मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Deodorant Side Effect : डियोड्रन्टच्या जास्त वापराने होऊ शकतो कॅन्सर! काय आहे यामागचे सत्य?

Deodorant Side Effect : डियोड्रन्टच्या जास्त वापराने होऊ शकतो कॅन्सर! काय आहे यामागचे सत्य?

आपण शरीरातील दुर्गंधी (Body Odor) दूर करण्यासाठी काही पर्याय वापरतो. त्यातीलच पर्याय म्हणजे डियोड्रन्ट (Deodorant). हे मुळात शरीरातून दुर्गंधी येऊ नये म्हणून वापरले जाते आणि ते घाम कमी करण्यासाठीदेखील वापरले जातात.

आपण शरीरातील दुर्गंधी (Body Odor) दूर करण्यासाठी काही पर्याय वापरतो. त्यातीलच पर्याय म्हणजे डियोड्रन्ट (Deodorant). हे मुळात शरीरातून दुर्गंधी येऊ नये म्हणून वापरले जाते आणि ते घाम कमी करण्यासाठीदेखील वापरले जातात.

आपण शरीरातील दुर्गंधी (Body Odor) दूर करण्यासाठी काही पर्याय वापरतो. त्यातीलच पर्याय म्हणजे डियोड्रन्ट (Deodorant). हे मुळात शरीरातून दुर्गंधी येऊ नये म्हणून वापरले जाते आणि ते घाम कमी करण्यासाठीदेखील वापरले जातात.

मुंबई, 11 जुलै : हल्ली धावपळीच्या काळात माणूस प्रत्येक कामासाठी शॉर्टकट शोधात असतो किंवा असं म्हणता येईल की, आता आपल्याकफडे प्रत्येक गोष्टीसाठी पर्याय उपलब्ध आहे. रोज आपल्या शरीराकडे आपल्याला हवे तितके लक्ष देता येत नाही म्हणून आपण शरीरातील दुर्गंधी (Body Odur) दूर करण्यासाठी काही पर्याय वापरतो. त्यातीलच पर्याय म्हणजे डियोड्रन्ट (Deodorant). हे मुळात शरीरातून दुर्गंधी येऊ नये म्हणून वापरले जाते आणि ते घाम कमी करण्यासाठीदेखील वापरले जातात. विशेषतः अंडरआर्म्सभोवती. डियोड्रन्टच्या सुरक्षिततेबद्दल (Deodorant Side Effect) सर्वांच्याच मनात अनेक प्रश्न असतात. डियोड्रन्ट घामावर नियंत्रण ठेवते, ज्यामुळे घाम येत नाही. मात्र यामुळे तुमच्या शरीरालाही हानी पोहोचते. कारण घामाद्वारे शरीरातून भरपूर विषारी पदार्थ बाहेर पडतात.

डियोड्रन्टमध्ये असते अॅल्युमिनियम आणि पॅराबेन्स संयुग

वैद्यकीय अहवालात असे आढळून आले आहे की, डियोड्रन्टमध्ये विविध रसायनांचा वापर केला जातो ज्यामुळे ते जास्त काळ शरीरावर टिकतात. अॅल्युमिनियम संयुग याच रसायनांपैकी एक आहे. मुळात अॅल्युमिनियम संयुग हे असे घटक आहेत जे घाम येणे टाळते. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनने प्रकाशित केलेल्या अलीकडील संशोधन आढळले की डियोड्रन्टचा सतत वापर संवेदनशील पेशींना नुकसान पोहोचवू शकतो. डियोड्रन्टवरील अभ्यासात असे आढळून आले की पॅराबेन्स नावाचे संयुग बॅक्टेरिया आणि बुरशीमुळे होणारी दुर्गंधी टाळण्यासाठी वापरले जातात. पॅराबेन्स त्वचेमध्ये शोषले जाऊ शकते. हे शरीरात गेल्यानंतर इस्ट्रोजेन म्हणून कार्य करू शकते. जे महिलांच्या लैंगिक विकासासाठी, स्तन आणि शारीरिक कार्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे.

विकेंडला बाहेर जाण्याचा कंटाळा आलाय? घरीच पार्टनरसोबत असा स्पेंड करा क्वालिटी टाइम

डियोड्रन्ट लावल्यानंतर त्वचेवर जळजळ का होते?

डियोड्रन्टचा मर्यादित वापर हानीकारक नसेल. तर मग डियोड्रन्ट लावल्यानंतर इरिटेशन (Skin Irritation Due To Deodorant) का होते? अमर उजालामध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, या संदर्भात संशोधकांचे म्हणणे आहे की काही लोकांना डियोड्रन्ट किंवा अँटीपर्सपिरंट्सची अॅलर्जी (Allergy Of Deodorant) असू शकते. संशोधनात असे आढळले आहे की, हे प्रोपीलीन ग्लायकॉल नावाचे रसायन, सुगंधी तेल आणि लॅनॉलिन सारख्या घटकांमुळे असू शकते. डियोड्रन्ट लावल्यानंतर जळजळ होणे याचा अर्थ असा नाही की ते कार्सिनोजेनिक आहे. पेन मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात संशोधकांनी म्हटले आहे की, डियोड्रन्टचा मध्यम प्रमाणात वापर हानिकारक असल्याचे आढळले नाही.

Vastu Tips : जेवणासाठी कोणती दिशा असते योग्य आणि कोणत्या दिशेला जेवण करणे टाळावे?

डियोड्रन्टमुळे होऊ शकतो कॅन्सर?

अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या संशोधकांना असेही आढळून आले की, डियोड्रन्टमुळे कर्करोग (Can Deodorant Cause Cancer) होतो. या दाव्याला कोणताही ठोस वैज्ञानिक आधार नाही. नॅशनल किडनी फाउंडेशनच्या संशोधकांचे म्हणणे असले तरी, ज्या लोकांना किडनीच्या समस्या आहेत त्यांनी अँटीपर्स्पिरंट्सच्या वापराबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. ते शरीरासाठी हानिकारक असू शकतात. संशोधकांचे म्हणणे आहे की डियोड्रन्टमध्ये वापरलेले अॅल्युमिनियम किंवा पॅराबेन्स संयुग हानिकारक असल्याचे आढळले नसले तरी संवेदनशील त्वचा आणि जोखीम घटक असलेल्या लोकांमध्ये दीर्घकालीन वापरामुळे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाच्या विकासास प्रोत्साहन देऊ शकते.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Lifestyle