जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / धक्कादायक! या सुंदर 'बार्बी सर्जन'वर पडली नजर; इतर महिला झाल्या विद्रुप

धक्कादायक! या सुंदर 'बार्बी सर्जन'वर पडली नजर; इतर महिला झाल्या विद्रुप

धक्कादायक! या सुंदर 'बार्बी सर्जन'वर पडली नजर; इतर महिला झाल्या विद्रुप

या सुंदर पण बोगस सर्जनच्या जाळ्यात महिला अडकल्या आणि त्यांच्या चेहऱ्याची अवस्था भयंकर झाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

बेलग्रेड, 05 ऑक्टोबर : आपण सुंदर दिसावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. पण काही ना काही कमी ही असतेच. आता ही कमी कॉस्मेटिक, प्लॅस्टिक सर्जरीने (Plastic Surgeon)  भरून काढता येते. त्यामुळे आपल्या नॅच्युरल ब्युटीवर फार समाधानी नसलेल्या किती तरी महिला अशा सर्जरी करून घेतात. बार्बी सर्जन (Barbie Surgeon) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशाच एक महिलेने अशी सर्जरी (Fake Plastic Surgeon) करून घेणाऱ्या महिलांच्या चेहऱ्याची अक्षरशः वाट लावली आहे. ओलगिसा मरकानोविक (Olgica Markanovic) असं या बार्बी सर्जनचं नाव. ती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले ग्लॅमरस फोटो पोस्ट करायची. इतर महिलांना स्वतःसारखं सुंदर दिसण्याची स्वप्नं दाखवून त्यांना प्लॅस्टिक सर्जरीसाठी तयार करायची. पण सर्जन म्हणून मिरवणाऱ्या ओलगिसाकडे सर्जन म्हणून कोणतीच डिग्री नव्हती (Woman doing Plastic Surgeon wihout degree) .  तिने स्वतःची प्लॅस्टिक सर्जरी करवून घेतली होती. त्यातून तिला जी थोडीफार माहिती झाली होती, त्यानुसार ती इतर महिलांवर सर्जरी करायची आणि त्यांच्याकडून चांगलेच पैसे उकळायची. हे वाचा -  लाखमोलाची ढेकर! एका Burp साठी त्याला मोजावे लागले तब्बल 1 लाख रुपये पण पैसे कमावण्याच्या नादात तिने अनेक महिलांना विद्रुप केलं आहे.  एका महिलेने आपला चेहरा खराब झाल्याची तक्रार केली, त्यानंतर ओलगिसाचं सत्य सर्वांसमोर आलं.

null

एका महिलेने सांगितलं, ओलगिसाचे फोटो पाहून ती इम्प्रेस झाली होती. त्यानंतर ती ओलगिसाला भेटली आणि आपलं नाक, आयब्रो अपलिफ्ट करायला सांगितले. ओलगिसाने तिची सर्जरी केली. पण यानंतर या महिलेच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला जळजळ होऊ लागली.  7 दिवस ती आपला डोळा उघडू शकली नाही. यानंतर ओलगिसाचे असे बरेच क्लाएंट पुढे आले ज्यांना अशाच समस्या बळावल्या. जवळपास 11 महिलांच्या चेहऱ्याची भयंकर अवस्था झाली.  या महिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवळपास 20 महिलांंनी तिच्याकडून प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली आहे. हे वाचा -  लेकीच्या Period leave साठी बाबाची धडपड; शाळेतील सुट्टीसाठी लढतोय लढा अशा बऱ्याच तक्रारी आल्यानंतर ओलहिसा आपलं क्लिनिक सोडून पळाली. सर्बिया आणि क्रोशियाच्या दरम्यान तिला बेड्या ठोकण्यात आल्या. 1 जूनला तिला अटक करण्यात आली. कोर्टात एक साक्षीदार नसल्याने तिला आतापर्यंत शिक्षा देण्यात आली नाही. आता पुन्हा ट्रायल सुरू झाल्यास ओलहिसाला तीन ते चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा केली जाऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात