि डोळ्यातून स्पष्ट दिसण्यास मदत करते. गाजरमध्ये बीटा कॅराटीन आणि ए जिवनसत्व असल्याने डोळ्यांबरोबरच ते त्वचेलाही कोमल बनवतं.

हे वाचा - OMG! फक्त एक Hot Dog सुद्धा लाइफवर भारी; कमी करतोय तुमच्या आयुष्याची 36 मिनिटं

हिरव्या भाज्या - निरोगी शरिरासाठी हिरव्या भाज्या प्रचंड उपयोगी ठरतात. पालेभाज्यांमध्ये जेक्सैथीन असते. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी पालेभाज्या या नियमित आहारात असायला हव्या. यामध्ये आयरन भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांबरोबरच शरिरासाठी ते फायदेशीर आहे.

मासे - मासे जरी मांसाहारी असले तरी त्यामध्ये वैद्यकीय गुण असतात. माशांमध्ये टूना, साल्मन, एंकोवी आणि ट्राऊट या जातीतील मासे आहारात आले तर याचा फायदा डोळ्यांसाठी होतो.रेटिनामध्ये असणाऱ्या डीएचए या फॅटी अॅसिडचे हे नैसर्गिक स्रोत आहेत.  त्याचबरोबर मासे खाल्ल्याने शरिराला अनेक फायदे होतात.

हे वाचा - Personality Development Tips: इतरांशी महत्त्वाचं बोलताना कधीही करू नका 'या' चुका

बदाम - बदाममध्ये ई जीवनसत्त्व असल्यामुळे त्यामुळे डोळ्यांचा प्रकाश वाढायला मदत होते. एका अभ्यासानुसार बदामात असलेल्या जीवनसत्त्व ई हा मैकुलर डिजनरेशनला कमी करण्यात मदत करतो. ज्याचा फायदा डोळ्यांना निरोगी ठेवण्यात होतो.

First published:

Tags: Eyes damage, Health, Lifestyle