मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

या पाच सवयींमुळे लोक होतात श्रीमंत? व्यक्तिमत्त्वावर ठरते आर्थिक झेप

या पाच सवयींमुळे लोक होतात श्रीमंत? व्यक्तिमत्त्वावर ठरते आर्थिक झेप

एखादी व्यक्ती ही केवळ त्याच्या कृतीमुळे नव्हे, तर त्याचं व्यक्तीमत्त्व आणि सवयी यामुळे श्रीमंत होत असल्याचं विज्ञानानं सिद्ध केलं आहे. जगात श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींच्या सवयी या इतरांपेक्षा काहीशा वेगळ्या असतात

एखादी व्यक्ती ही केवळ त्याच्या कृतीमुळे नव्हे, तर त्याचं व्यक्तीमत्त्व आणि सवयी यामुळे श्रीमंत होत असल्याचं विज्ञानानं सिद्ध केलं आहे. जगात श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींच्या सवयी या इतरांपेक्षा काहीशा वेगळ्या असतात

एखादी व्यक्ती ही केवळ त्याच्या कृतीमुळे नव्हे, तर त्याचं व्यक्तीमत्त्व आणि सवयी यामुळे श्रीमंत होत असल्याचं विज्ञानानं सिद्ध केलं आहे. जगात श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींच्या सवयी या इतरांपेक्षा काहीशा वेगळ्या असतात

  • Published by:  desk news

श्रीमंती (Richness) म्हणजे गरजा (wants) पूर्ण होणं नव्हे, तर गरजा कमी असणं, असं प्रसिद्ध तत्त्ववेत्ता एपिक्टसनं म्हटलंय. मात्र प्रत्यक्षात यशाचा संबंध नेहमीच श्रीमंतीशी लावला जातो. किंबहूना एखादी व्यक्ती यशस्वी आहे की नाही, याचं मोजमाप करताना त्याच्याकडे असणारा पैसा आणि इतर मालमत्ता यांचाच प्राधान्याने विचार केला जातो.

एखादी व्यक्ती ही केवळ त्याच्या कृतीमुळे नव्हे, तर त्याचं व्यक्तीमत्त्व आणि सवयी यामुळे श्रीमंत होत असल्याचं विज्ञानानं सिद्ध केलं आहे. जगात श्रीमंत असणाऱ्या व्यक्तींच्या सवयी या इतरांपेक्षा काहीशा (Different habits) वेगळ्या असतात. या सवयीच त्यांना श्रीमंत बनवतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवून देत राहत असल्याचं सिद्ध झालं आहे. ‘ब्रिटीश जर्नल ऑफ सायकॉलॉजी’मध्ये 2008 साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधानुसार जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये मुख्यत्वे 5 वैशिष्ट्य (personality traits) असल्याचं दिसून आलं आहे.

पहिली सवय – संवादाचं कौशल्य

जगातील बहुतांश श्रीमंत व्यक्ती या बहिर्मुख (Extrovert) असतात. अर्थात, हे साहजिकच आहे. जगात कुणीच केवळ एकट्याच्या जिवावर फार मोठा पल्ला गाठू शकत नाही. आपल्या आजूबाजूच्या उत्तमोत्तम लोकांसोबत संबंध प्रस्थापित करणे, ते टिकवून ठेवणे आणि त्यांच्या योग्य प्रकारे उपयोग करून घेणे, ही कला श्रीमंत होणाऱ्या व्यक्तींना अवगत असते. अर्थात, अंतर्मुख व्यक्ती (Introvert) यशस्वी होऊ शकत नाही, असं नव्हे. पण श्रीमंत होण्याच्या प्रक्रियेत बहिर्मुख लोक अधिक दिसतात.

