जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / रिफाइंड तेलाचा अतिरिक्त वापर शरिरासाठी आहे अपायकारक, रोज इतकेच वापरा!

रिफाइंड तेलाचा अतिरिक्त वापर शरिरासाठी आहे अपायकारक, रोज इतकेच वापरा!

एका दिवसात किती प्रमाणात रिफाइंड तेल  शरीरासाठी पुरेसं असतं, याची माहिती घेऊ या.

एका दिवसात किती प्रमाणात रिफाइंड तेल शरीरासाठी पुरेसं असतं, याची माहिती घेऊ या.

एका दिवसात किती प्रमाणात रिफाइंड तेल शरीरासाठी पुरेसं असतं, याची माहिती घेऊ या.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    भजी, वडे, पुऱ्या, कचोऱ्या हे पदार्थ असे आहेत, की ज्यांचं नुसतं नाव घेतलं, तरी तोंडाला पाणी सुटतं. हे किंवा असेच तळलेले, चटपटीत, मसालेदार पदार्थ चवीला एकदम छान लागतं खरं; मात्र त्यांच्या अतिरिक्त सेवनामुळे कोलेस्टेरॉल, हाय बीपी, हृदयविकार आणि यकृताच्या समस्या आदींचा धोका वाढत जातो. ठरावीक प्रमाणात तेल आहारात असणं केवळ चवीसाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही आवश्यक असतं; मात्र त्यांचा अतिरेक वाईट असतो.  अन्न तयार करताना वापरल्या जाणाऱ्या तेलात शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्त्वं तर असतातच; मात्र त्यात फॅट्सदेखील मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळेच आहारातल्या तेलाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणं अत्यावश्यक असतं. खासकरून, रिफाइंड तेलाचा वापर केला जात असेल, तर त्याच्या प्रमाणावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असते. एका दिवसात किती प्रमाणात रिफाइंड तेल (Refined Oil) शरीरासाठी पुरेसं असतं, याची माहिती घेऊ या. आरोग्यपूर्ण शरीरासाठी तेलाची निश्चितच गरज असते. त्वचा, केस आणि हाडांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आहारात असलेल्या तेलाचा उपयोग होतो. ‘हरजिंदगी डॉट कॉम’ या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हेल्दी शरीरासाठी दिवसभरात जास्तीत जास्त 3 ते 4 चमचे रिफाइंड तेल पुरेसं असतं. एका दिवसात 20 ग्रॅमपेक्षा अधिक प्रमाणात तेल आहारातून शरीरात गेल्यास ते हानिकारक ठरू शकतं. आरोग्याची कोणती समस्या आल्यास तेलाचं प्रमाण कमी केलं जाऊ शकतं. दोन मोठे चमचे तेलही शरीराला पोषक तत्त्वं पुरवण्यास पुरेसं ठरू शकतं. त्यामुळे त्यापेक्षा जास्त प्रमाणात तेल आहारात असेल, तर ते कटाक्षाने कमी करावं. तेलाचा वापर कमी कसा करता येईल? - डीप फ्राइड पदार्थ म्हणजेच जे पदार्थ बराच काळ तळावे लागतात, असे पदार्थ खाणं बंद करावं - भाज्या शिजवताना एक-दोन चमच्यांपेक्षा जास्त प्रमाणात तेलाचा वापर करू नये - वाफेवर शिजवलेल्या खाद्यपदार्थांचा आहारात मोठ्या प्रमाणावर समावेश करावा - सॅलडची चव वाढवण्यासाठी ऑइल ड्रेसिंग करणं टाळावं - चपातीवर तूप लावू नये - योग्य प्रकारच्या कुकिंग ऑइलची निवड करावी - आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा ज्या कुकिंग ऑइलमध्ये पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स (Polyunsaturated Fat) जास्त प्रमाणात असतात, ते तेल गरम केल्यानंतर त्यांचं विघटन अल्डिहाइडच्या (Aldehyde) स्वरूपात होतं. त्यामुळे तेल गरम केल्यानंतर त्याचा वास येतो. असं तेल आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं. या तेलांचा अधिक प्रमाणात वापर केल्यामुळे आपल्या शरीरातली पीएच लेव्हल बिघडते. तसंच वजन वाढणं, कोलेस्टेरॉलची पातळी कमी-जास्त होणं, बद्धकोष्ठता, पचनास त्रास होणं यांसारख्या समस्या उद्धवतात. त्याचप्रमाणे याचा लिव्हरवरदेखील परिमाण होतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात