मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /काहीच न करता ही तरुणी कमावते बक्कळ पैसा; कमाईचा मार्ग पाहून तर थक्कच व्हाल

काहीच न करता ही तरुणी कमावते बक्कळ पैसा; कमाईचा मार्ग पाहून तर थक्कच व्हाल

फुकटचे लाखो रुपये मिळवून ही महिला नटण्याथटण्यावर आणि फिरण्यावर खर्च करते.

फुकटचे लाखो रुपये मिळवून ही महिला नटण्याथटण्यावर आणि फिरण्यावर खर्च करते.

फुकटचे लाखो रुपये मिळवून ही महिला नटण्याथटण्यावर आणि फिरण्यावर खर्च करते.

मुंबई, 20 डिसेंबर : आपल्याला आरामात बसून पैसे मिळायला हवेत, असं अनेकांना वाटतं. पण तसं शक्य नाही, पैसे कमावण्यासाठी काही ना काही धडपड करावीच लागते. काही लोक चांगल्या मार्गाने तर काही काही लोक कमीत कमी वेळेत जास्त पैसे मिळवण्यासाठी, झटपट श्रीमंत होण्यासाठी वाईट मार्गाने पैसे कमावतात. पण एक महिला काहीच न करता पैसे कमावते. तिच्या कमाईचा मार्ग तुम्हाला समजला तर तुम्ही थक्कच व्हाल.

डायमंड डीवा प्रिंसेस (Diamond Diva Princess) नावाने प्रसिद्ध असलेली ही महिला. नटण्याथटण्यात आणि फिरण्यातच लाखो रुपये खर्च करते. हे पैसे तिच्या मेहनतीच्या कमाईचे नाहीत. तर बरेच अनोळखी पुरुष तिच्यावर पैसा उधळतात (Men Give Millions to Woman for Free).

ही महिला एक फिनडोम (FinDomme) आहे. फिनडोम महिला फाइनेशियल डॉमिनेशचं (Financial Domination) काम करतात. म्हणजे श्रीमंत पुरुषांच्या पैशांवर ती हक्क दाखवते आणि जबरदस्ती त्यांचे पैसे लुटते.

बऱ्याच श्रीमंत पुरुषांना अशा महिला आवडतात (Weird Hobbies). अशा महिलांवर ते लाखो रुपये उडवतात  (Fetish Lifesytle). याबदल्यात त्यांना तिच्याशी संबंध ठेवायचं असतो किंवा त्यांना तिच्याकडून काहीच नको असतं. अशीच सवय असलेल्या किंवा असा छंद असलेल्या पुरुषांचा ही महिला फायदा घेते. द सनच्या रिपोर्टनुसार डायमंड अशाच 7 हजार अनोळखी श्रीमंत लोकांकडून पैसे लुटते, ज्यांना तिला फक्त सुंदर दिसलेलं पाहायचं आहे.

हे वाचा -घरात एकटा असताना नवऱ्याचा 'नको तो उद्योग'; CCTV फुटेज पाहून बायकोही शॉक

आपलं खरं नाव न सांगता 2004 पासून ती फिनडोम म्हणून काम करत आहे. याआधी ती मॉडेल होती. अमेरिकन अभिनेत्री मर्लिन मुनरोशी लोक तिची तुलना करतात. लोकांच्या पैशांवर हक्क दाखवते आणि त्यांना आपण असे दबलेल्या राहण्यातच आनंदव वाटतो. या बदल्यात ते डायमंडला लाखो रुपये पाठवतात.

आपल्या क्लाइंट्ससाठी ती वेगवेगळे फेस्टिव्हल्स ठेवते. 1 नोव्हेंबर ते 2 जानेवारी ती  डायमंड प्रिसेसमस नावाचं ख्रिसमससारखं एक फेस्टिव्हल ठेवते. ज्यात पुरुष तिला गिफ्ट देतात. लोकांना आपल्यावर पैसे उडवायला मजा वाटते, असं ती म्हणते. फेस्टिव्हल्सदरम्यान ती आपल्या क्लाइंट्ससाठी वेगवेगळे दिवस साजरे करते. ज्यात तिला लोक वेगवेगळ्या वस्तू गिफ्ट करतात. एका व्यक्तीने तर तिच्यासाठी लास वेगासची  19 लाख रुपयांची एक ट्रिप स्पॉन्सर केली होती. आपल्या एकट्याच्या जेवणावर ती 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे उडवते. त्या पुरुषांसाठी ती महागड्या ड्रेसमध्ये नटूनथटून राहते आणि आपले सुंदर फोटो, व्हिडीओ पोस्ट करते.

हे वाचा - कटू सत्य! शिक्षिका असताना होती गरीब, प्रोफेशन बदलल्यावर झाली गडगंज

तिने सांगितलं की  ज्या महिलेला आपलं कधीच बनवू शकत नाही, अशा महिलेवर पुरुष आपले पैसे खर्च करतो, हे एकप्रकारचं आकर्षण आहे. तिचे स्लेव्ह तिला भेटण्यासाठी आतुर असतात. तिच्यासोबत त्यांना आपलं आयुष्य व्यतित करायचं असतं. पण ती त्यांच्याशी कधीच प्रेमाच्या भावनेत अडकत नाही.

First published:
top videos

    Tags: Lifestyle, Money, Viral, Viral news, Woman