दुसरी सवय – धोरणात्मकता

श्रीमंत व्यक्ती या सगळ्याच बाबतीत धोरणी आणि चोखंदळ असतात. परिस्थिती बघून योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. आपल्याला काय आवडतं, यापेक्षा या क्षणी काय गरजेचं आहे, त्याचा विचार करून ही मंडळी आपलं धोरण आखतात. किंबहूना, आपला वैवाहिक जोडीदारही ही मंडळी विचारपूर्वक निवडतात. अर्थात, याचा अर्थ पैसे कमावणारी किंवा श्रीमंत घरातील जोडीदार निवडतात, असा बिलकल नाही. तर आपल्याशी ज्याचं पटेल आणि आयुष्यभर आपलं मनस्वास्थ्य उत्तम राहिल, अशा जोडीदाराची ते निवड करतात. याचा दोघांनाही फायदा होतो आणि त्यांचा संसार सुखाचा झाल्यामुळे ते त्यांच्या कामात अधिक यशस्वी होतात.

तिसरी सवय – मानसिक स्वास्थ्य

श्रीमंत व्यक्ती या मनाने खंबीर असतात. छोट्या मोठ्या संकटांने ते खचून जात नाहीत. या व्यक्ती भावूक असल्या तरी भावनेच्या भरात कुठलाही निर्णय न घेण्याची कला त्यांनी अवगत केलेली असते.

हे वाचा -संध्याकाळच्या चहाआधी हे वाचा! ‘या’ इंचभर पदार्थाने होतं वजन कमी, कसा वापरायचा?

चौथी सवय – उतावीळपणाला आवर

श्रीमंत व्यक्ती नकारात्मक प्रसंगातही उतावीळ होत नाहीत. एखादी न आवडणारी किंवा पटणारी गोष्ट घडली, तरी लगेच त्यावर रिऍक्ट होणं त्या टाळू शकतात. हुरहूर, निराशा, राग या भावनांना ते आवर घालू शकत असल्यामुळे या व्यक्ती इतरांना धीरोदात्त वाटतात. अशा भावनांना आवर घालता न आल्याचं मोठं नुकसान सर्वसामान्य माणसांना होत असतं.

पाचवी सवय – आत्मकेंद्री वृत्ती

खरं तर आत्मकेंद्री असणं ही वाईट सवय आहे, असं मानलं जातं. या आत्मकेंद्रीपणाचा संबंध प्रगतीशी आहे. एखादं काम टीम वर्कशिवाय होऊ शकणार नाही, याची जाणीव त्यांना असते. त्यामुळे ते टीमवर्कला नेहमी महत्त्व देतात आणि इतरांना प्रोत्साहन देत त्यांच्या प्रगतीला हातभारच लावतात. मात्र त्यामागे त्यांचा हेतू हा सर्वांनी मिळून यशस्वी होण्याचा असतो. त्यांच्या यशस्वी होण्याच्या प्रक्रियेची गरज म्हणून त्यांच्यासोबतची बहुतांश माणसं ही यशस्वी होत राहतात.

हे वाचा -अरे यांना आवरा! सप्तपदी घेताना नवरा-नवरीचा प्रताप; Video पाहून नेटिझन्स शॉक

निराश होऊ नका

या पाचपैकी एकही सवय आपली नाही, असं अनेकांना वाटू शकतं आणि आपलं व्यक्तीमत्त्व बदलावं, असा विचारही अनेकजण करू शकतात. पण थांबा. व्यक्तीमत्त्व बदलून काहीही फायदा होणार नसल्याचंही विज्ञानानं सिद्ध कंल आहे. व्यक्तीमत्त्व बदलण्यापेक्षा एकेक सवय बदलून पाहा, असा सल्लाही मानसतज्ज्ञ देतात. उदाहरणार्थ, तुम्हाला इतरांशी फार बोलायला आवडत नसेल, तरी दिवसातून एकदा जाणीवपूर्वक आणि कामाची गरज म्हणून बोला. कदाचित, त्याचा तुम्हाला फायदा झाला तर हळूहळू ती सवय तुमच्या अंगी बाणवली जाईल.

थोडक्यात, हळूहळू आपली एकएक सवय बदलत व्यक्तीमत्त्व विकासाचा मोठा पल्ला पार करता येऊ शकतो, हे आतापर्यंतच्या अभ्यासातून समोर आलं आहे.

First published:

Tags: Personal life, Rich World