मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Vaccine Alert: कोरोनाची लस घेतल्यानंतर लगेच गर्भधारणा टाळा; किमान 2 महिने थांबण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Vaccine Alert: कोरोनाची लस घेतल्यानंतर लगेच गर्भधारणा टाळा; किमान 2 महिने थांबण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Pregnancy Delay

Pregnancy Delay

आरोग्यतज्ज्ञांनी असं सुचवलं आहे की, लसीकरणानंतर आठ आठवड्यांपर्यंत गर्भधारणा टाळणे सर्वात सुरक्षित आहे. गर्भवती स्त्रियांनी लस घ्यावी की नाही (Corona Vaccine) याबाबतही तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली,30 जानेवारी :  भारतात कोरोना (Coronavirus) प्रतिबंधक लसीकरण (Vaccination) मोहीम सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कुणी लस (Covid Vaccine) लवकरात लवकर घ्यावी, कुणी टाळावी याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी आणि सरकारनेसुद्धा काही मार्गदर्शक तत्त्व दिली आहेत.  विशेषतः गर्भवती स्त्रियांसाठी महत्त्वाचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देत आहेत. गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांनी  कोरोनाची लस घेतल्यानंतर किमान दोन महिने थांबावं असंही ते सांगतात.

कोरोना लस घेतल्यानंतर गर्भधारणेसाठी (Pregnancy) दोन महिन्यांनंतर नियोजन करावे, असं आवाहन देशातील स्त्रीरोग आणि फर्टिलिटी तज्ज्ञांनी इच्छूक नागरिकांना केले आहे.

गर्भधारणेदरम्यान लसीकरण करु नये, अशी शिफारस वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशने (World Health Organisation) केली असून, गर्भधारणेदरम्यान लस घेतल्यास गंभीर स्वरुपाचा धोका उदभवू शकतो, असे देखील नमूद केले आहे. मात्र, लस घेण्यापूर्वी गर्भधारणेबाबतची तपासणी करण्याची, तसेच लस घेतल्यानंतर गर्भधारणेस विलंब करावा, अशी कोणतिही शिफारस करण्यात आलेली नसल्याचे WHO ने म्हटलं आहे. तथापि स्तनपान देणाऱ्या महिलांना ही लस देण्यात यावी, मात्र या लसीमुळे त्या महिलेच्या बालकाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं देखील WHO ने स्पष्ट केलं आहे.

न्यू इंडियन एक्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार,  ब्राईटराईट चिल्ड्रेन्स हाॅस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुमन सिंग यांनी सांगितलं की, लस न घेण्याची कोणतिही शिफारस करण्यात आलेली नसून, बालकाच्या जन्मासाठी इच्छूक दांपत्यांनी लस घेतल्यानंतर किमान दोन महिने फॅमिली प्लॅनिंग करणे आवश्यक आहे.

युरोपियन सोसायटी आॅफ ह्यूमन रिप्रोडक्शन अँड एम्ब्रिओलाॅजीने  (European Society of Human Reproduction And Embriology) (ईएसएचआरई) सुरक्षित सहाय्यित प्रजनन तंत्रज्ञान पद्धतींसाठी या मार्गदर्शक सूचना योग्य असल्याचे म्हटलं आहे.

लसीकरणाचे फायदे आणि तोटे लक्षात घेऊन गर्भवती महिलांनी लस घ्यायची की नाही याचा निर्णय वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत करून घ्यावा. तसंच ईएसएचआरईने ARTच्या निकालावर लक्ष ठेवण्याची तसेच ज्यांनी लस घेतली आहे आणि ज्यांनी लस घेतलेली नाही, अशांची तुलना करण्याची शिफारस केल्याचे डॉ. सिंग यांनी सांगितले.

दरम्यान, आतापर्यंत कोणत्याही गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी कोविड लसीच्या क्लिनिकल चाचणीत सहभाग घेतलेला नाही. तसेच या महिलांनी लस घेऊ नये अशी शिफारस देखील करण्यात आल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचा - पॉझिटिव्ह बातमी! राज्यातल्या या दोन शहरांची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

गर्भधारणेसाठी कोरोना लसीच्या अनुषंगाने दीर्घकालीन सुरक्षिततेचा कोणताही डेटा उपलब्ध नाही. त्यामुळे लसीकरणानंतर किमान आठ आठवड्यांपर्यंत गर्भधारणा टाळणं सर्वात सुरक्षित आहे, कारण ही लस गर्भ आणि त्याच्या दृष्टी, श्रवण क्षमतेसाठी धोकादायक ठरु शकते, असे आरोग्यविषयक तज्ज्ञांनी सांगितले आहे.

कोविशिल्ड (Covisheild) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन्ही रासायनिक क्रिया न करणाऱ्या लशी आहेत. तरीही लस घेणं अपरिहार्य असल्याचं गर्भधारणा तज्ज्ञांनी सांगितले.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Health, Pregnancy