Depression वर कशी करावी मात; तज्ज्ञांनी सांगितले सोपे उपाय

Depression वर कशी करावी मात; तज्ज्ञांनी सांगितले सोपे उपाय

अतिशय गंभीर अवस्थेतील डिप्रेशनमधूनही (depression) बाहेर येता येतं, त्यावर उपचार केले जाऊ शकतात.

  • Last Updated: Dec 19, 2020 11:24 PM IST
  • Share this:

अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतो की डिप्रेशन (Depression) बाहेर येणं कठीण आहे का? या आजाराचा काही उपचार नाही का? तर याचं उत्तर आहे, होय उपचार (Depression treatment) आहेत. जेव्हा कोणी नैराश्येच्या चक्रात अडकलेला असतो त्याला वाटतं की तो या परिस्थितीतून कधी बाहेर येऊ शकणार नाही. पण अतिशय गंभीर अवस्थेतील औदासिन्यातून देखील बाहेर येता येतं, त्यावर उपचार केले जाऊ शकतात. म्हणून जर औदासिन्य आयुष्यावर परिणाम करत असेल मदत मागायला, घ्यायला संकोच करू नका.

myupchar.com चे ऐम्सशी संबंधित डॉ. उमर अफरोज यांनी सांगितलं, थेरेपी, औषध आणि आरोग्यदायक जीवनशैली स्वीकारून उपचार करण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. जसं कुणीही दोन लोक एकसारख्या औदासिन्यानं प्रभावित होऊ शकत नाही तसंच त्यांना उपचार करण्याचे मार्गही वेगवेगळे असू शकतात. एक प्रकारचा उपचार सर्वांसाठी फायद्याचा ठरेलच असं नाही. साधारणपणे याचा उपचार औषधांनी केला जातो. पण या शिवाय इतर उपायांनी देखील यातून बाहेर येता येतं.

थेरेपी -  जर औदासिन्याच्या लक्षणांसाठी औषधं घ्यायची नसतील तर थेरेपी उत्तम उपाय आहे. थेरेपी चांगले वाटण्यास आणि औदासिन्य रोखण्यास मदत करते. अनेक प्रकारच्या थेरेपी उपलब्ध आहेत. त्यात कोग्निटिव बिहेवियरल थेरेपी, इंटरपर्सनल थेरेपी आणि साइकोडायनामिक थेरेपी यांचा समावेश होतो. नेहमी या तिन्ही थेरेपींचा एकत्रित उपयोग करून उपचार केला जातो. काही प्रकारच्या थेरेपी नकारात्मक विचार दूर करण्यात मदत करतात आणि औदासिन्याशी व्यावहारिक तंत्रानं सामना करण्याचं शिकवतात.

केवळ औषधे नकोत: औदासिन्य केवळ मेंदूतील रासायनिक असंतुलन नाही आहे. औषधं मध्यम आणि गंभीर औदासिन्यात आराम देण्यात मदत करतात. पण समस्या ठिक होत नाही. अँटीडिप्रेसेंट्स औषधांचे दुष्परिणाम पण आहेत. पण जर ते घेणं जरूरी असेल तर अन्य उपचारांकडे दुर्लक्ष करू नका. जीवनशैलीमध्ये बदल आणि थेरेपी या औदसिन्येतून लवकर बाहेर तर काढतात पण ते पुन्हा होऊ नये म्हणून मदतपण करतात.

जीवनशैलीमध्ये बदल: जीवनशैलीमध्ये व्यायामाचा समावेश करा. व्यायामानं सेरोटोनिन, अँडोर्फिन आणि मनाला चांगले वाटणारे मेंदूतील रसायने स्त्रवायला चालना मिळते. ते अँटीडेप्रेसेंट्सप्रमाणे मेंदूत नवीन पेशीचा त्या रसायनांशी संपर्कही वाढवते. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणाले, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य यांच्यासाठी संतुलित आहार अत्यंत महत्वपूर्ण आहे, त्याने व्यक्तीच्या शरीरात उर्जा टिकून राहते आणि त्यांच्या मनोदशेत सुधारणा होते.

मित्रांना भेटा, त्यांच्याही बोला: औदासिन्यामध्ये व्यक्ती समाजापासून दूर जातो हे नेहमीच घडते. पण या अंधारातून बाहेर पडण्यासाठी मित्र, कुटुंबातील सदस्य यांच्या संपर्कात राहा. एखाद्या समूहात सामील व्हा. यात नातेवाईक आणि मित्रांची महत्वाची भूमिका असते. ते रुग्णाला सकारात्मक वातावरण देऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला हे जाणवून द्या की तो सगळ्यांसाठी खास आहे आणि तो जसा आहे तसाच सगळ्यांना हवासा आहे.

चांगली झोप घ्या: औदासिन्य असलेल्या व्यक्तीने प्रयत्न करायला हवे की रात्री चांगली झोप घ्यावी. रोज 7-8 तासाची झोप आवश्यक आहे. रोजच्या दिनक्रमात असा बदल करा की तणाव कमी होईल. अशा कामात किंवा नात्यात गुंतू नका ज्यानं तणाव वाढेल.

औदासिन्यातून बाहेर पडणं कठीण असेल पण ते अशक्य नाही. यासाठी या अंधारातून बाहेर निघण्याची आशा कधीच सोडू नका.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - सीएनएस उदासीनता: लक्षणे, कारणे ...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: December 19, 2020, 11:24 PM IST
Tags: health

ताज्या बातम्या