मुंबई, 24 मार्च : आपल्यापैकी बऱ्याच जणांना चुटकी वाजवायची सवय असते. कधीकधी कोणातरी बोलवण्यासाठी किंवा उगीच स्टाईल मारण्यासाठी हल्ली तरुण मुलं मुली चुटकी वाजवतात. त्यात काही गैर नाही. पण तुम्हाला यामंगचे विज्ञान माहित आहेत का? चुटकी कशी आणि का वाजते? याचा आपल्या परिणाम होतो? हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
का आणि कशी वाजते चुटकी ?
झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या सांध्यामध्ये एक द्रवपदार्थ असतो. यात वायूदेखील भरलेला असतो. जेव्हा आपण चुटकी वाजवतो. तेव्हा सांध्यामधून कार्बन डायऑक्साइडचे फुगे फुटतात आणि वायू बाहेर पडतो. चुटकी वाजवल्यावर याच वायूचा आवाज ऐकू येतो. चुटकी बजावल्याने बोटांच्या स्नायूंना आराम मिळतो. मात्र जास्तवेळा चुटकी बजावल्याने बोटांमध्ये वेदना आणि सूज येऊ शकते. तुमची बोटं काळीदेखील होऊ शकतात.
रिफाइंड तेलाचा अतिरिक्त वापर शरिरासाठी आहे अपायकारक, रोज इतकेच वापरा!
काय होऊ शकतो चुटकी वाजवण्याचा परिणाम
बरीच लोकांना असे वाटते की, चुटकी बजावल्याने सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. मात्र असे होत नाही. चुटकी बजावल्याने केवळ सांध्यातील वायू बाहेर पडतो. मात्र तरीही जास्त प्रमाणात चुटकी वाजवणे आणि बोटांना त्रास देणे चांगले नाही.
Yoga For Women : महिलांनी रोज करावी ही 3 योगासनं, जिमशिवाय मिळेल स्लिम-ट्रिम लूक
चुटकी वाजवणे ही हल्ली फार सामान्य गोष्ट आहे. याचा आपल्या बोटांवर फारसा वाईट परिणाम होत नसला. तरीदेखील याचा अतिरेक आपल्या बोटांचे नुकसान करू शकतो. त्यामुळे चुटकी वाजवा पण काळजीपूर्वक.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle