मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /या कंपनीत केला होता इलॉन मस्क यांनी नोकरीसाठी अर्ज; नोकरी नाही मिळाली म्हणून स्वतःच उभारली कंपनी

या कंपनीत केला होता इलॉन मस्क यांनी नोकरीसाठी अर्ज; नोकरी नाही मिळाली म्हणून स्वतःच उभारली कंपनी

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, कार उत्पादक कंपनी टेस्लाचे (Tesla) संस्थापक आणि अंतराळ क्षेत्रातील कंपनी स्पेसएक्सचे (SpaceX) मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या इलॉन मस्क यांची ख्याती मोठी आहे. पण कधी काळी त्यांनीही नकार पचवला होता.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, कार उत्पादक कंपनी टेस्लाचे (Tesla) संस्थापक आणि अंतराळ क्षेत्रातील कंपनी स्पेसएक्सचे (SpaceX) मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या इलॉन मस्क यांची ख्याती मोठी आहे. पण कधी काळी त्यांनीही नकार पचवला होता.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, कार उत्पादक कंपनी टेस्लाचे (Tesla) संस्थापक आणि अंतराळ क्षेत्रातील कंपनी स्पेसएक्सचे (SpaceX) मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या इलॉन मस्क यांची ख्याती मोठी आहे. पण कधी काळी त्यांनीही नकार पचवला होता.

    नवी दिल्ली, 24 एप्रिल : इलॉन मस्क (Elon Musk) हे नाव माहीत नाही अशी व्यक्ती विरळाच असेल. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून इलॉन मस्क ओळखले जातात. पृथ्वीपासून अवकाशापर्यंत सर्वत्र त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे. जगातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी टेस्लाचे (Tesla) संस्थापक आणि अंतराळ क्षेत्रातील कंपनी स्पेसएक्सचे (SpaceX) मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या इलॉन मस्क यांची ख्याती जगभरात आहे. अशा इलॉन मस्क यांनी कधी काळी नोकरीसाठी एका कंपनीत अर्ज केला होता, हे जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. इलॉन मस्क यांनी एका इंटरनेट कंपनीत (Internet Company) नोकरीसाठी (Job) अर्ज केला होता; पण आपल्या लाजाळू स्वभावामुळे ते कोणाशीही बोलू शकत नसत. त्यामुळं त्यांची नोकरीची संधी गेली आणि मग त्यांनी स्वत:चीच इंटरनेट कंपनी स्थापन केली.

    सोशल मीडियावर सक्रिय :

    जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले इलॉन मस्क सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ट्विटर युजर प्रणय पाथोले (Pranay Pathole) यानं नुकतीच एक पोस्ट करून इलॉन मस्क यांनी 1995मध्ये एका कंपनीत नोकरीसाठी अर्ज केल्याची माहिती दिली आहे. या पोस्टला प्रतिसाद देत मस्क यांनीही हे खरं असल्याचं सांगितलं आहे.

    (हे वाचा-तरुण शिक्षकाने तोडले सर्व विक्रम, UGC-NET परीक्षा तब्बल 6 विषयांत उत्तीर्ण)

    लाजाळू स्वभावामुळे मिळाली नाही नोकरी :

    तंत्रज्ञानाच्या दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वी, इलॉन मस्क यांनी आपल्याला काय आवडतं करायला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यातूनच त्यांनी 1995 मध्ये नेटस्केप (Netscape) नावाच्या एका इंटरनेट कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला. रेझ्युमे पाठवल्यानंतर तासनतास त्यांच्या लॉबीत वाट पाहिली, पण लाजाळू स्वभावामुळे त्यांनी कोणालाही काहीही विचारलं नाही. त्यामुळं त्यांना तिथं नोकरी मिळाली नाही. नंतर ही त्यांनी इतरत्र आपल्या स्वभावामुळे फार प्रयत्न केले नाहीत आणि अखेर नोकरीचा नाद सोडला आणि स्वतःचीच झिप-2 ही कंपनी सुरू केली, असं प्रणय पाथोले यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

    (हे वाचा- लहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं)

    या पोस्टची दखल घेत स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी उत्तरही दिलं आहे. ‘जॉब मिळू शकला असता पण इंटरनेट कंपनीत नाही’, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मस्क यांना इंटरनेटमध्ये फार रस असल्यानं त्यांनी नेटस्केपमध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पहिला वेब ब्राउझर, नेटस्केप नेव्हिगेटर या नेटस्केप कंपनीनं बनवला होता. मस्क यांच्याबद्दलची ही माहिती वाचून लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून, या पोस्टसना चाहत्यांची उदंड पसंती मिळत आहे.

    First published:
    top videos

      Tags: Elon musk, Space-x