Home /News /lifestyle /

Shocking! घामापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी ऑपरेशन केलं आणि फिटनेस मॉडेलने गमावला जीव

Shocking! घामापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी ऑपरेशन केलं आणि फिटनेस मॉडेलने गमावला जीव

घामापासून कायमची सुटका मिळवण्याचं ऑपरेशन मॉडेलच्या जीवावर बेतलं.

    मेक्सिको सिटी, 15 जुलै : घामाचा (Sweat) कंटाळा कुणाला येत नाही. प्रत्येकाला घाम नकोसाचा वाटतो. काही जणांना तर इतका घाम येतो की त्यापासूनच कायमचीच मुक्ती मिळाली तर बरं होईल, असंच अनेकांना वाटतं. अशा घामाला वैतागलेल्या एका मॉडेलनं त्यापासून कायमची सुटका व्हावी म्हणून ऑपरेशन केलं (Fitness model died after sweating operation). पण घामापासून सुटका मिळवण्याच्या नादात तिने आपला जीव गमावला आहे. 23 वर्षांची फिटनेस मॉडेल ओडालिस मेना (Odalis Mena). एक प्रसिद्ध मेक्सिन फिटनेस इन्फ्लुएंसर (Mexican fitness influencer) आणि बॉडी बिल्डर (Bodybuilder) होती. सोशल मीडियावर ती खूपच फेमस होती. घामापासून सुटका मिळवण्यासाठी तिने ऑपरेशन केलं आणि तिचा मृत्यू झाला. हे वाचा - OMG! शिजवायला गेली अंडं पोळून निघाला चेहरा; ऑनलाईन रेसिपी फंडा पडला महागात रिपोर्टनुसार ग्वाडलजारात स्किनपील क्लिनिकमार्फत मिराड्राई या अँटीपर्सपिरंट उपचारासाठी भरती झाली होती. तिथं तिचं ऑपरेशन करण्यात आलं. या प्रक्रियेत घामाच्या ग्रंथीं हिट एनर्जी प्रक्रियेनं हटवण्यासाठी ऑपरेशन केलं जातं. या ऑपरेशननंतर ओडालिसच्या काखेत घाम येणं बंद झालं. घाम येत नसल्याने तिथून दुर्गंधही येत नव्हता शिवाय तिच्या काखेतील केसही कमी झाले. सोशल मीडियावर मेनाने अँटीपर्सपिरंट उपचारानंतर कोणताही घाम येत नाही. हा सुरक्षित आणि प्रभावी असा उपचार असल्याचाही दावा केला होता. पण या उपचारानंतर ओडालिसचा मृत्यू झाला. सुरुवातीला याचे चांगले परिणाम दिसले पण नंतर भयंकर परिणामांना ओडालिसला सामोरं जावं लागलं.एनेस्थेटाइज केल्यानंतर तिला कार्डिएक अरेस्ट आला. क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांनी तिला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही. ओडालिसचा मृत्यू झाला. हे वाचा - बाईक चालवण्याची हौस तरुणीला पडली भारी! स्कूटी सोडून थेट बुलेटवरच बसली आणि... द न्यूयॉर्क पोस्टच्या पोलिसांनी तपास केला असता प्राथमिक अहवालानुसार मॉडेलचा मृत्यू एनेस्थिशियासंबंधीच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचं समोर आलं आहे. एनेस्थेसिओलॉजिस्ट फार प्रशिक्षित नसल्याचं सांगितलं जातं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Fitness, Health, Lifestyle, Mexico, Operation, Surgery

    पुढील बातम्या