2020 साल कसं वाटतंय? शब्दांतून नाही तर नव्या EMOJI तून सांगा तुमचा MOOD

2020 साल कसं वाटतंय? शब्दांतून नाही तर नव्या EMOJI तून सांगा तुमचा MOOD

2020 वर्षात ज्या परिस्थितीतून आपण जात आहोत त्याबाबत आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी अखेर नवे Emoji आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : कोरोनाच्या या परिस्थितीत तुम्हाला कसं वाटतं, असं कुणी विचारलं तर तुम्ही शब्दांमधून भरभरून व्यक्त होता. आता तुमच्या या भावना अगदी थोड्यात व्यक्त करण्यासाठी आले आहेत नवे EMOJI. 2020 या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. हे वर्ष तुम्हाला कसं वाटतं आहे, हे सांगण्यासाठी आता तुम्हाला नव्या इमोजीची मदत होणार आहे.

facebook, whatsapp अगदी साध्या मेसेजवरही आपण चॅट करताना शॉर्टकट वापरतो, म्हणजेच कमी शब्दात व्यक्त होतो. अगदी थोड्यात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी उपयोगी ठरतात ते EMOJI. इमोजी तयार करणाऱ्या The Unicode Consortium कंपनीने नवे इमोजी आणले आहेत. जे आता तुमच्या स्मार्टफोनवर तुम्हाला मिळतील.

या संस्थेने नवीन 13 इमोजी तयार केलेत. त्यापैकी 6 इमोजी या वर्षी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर पुढील वर्षी सात इमोजी वापरण्यासाठी  उपलब्ध होतील. सहा इमोजींपैकी spiral eyes आणि  face exhaling हे दोन इमोजी या वर्षीच्या अनुभव सांगण्यासाठी अगदी योग्य आहेत. भीती आणि काही योग्य नाही हे दर्शवणारे हे इमोजी मोठ्या प्रमाणात वापरले जातील असा अंदाज बांधला जात आहे. याशिवाय  दाढी वाढलेला पुरुष आणि सोबत महिलेलाही दाढी-मिशी असाही इमोजी आहे.

हे वाचा - रिलायन्सने सुरू केलं 'JioBrowser', गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्ट एजला देणार टक्कर

2020 हे वर्ष संपूर्ण जगासाठीच भयंकर ठरलं आहे. या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील नागरिकांचं जीवन विस्कळीत झालं आहे. केवळ कोरोनाची महासाथच नाही तर मोठं आर्थिक संकटही जगावर आलं आहे. सगळीकडे लॉकडाउन लागू झाल्यानं अर्थचक्रच जणू थांबलं. यामुळे संपूर्ण जगातील लोक त्रस्त झाले आहेत. लोकांची हीच भावना दर्शवण्यासाठी हे नवे इमोजी तयार करण्यात  आले आहेत.

हे वाचा - सूर्यग्रहणात जे जे करू नये तेच सर्व गर्भवतीने केलं आणि...

कोरोनाचं संकट कमी की काय त्यात ऑस्ट्रेलियातील जंगलांना लागलेली आग, अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर लागलेली आग, आसाममध्ये आलेला प्रचंड पूर आणि केरळमध्ये झालेलं भूस्खलन अशी नैसर्गिक आपत्ती. शिवाय अमेरिकेत नागरिकांनी श्वेतवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात केलेलं आंदोलन अशा अनेक त्रासदायक गोष्टी या वर्षी घडल्या आहेत. या सर्व भावना व्यक्त करण्यासाठी इमोजींचा आधार लोक घेतात. त्या व्यक्त करता याव्यात म्हणूनच हे नवे इमोजी तयार झाले आहेत आणि या इमोजीचा तुम्हाला व्यक्त होण्यासाठी नक्कीच फायदा होईल.

Published by: Priya Lad
First published: September 22, 2020, 7:33 PM IST

ताज्या बातम्या