मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Diabetes : डायबेटीसच्या रुग्णांनी 2 जेवणांमध्ये किती अंतर ठेवावं?

Diabetes : डायबेटीसच्या रुग्णांनी 2 जेवणांमध्ये किती अंतर ठेवावं?

टाइप-2 डायबेटीस (Diabetes) झाला की, रक्तातली साखर (Blood Sugar) अनियंत्रित होऊ नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते.

टाइप-2 डायबेटीस (Diabetes) झाला की, रक्तातली साखर (Blood Sugar) अनियंत्रित होऊ नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते.

टाइप-2 डायबेटीस (Diabetes) झाला की, रक्तातली साखर (Blood Sugar) अनियंत्रित होऊ नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते.

मुंबई, 13 ऑगस्ट :  वाढते ताणतणाव, संतुलित आहाराचा अभाव व अनियमित जीवनशैलीमुळे सध्या जगभरात मधुमेह (Diabetes) होण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. टाइप-2 डायबेटीस झाला की, रक्तातली साखर (Blood Sugar) अनियंत्रित होऊ नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते. वेळेवर औषधं आणि आहार घेणं अत्यंत आवश्यक असतं. शरीरातलं इन्सुलिनचं कार्य व्यवस्थित चालावं म्हणून टाइप-2 डायबेटीसची औषधं घेत असलेल्या व्यक्तींनी दोन जेवणांमध्ये अंतर ठेवणंही तितकचं गरजेचं आहे. त्याबद्दल अधिक जाणून घेऊ या. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. डायबेटीस असलेल्या व्यक्तींच्या आहारासंबंधी ‘डायबेटोलॉजिया’मध्ये (Diabetologia) एक संशोधन प्रकाशित झालं आहे. यात त्यांचा आहार कसा असावा यावर भाष्य करण्यात आलं आहे. यात म्हटल्याप्रमाणे, डायबेटीसचा आजार असलेल्या व्यक्ती ठरावीक वेळेत जेवल्यास (TRE-Time Restricted Eating) त्यांच्या शरीरातल्या चयापचय (Metabolism) क्रिया चांगल्या पद्धतीने काम करतात. रात्रभर उपाशी राहण्याचा कालावधी जास्त असतो. ठरावीक वेळी जेवल्यास त्याचा काय परिणाम होतो याचा व्यापक अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी टाइप-2 डायबेटीस असलेल्या रुग्णांमधल्या हिपॅटिक ग्लायकोजनेचा (Hepatic Glycogen) स्तर आणि इन्सुलिनची संवेदनशीलता (Insulin Sensitivity) तपासली. डायबेटीसचा रुग्ण 10 तास उपाशी राहत असल्यास टाइप-2 डायबेटीस असलेल्या रुग्णांच्या 24 तासांच्या ग्लुकोज होमियोस्टेसिसमध्ये सुधारणा होते. 10 तासांचा उपवास सुरक्षित आणि प्रभावी माध्यम असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं. फरीदाबाद येथील एकॉर्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सीनिअर कन्सल्टंट आणि इंटर्नल मेडिसीन अँड हृमॅटॉलॉजीचे युनिट हेड डॉ. जयंत ठाकुरिया यांनी सांगितलं, की टाइप-2 डायबेटीसचा रुग्ण आहाराद्वारे बरा होऊ शकतो; पण त्याने अधिक काळ उपाशी राहू नये, ही प्रमुख अट आहे. बहुतांश रुग्ण रात्रीच्या आणि सकाळच्या जेवणामध्ये 12 ते 14 तासांचं अंतर ठेवतात. एखाद्या व्यक्तीचे hbA1C 5.7 ते 6.4 च्या (प्री-डायबेटीस) आतमध्ये असेल तर त्या व्यक्तीच्या रक्तातली साखर नियंत्रित करता येऊ शकते. फक्त त्या रुग्णाने दोन जेवणांमध्ये 8 तासांपेक्षा अधिक काळ उपाशी राहू नये. सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध साखर कशी नियंत्रित राहणार? दोन जेवणांमध्ये कमीत कमी 10 तासांचे अंतर ठेवल्यामुळे डायबेटीसवर नियंत्रण मिळवता येतं की नाही, हा प्रश्न रुग्णांना पडत असतो; पण डॉ. ठाकुरिया यांनी या मुद्यावर असहमती दर्शवली. ते म्हणाले, की डायबेटीसच्या कुठल्याही रुग्णाला अधिक काळ उपाशी राहून चालत नाही. जास्त उपाशी राहिल्यामुळे शरीरात जमा झालेली चरबी (Fat) साखरेत रूपांतरित होते आणि रक्तातली साखरेची पातळी आणखी वाढते. डायबेटिक आणि प्री-डायबेटिक रुग्णांच्या जेवणात सहा ते आठ तासांचं आदर्श अंतर असायला हवं. दुसरीकडे जास्त काळ आणि कमी काळ उपाशी राहण्याच्या दोन विविध बाबी डायबेटीसच्या रुग्णांमध्ये पाहायला मिळतात. डायबेटीसच्या रुग्णांमध्ये पहाटे 4 वाजता रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होतं आणि सकाळी 6 वाजता त्यात वाढ होते. तुमच्या हाताची पकड कमकुवत होतेय का? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण दोन जेवणात ठराविक अंतर आवश्यक जेवणानंतर शरीरात इन्सुलिनने त्याचे काम करावं म्हणून डायबेटीसचे औषध घेत असलेल्या रुग्णांच्या दोन जेवणात अंतर असणं महत्त्वाचं असतं. डॉ. ठाकुरिया म्हणाले, की आदर्श जीवनशैलीत सकाळी 8 वाजता नाश्ता, दुपारी 2 वाजता जेवण आणि रात्री 8 ते 9 वाजता पुन्हा जेवायला हवं. औषध घेत नसलेल्या व्यक्तींनीही याच जीवनशैलीचा अवलंब करायला हवा. जेवणाच्या वेळा अनियमित असतील तर रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी-जास्त होऊ शकतं. 50 टक्के रूग्णांना माहितीच नाही जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार (World Health Organisation) भारतात 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 77 मिलियन जणांना डायबेटीसने (टाइप 2) ग्रासलं आहे. जवळपास 25 मिलियन लोक प्री-डायबेटिक आहेत. याचाच अर्थ त्यांना नजीकच्या काळात डायबेटीस होण्याची दाट शक्यता आहे. 50 टक्क्यांहून अधिक जणांना ते डायबेटिक असल्याचं माहितीच नाही. याचं निदान आणि उपचार वेळेवर न मिळाल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक आहे.
First published:

Tags: Diabetes, Health Tips

पुढील बातम्या