मराठी बातम्या /बातम्या /Viral /कटू सत्य! शिक्षिका असताना होती गरीब, प्रोफेशन बदलल्यावर झाली गडगंज

कटू सत्य! शिक्षिका असताना होती गरीब, प्रोफेशन बदलल्यावर झाली गडगंज

तिला शिक्षकी पेशातून मिळणारे पैसे पुरत नव्हते. मग तिनं पेशा बदलला आणि काही दिवसांतच कोट्यधीश झाली.

तिला शिक्षकी पेशातून मिळणारे पैसे पुरत नव्हते. मग तिनं पेशा बदलला आणि काही दिवसांतच कोट्यधीश झाली.

तिला शिक्षकी पेशातून मिळणारे पैसे पुरत नव्हते. मग तिनं पेशा बदलला आणि काही दिवसांतच कोट्यधीश झाली.

लॉस एंजेलिस, 19 डिसेंबर: शिक्षिकेच्या व्यवसायात (Teaching profession) पैसे (Enough money) मिळत नसल्यामुळे वैतागलेल्या महिलेनं अखेर आपलं प्रोफेशन बदलण्याचा (Change in profession) निर्णय घेतला. अनेकदा आपण करत असलेल्या नोकरी किंवा व्यवसायातून लोकांना पुरेसा पैसा मिळत नाही. करत असलेलं काम आवडीचं असलं तरी अपुऱ्या पैशांमुळे मुलांचं संगोपन करण्यात अडथळे येतात. त्यामुळे सतत निराशेची आणि अपयशाची भावना दाटून येण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक व्यक्ती आपलं प्रोफेशन बदलून अधिक पैसा मिळणारं काम निवडताना दिसतात. नुकताच असा अनुभव एका महिलेनं शेअर केला आहे.

शिक्षिकेच्या कामात कमी पैसे

अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱी कर्टनी टिलिया नावाची महिला शिक्षिकेचं काम करायची. गेल्या सहा वर्षांपासून ती ऑटिस्टिक मुलांना शिकवण्याचं काम करत असे. मात्र तिला पुरेसा पगार मिळत नव्हता. त्यामुळं मुलांना हवी तशी गिफ्ट घेता येत नव्हती. नातेवाईकांकडे जाताना ती नेहमीच निराश आणि उदास असे. मुलांच्या बहुतांश मागण्यांना तिला नकार द्यावा लागे आणि महागड्या वस्तूंसाठी केवळ पाहुण्यांकडून येणाऱ्या गिफ्टवर अवलंबून राहावं लागे. कर्टनीनं ही परिस्थिती बदलण्याचा निर्णय़ घेतला आणि दोन वर्षांपूर्वी तो अंमलात आणला.

मुलांना दिलं 3 लाखांचं गिफ्ट

आपला निर्णय अंमलात आणल्यानंतर गेल्या ख्रिसमसला तिनं आपल्या मुलांना तब्बल 3 लाख रुपयांचं गिफ्ट दिलं. एकेकाळी 1500 रुपयांचं गिफ्ट घेणंही तिला परवडत नसे. मात्र परिस्थिती अशी काही बदलली की तिने मुलांना त्यांना हवी ती गिफ्ट घ्यायला सुरुवात केली. मुलांच्या सर्व इच्छा ती आता पूर्ण करू शकते आणि त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षणही देऊ शकते. सुट्टीच्या वेळी मुलांसोबत क्वालिटी टाईम घालवणं आणि चांगल्या जागांवर पर्यटन करणं हेदेखील आपल्याला शक्य होत असल्याचा अनुभव तिनं शेअर केला.

कुठल्या व्यवसायातून झाली कोट्यधीश?

आता प्रश्न हा उरतो की कर्टनीनं नेमकं असं काय केलं, ज्यामुळे ती कोट्यधीश झाली. 2019 साली तिनं शिक्षिकेची नोकरी सोडली आणि इन्स्टाग्रामवर आपले हॉट फोटो अपलोड करायला सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागल्यानंतर तिने अडल्ट साईटसाठी कंटेट तयार करणं सुरू केलं. तिच्या न्यूड फोटो आणि व्हिडिओची डिमांड वाढू लागली आणि बघता बघताती कोट्यधीश झाली.

First published:
top videos

    Tags: Money, Porn star, School teacher