जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मे महिन्याचा पहिला आठवडा या राशींसाठी आहे भाग्यवान; रखडलेली काम मार्गी लागतील

मे महिन्याचा पहिला आठवडा या राशींसाठी आहे भाग्यवान; रखडलेली काम मार्गी लागतील

मे महिन्याचा पहिला आठवडा या राशींसाठी आहे भाग्यवान; रखडलेली काम मार्गी लागतील

ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींसाठी येणारा आठवडा खूप शुभ असणार आहे. जाणून घेऊया येत्या आठवड्यात कोणत्या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 मे : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींना विशेष महत्त्व आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींचा सर्व 12 राशींवर प्रभाव पडतो. ग्रहांच्या चालीमुळे काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ परिणाम मिळतात. साप्ताहिक कुंडली ग्रहांच्या हालचालीवरून काढली जाते. ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींसाठी येणारा आठवडा खूप शुभ असणार आहे. जाणून घेऊया येत्या आठवड्यात कोणत्या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. याबाबत हिंदुस्थान टाईम्स ने बातमी दिली आहे. मेष - सकारात्मक गोष्टींकडे मन लावा, यश मिळेल. करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात प्रेमप्रकरणात वेळ वाया घालवू नका. प्रेमात निराशा येऊ शकते. हा महिना बेरोजगारांसाठी त्रासदायक ठरला, तर विद्यार्थ्यांसाठी कष्टाचा ठरेल. वृश्चिक राशी: रोगांपासून मुक्ती मिळू शकते. कौटुंबिक सुख-सुविधा वाढतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मान-सन्मान वाढेल. या राशीच्या लोकांनी हनुमानाची पूजा केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. मकर : या आठवड्यात काही चांगली बातमी मिळेल. तुम्हाला योग्य वेळ ओळखावी लागेल आणि मग पुढे जावे लागेल. या महिन्यानंतर पैशाची, रोखीची कमतरता भासणार नाही. वैवाहिक जीवन आनंदी राहील. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना यश मिळेल. हे वाचा -  उन्हाळ्यात COOL राहण्यासाठी मलायका अरोरानं सांगितली 3 योगासनं; तुम्हीही करून बघा कुंभ: रखडलेली कामे मार्गी लागतील. काही नवीन कामाची सुरुवातही होऊ शकते. आजूबाजूला यशाचे वातावरण राहील. यासोबतच काळजी घेण्याचीही गरज आहे. घाई करू नका कोणत्याही गोष्टीसाठी खूप प्रयत्न करू नका. हे वाचा -  भूक मंदावण्याचा प्रॉब्लेम उन्हाळ्यात होतोच; हे 5 घरगुती उपाय भूक वाढवतील मूलांक 9- या आठवड्यात तुमचे प्रलंबित पैसे परत मिळू शकतात. फायदा होईल. व्यवहाराचे प्रश्न आधी मिटवा. नोकरीच्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. कलेची आवड वाढेल. व्यवसायासाठी वेळ चांगला आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. (या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात