मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

फक्त फायदेच नाही तर जास्त पाणी पिण्याचे गंभीर तोटेही; शरीरावर होतात हे भयंकर परिणाम

फक्त फायदेच नाही तर जास्त पाणी पिण्याचे गंभीर तोटेही; शरीरावर होतात हे भयंकर परिणाम

दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावं, असा सल्ला नेहमी दिला जातो. मात्र, गरजेपेक्षा अधिक पाणी प्यायल्यानेही शरीराचं नुकसान होऊ शकतं (Drinking Water)

दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावं, असा सल्ला नेहमी दिला जातो. मात्र, गरजेपेक्षा अधिक पाणी प्यायल्यानेही शरीराचं नुकसान होऊ शकतं (Drinking Water)

दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावं, असा सल्ला नेहमी दिला जातो. मात्र, गरजेपेक्षा अधिक पाणी प्यायल्यानेही शरीराचं नुकसान होऊ शकतं (Drinking Water)

मुंबई 13 ऑगस्ट : निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा असतो. पण मूत्रपिंडासारख्या (Kidneys) महत्त्वाच्या अवयवांनी व्यवस्थित काम करावं यासाठी दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावं, असा सल्ला नेहमी दिला जातो. मात्र, गरजेपेक्षा अधिक पाणी प्यायल्यानेही शरीराचं नुकसान होऊ शकतं. ओव्हरहायड्रेशनच्या (Overhydration) समस्येला सामोरं जावं लागू शकतं. याला पाण्याचं इंटॉक्सिकेशन (Intoxication) असंही म्हणतात. गरजेपेक्षा अधिक पाणी प्यायल्याने होणाऱ्या त्रासाबद्दल जाणून घेऊ या. ‘झी न्यूज हिंदी’ने याबद्दल अधिक माहिती देणारं वृत्त दिलं आहे. प्रमाणापेक्षा अधिक पाणी प्यायल्याने शरीरातल्या विविध अवयवांचं नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या शरीराची गरज ओळखूनच पाणी पिणं कधीही चांगलं. Diabetes : डायबेटीसच्या रुग्णांनी 2 जेवणांमध्ये किती अंतर ठेवावं? हृदयाला धोका वाढतो आपण आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पीत असू तर ते हृदयासाठी धोकादायक ठरू शकतं. हृदय निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जेव्हा आपण अधिक पाणी पितो, तेव्हा शरीरातलं रक्ताचं प्रमाण वाढतं आणि रक्तवाहिन्यांवरचा ताणही वाढत जातो. अधिक दबाव वाढल्यानं हृदयाची गती थांबण्याची शक्यताही अधिक होते. त्यामुळे अतिरिक्त पाणी पिणं टाळलं पाहिजे. पेशींना सूज शरीराला गरज आहे त्यापेक्षा अधिक पाणी प्यायल्याने शरीरातलं सोडियमचं (Sodium) प्रमाण कमी होऊ लागतं आणि ऑस्मोसिस प्रक्रियेद्वारे (Osmosis Process) पाणी पेशींमध्ये (Cells) प्रवेश करतं. त्यामुळे पेशींना सूज येण्याची समस्या उद्भवते. याकडे दुर्लक्ष केल्यास स्नायूच्या पेशींना (Muscles Tissue) धोका संभवतो आणि ब्रेन डॅमेजचीही (Brain Damage) भीती असते. त्यामुळे गरजेपेक्षा अधिक पाणी पिता कामा नये. Unhealthy Drink : सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय मूत्रपिंडासाठीही धोकादायक ओव्हरहायड्रेशनमुळे मूत्रपिंडाला (Kidneys) नुकसान पोहोचू शकतं. जेव्हा आपण अधिक पाणी पितो तेव्हा आर्जिनिन व्हॅसोप्रेसिनच्या ( Arginine Vasopressin) प्लाझ्माची पातळी कमी होते. याचा थेट परिणाम किडनीच्या कार्यक्षमतेवर पडतो. म्हणून गरजेपेक्षा अधिक पाणी पिणं टाळणं गरजेचं असतं. यकृतावरही होतो परिणाम ओव्हरहायड्रेशनसाठी केवळ पाणी हा घटकच कारणीभूत राहत नाही, तर लोहयुक्त पाणी (Iron) ओव्हरहायड्रेशनसाठी अधिक जबाबदार आहे. यामुळे यकृतावर (Lever) परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढंच पाणी प्यायला हवं. निरोगी जीवनात संतुलित आहाराप्रमाणे पाणी किती पितो यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाण्यामुळे शरीरातल्या इतर द्रव्यांचं प्रमाण कायम राखण्यास मदत होते. आपल्या शरीरात 60 ते 70 टक्के पाणीच आहे. त्यामुळे दिवसभरात भरपूर पाणी प्यावं, असं वारंवार सांगितलं जातं; पण शरीराच्या गरजेपेक्षा अधिक पाणी प्यायल्याने अनेक धोके असतात. त्यामुळे तहान लागेल, तेव्हाच पाणी प्यायलं तर निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.
First published:

Tags: Drink water, Health Tips, Water

पुढील बातम्या