कोरोना विषाणूशी (coronavirus) संबंधित नवीन तथ्य समोर येत आहेत. ताज्या अहवालानुसार मधुमेहाच्या (diabetes medicine) उपचारासाठी वापरल्या जाणार्या मेटफॉर्मिन नावाच्या औषधामुळे महिलांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका कमी होतो. अमेरिकेच्या मिनेसोटा विद्यापीठाने हा अभ्यास केला आहे. अहवालानुसार जगभरात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये टाइप 2 मधुमेह आणि लठ्ठपणाचे रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. त्याचवेळी जे रुग्ण मेटफॉर्मिन किंवा इतर मधुमेहाची औषधं घेत आहेत त्यांना धोका कमी आहे. अशाप्रकारे काही ठिकाणी डॉक्टर मधुमेह असलेल्या महिलांमध्ये कोरोना विषाणूचा उपचार करण्यासाठी मेटफॉर्मिन वापर करत आहेत. तथापि हा उपचार प्रत्येक रुग्णासाठी नाही आहे. मिनेसोटा विद्यापीठातील संशोधकांनी अमेरिकेतील 6,200 महिला आणि पुरुषांची माहिती गोळा केली आहे. या सर्वांना मधुमेह आणि लठ्ठपणा होता. तसंच कोरोनाचा संसर्गही सर्वांमध्ये आढळून आला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान असं आढळून आले की, ज्या महिलांनी मेटफॉर्मिनचा 90 दिवसांचा कोर्स पूर्ण केला होता त्यातील बहुतांश महिलांनी कोरोनाविरोधात लढाई जिंकली. त्याच वेळी ज्यांनी हे औषध घेतलं नाही त्यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण खूपच जास्त होतं. विशेष गोष्ट अशी आहे की पुरुषांपेक्षा या औषधाचा स्त्रियांवर जास्त परिणाम दिसून आला आहे. myupchar.com चे एम्सचे डॉ. अजय मोहन यांच्या म्हणण्यानुसार, सर्व प्रयत्न करूनही अद्यापपर्यंत कोरोना विषाणूचा उपचार आढळलेला नाही. यामुळेच कोरोना विषाणूची लक्षणं जसे की सर्दी, पडसे, कोरडा खोकला, ताप आणि डोकेदुखी वर आजही जगभरात उपचार सुरू आहेत. कोरोना विषाणूच्या औषधाच्या अभावी मधुमेहासारख्या आजारांनी पीडित असलेल्या लोकांच्या जीवाचा धोका अधिक असतो. कोरोनाच्या काळात मधुमेह बनला प्रमुख शत्रू एकीकडे भारतासह सर्व देश कोरोनाशी झगडत आहेत तर मधुमेहदेखील एक प्रमुख शत्रू म्हणून उदयास आला आहे. वास्तविक, लॉकडाऊनमुळे लोक घरात कैद आहेत आणि घरातूनच काम करत आहेत. यामुळे शारीरिक हालचालींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे आणि म्हणूनच मधुमेहाची प्रकरणं झपाट्यानं वाढत आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार लॉकडाऊनच्या वेळी 100 लोकांपैकी 40 टक्के लोकांचं वजन वाढलं. 16 टक्के लोकांचे वजन 2.1 किलो वरून 5 किलोपर्यंत वाढलं आहे. त्यापैकी बहुतेकांमध्ये मधुमेहाचा धोका वाढला आहे. धोक्याची बाब अशी ही आहे की, बहुतांश लोकांना याची कोणतीही चिन्हं नाहीत. मात्र नकळत आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत आहे. भारत सरकारनं दिले आहेत दिशा****निर्देश कोरोना विषाणू आणि मधुमेहाचा दुहेरी धोका लक्षात घेता भारत सरकारने वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. विशेषत: मधुमेह रूग्णांना कोरोना कालावधीत अत्यंत सावधगिरी बाळगण्यास सांगितले गेले आह. myupchar.com च्या डॉ. अनुसार शाही यांच्या मते शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी घरच्या घरी नियमित व्यायाम केला पाहिजे आणि रक्तातील ग्लूकोजच्या प्रमाणाची वेळोवेळी तपासणी केली पाहिजे. मधुमेहा व्यतिरिक्त, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचा आजार आणि हृदयाची समस्या यासारख्या गंभीर आजारांमध्ये असणारे लोकही उच्च जोखमीच्या श्रेणीत येतात. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - गरोदरपणातील मधुमेह: लक्षणे… न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.