मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Unhealthy Drink : सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

Unhealthy Drink : सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

काही शीतपेये आहेत ज्यांचे जास्त प्रमाणात किंवा नियमित सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो. त्यांच्या सेवनामुळे मेंदू लवकर कमकुवत आणि वृद्ध होऊ शकतो. जाणून घ्या, कोणती आहेत ती अस्वास्थ्यकर पेये.

काही शीतपेये आहेत ज्यांचे जास्त प्रमाणात किंवा नियमित सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो. त्यांच्या सेवनामुळे मेंदू लवकर कमकुवत आणि वृद्ध होऊ शकतो. जाणून घ्या, कोणती आहेत ती अस्वास्थ्यकर पेये.

काही शीतपेये आहेत ज्यांचे जास्त प्रमाणात किंवा नियमित सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो. त्यांच्या सेवनामुळे मेंदू लवकर कमकुवत आणि वृद्ध होऊ शकतो. जाणून घ्या, कोणती आहेत ती अस्वास्थ्यकर पेये.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला मेंदूही कमी वयात वृद्धत्वाचा बळी ठरू शकतो. तुमच्या शरीराच्या इतर भागांप्रमाणेच मेंदूचेही कालांतराने वय होणे स्वाभाविक आहे. मात्रा तुमचा आहार आणि जीवनशैलीदेखील तुमच्या मेंदूच्या वयाच्या दरावर परिणाम करू शकते. काही सवयी मेंदूच्या वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करू शकतात. तर काही त्यास गती देऊ शकतात. आपण अनेकदा आपल्या आहारात अशा काही गोष्टींचा समावेश करतो. ज्यामुळे मेंदूची वृद्धत्वाची प्रक्रिया वाढते. निरोगी राहण्यासाठी कोणत्याही गोष्टीचे सेवन मर्यादित प्रमाणात केले पाहिजे. परंतु जेव्हा तुम्ही सतत अस्वास्थ्यकर खाण्यापिण्याच्या सवयी लावता तेव्हा त्याचा मेंदूवरही नकारात्मक परिणाम होतो. यामुळे तुमचा मेंदू अकाली वृद्धत्वाचा बळी ठरू शकतो. नियमितपणे जास्त प्रमाणात साखरयुक्त पेये सेवन केल्याने मेंदू आणि संज्ञानात्मक आरोग्यास नुकसान होऊ शकते. जाणून घ्या अशाच काही पेयांबद्दल जे तुमच्या मेंदूच्या जलद वृद्धत्वाला कारणीभूत ठरू शकतात. सोडा तुमचा मेंदू म्हातारा करू शकतो Eatdis.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, सोडा जास्त प्रमाणात प्यायल्याने मेंदूचे वय वाढते. ज्या सहभागींनी दररोज किमान एक सोडा प्यायला त्यांच्या मेंदूच्या व्हॉल्यूममध्ये मोठी घट झाली. नियमितपणे सोडा प्यायलेल्या सहभागींना "एपिसोडिक" स्मरणशक्ती, म्हणजेच दीर्घकालीन भूतकाळातील घटना आठवण्याची क्षमता बिघडल्याचे आढळले. दररोज शर्करायुक्त सोडासारखे पेय पिणे टाळा.

चिप्स, कोल्ड ड्रिंकसारख्या पदार्थांचे अतिसेवन स्मरणशक्तीसाठी ठरू शकते घातक, होऊ शकतो स्मृतिभ्रंश

डाएट सोडादेखील मेंदू वृद्ध करू शकतो सोड्याप्रमाणेच डाएट सोडा हादेखील मेंदूच्या आरोग्यासाठी आरोग्यदायी पर्याय नाही. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे लोक दररोज डाएट सोडा घेतात त्यांना स्ट्रोक किंवा स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता तिप्पट असते. मात्र यावर अजून संशोधनाची गरज आहे. अल्कोहोलच्या सेवनाने मेंदूवरही नकारात्मक परिणाम होतो मोठ्या प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केल्याने तुमच्या मेंदूच्या वृद्धत्वाच्या प्रक्रियेला गती मिळू शकते, परंतु कमी प्रमाणात मद्यपान केल्याने तुमच्या आकलनशक्तीवरही परिणाम होतो का हा वादाचा मुद्दा आहे. मात्र संशोधनात असेही म्हटले आहे की, जे लोक दररोज एक ग्लास रेड वाईन पितात त्यांना स्मृतिभ्रंश किंवा अल्झायमर रोग आढळला नाही. परंतु 2022 च्या अलीकडील संशोधनानुसार दिवसातून फक्त एक किंवा दोन पेये तुमच्या मेंदूवर नकारात्मक परिणाम करू शकतात. एका अभ्यासानुसार, मध्यम प्रमाणात अल्कोहोल प्यायल्याने मेंदूतील पांढरे आणि राखाडी पदार्थ कमी होतात. जे मेंदूच्या विविध संज्ञानात्मक कार्यांसाठी जबाबदार असतात. पावसाळ्यात मुलांना सर्दी-पडसं होण्याची वाटतेय भिती? या गोष्टी करा अन् बिनधास्त रहा सोडा, डाएट सोडा, अल्कोहोल आणि मेंदूच्या वृद्धत्वाच्या प्रक्रियेशी त्यांचा संबंध यावरील विद्यमान संशोधन काही प्रकरणांमध्ये अनिर्णित असू शकते. परंतु तुमचा मेंदू दीर्घकाळ निरोगी आणि तरुण राहावा असे वाटत असेल. तर काहीही मर्यादित प्रमाणात सेवन करणे चांगले आहे. विशेषत: वरती सांगितलेली पेये.
First published:

Tags: Drink water, Lifestyle, Mental health

पुढील बातम्या