Home /News /heatlh /

शी...! व्हॅनिला फ्लेव्हरची निर्मिती 'यापासून' होते? समजलं तर वापरच बंद कराल!

शी...! व्हॅनिला फ्लेव्हरची निर्मिती 'यापासून' होते? समजलं तर वापरच बंद कराल!

व्हॅनिला फ्लेव्हर कशापासून तयार करतात हे कळलं, तर किळस येईल

व्हॅनिला फ्लेव्हर कशापासून तयार करतात हे कळलं, तर किळस येईल

व्हॅनिला फ्लेव्हर (Vanilla Flavor) अनेकांना आवडतो. पण व्हॅनिला फ्लेव्हर कशापासून तयार करतात हे कळलं, तर किळस येऊ शकते.

मुंबई, 18 ऑगस्ट : व्हॅनिला फ्लेव्हर (Vanilla Flavor) अनेकांना आवडतो. व्हॅनिलाचा स्वाद अनेकांना रिफ्रेशही करतो. आईस्क्रीमपासून केकपर्यंत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये व्हॅनिला फ्लेव्हरचा वापर केला जातो. त्याशिवाय सेंट (Scents), परफ्यूम (Perfumes) आदींमध्येही या फ्लेव्हरचा वापर केला जातो. कॉफीपासून रिफ्रेशिंग ड्रिंक्सपर्यंत अनेक पेयांमध्ये व्हॅनिला इसेन्स हमखास असतोच. बहुतांश खाद्यपदार्थांमध्ये वापरला जाणारा व्हॅनिला फ्लेव्हर व्हॅनिलाच्या शेंगांमधल्या बियांपासून (Vanilla Beans) तयार केला जातो; मात्र अखाद्य उत्पादनांमधला (Non Food Items) व्हॅनिला फ्लेव्हर कशापासून तयार करतात हे कळलं, तर किळस येऊ शकते. अलीकडेच टिकटॉक या सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल झालेल्या एका ट्रेंडनंतर अनेक जण अचानक व्हॅनिला फ्लेव्हरचा स्रोत (Source of Vanilla Flavor) कशात आहे, याचा गुगलवर शोध घेऊ लागले. कारण व्हॅनिला फ्लेव्हर अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गुगलवर जेव्हा व्हॅनिला फ्लेव्हरच्या स्रोताबद्दल कळलं, तेव्हा अनेकांना कदाचित उलटीही आली असेल. कारण तो स्रोत असा काही असेल, याची कल्पनाही नसेल. गुगलवर आलेल्या सर्चमध्ये सर्वांत वरच्या स्थानावर होता नॅशनल जिऑग्राफिक चॅनेलचा रिझल्ट. हे विश्वासार्ह चॅनेल असल्याने त्यावरची माहिती योग्य असेल याबद्दल सर्वांची खात्री होती. त्यात कळलेल्या माहितीनुसार, व्हॅनिला फ्लेव्हरची निर्मिती उंदराच्या (Rat) गुदद्वाराजवळ असलेल्या एका ग्रंथीतून (Anal Gland) स्रवणाऱ्या कॅस्टोरिअम (Castoreum) नावाच्या एका चिकट स्रावापासून केली जाते. कॅस्टोरियम हा पदार्थ गोळा करून त्यापासून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्टची (Vanilla Extract) निर्मिती केली जाते. कॅस्टोरियमला व्हॅनिलासारखा वास असतो. उंदीर त्याच्या साह्याने आपलं क्षेत्र निश्चित करतात. उंदरांच्या शरीरातून कॅस्टोरियम काढल्यानंतर त्यापासून व्हॅनिला फ्लेव्हरची निर्मिती केली जाते. कॅस्टोरियमचा वापर सुरक्षित असल्याचं प्रमाणपत्र अमेरिकेच्या फूड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (US FDA) दिलं आहे. गेल्या 80 वर्षांपासून याचा उपयोग परफ्यूम्ससह काही खाद्यपदार्थांमध्येही केला जातो. अर्थात, ही माहिती वाचून किळस आली असली, तरी व्हॅनिला फ्लेव्हरप्रेमींनी तो फ्लेव्हर खाणं सोडण्याची गरज नाही. कारण कॅस्टोरियमपासून तयार केलेल्या व्हॅनिला फ्लेव्हरचा वापर खाद्यपदार्थांत फारसा केला नाही. त्याचा वापर खासकरून सेंट, परफ्यूम्स, मेणबत्त्या आदींमध्ये केला जातो. खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्हॅनिला फ्लेव्हरची निर्मिती व्हॅनिला बीन्स अर्थात व्हॅनिलाच्या शेंगांमधल्या बियांपासून केली जाते. त्यामुळे घाबरण्याची काहीही गरज नाही. तरीही व्हॅनिला फ्लेव्हर असलेला पॅकबंद आणि इम्पोर्टेड खाद्यपदार्थ असेल, तर तो खाण्यापूर्वी पॅकेटवरच्या माहितीतून त्याचा स्रोत एकदा तपासून घ्यावा. म्हणजे कोणतीही शंका मनात राहणार नाही.
First published:

पुढील बातम्या