मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

तरुण शिक्षकाने तोडले सर्व विक्रम, UGC-NET परीक्षा तब्बल 6 विषयांत उत्तीर्ण; इंडियाज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

तरुण शिक्षकाने तोडले सर्व विक्रम, UGC-NET परीक्षा तब्बल 6 विषयांत उत्तीर्ण; इंडियाज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

अमित यांचं नाव नुकतंच 'इंडियाज बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंदवलं गेलं. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) घेतली जाणारी नेट परीक्षा (UGC-NET) त्यांनी सहा वेगवेगळ्या विषयांत उत्तीर्ण केली आहे. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय आहेत.

अमित यांचं नाव नुकतंच 'इंडियाज बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंदवलं गेलं. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) घेतली जाणारी नेट परीक्षा (UGC-NET) त्यांनी सहा वेगवेगळ्या विषयांत उत्तीर्ण केली आहे. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय आहेत.

अमित यांचं नाव नुकतंच 'इंडियाज बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंदवलं गेलं. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) घेतली जाणारी नेट परीक्षा (UGC-NET) त्यांनी सहा वेगवेगळ्या विषयांत उत्तीर्ण केली आहे. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय आहेत.

नवी दिल्ली, 15 एप्रिल : शिक्षकावर खूप मोठी जबाबदारी असते. चांगला शिक्षक विद्यार्थ्यांना अनेक नावीन्यपूर्ण मार्गांनी शिकण्याची प्रेरणा देऊ शकतो. पण आधुनिक शिक्षणपद्धतीत मानवीसंबंधांची कमतरता जाणावते. अमित कुमार निरंजन (Amitkumar Niranjan) या कानपूरच्या (Kanpur) तरुण शिक्षकाचे विचार मात्र वेगळे आहेत. सह-अनुभूतीआणि तर्काचा योग्य वापर करून विषय शिकवणं हा शिकवण्याचा योग्य मार्ग आहे, असं त्यांना वाटतं. अमित यांचं नाव नुकतंच 'इंडियाज बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंदवलं गेलं. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) घेतली जाणारी नेट परीक्षा (UGC-NET) त्यांनी सहा वेगवेगळ्या विषयांत उत्तीर्ण केली आहे. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय आहेत. या प्रत्येक विषयात असलेल्या आपल्या तज्ज्ञतेमुळे शिकवण्याचा दर्जा उंचावतो आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत सुधारणा होते, असं ते म्हणतात.

10 वर्षांचे अविरत प्रयत्न आणि कष्ट यांमधून अमित यांना सहा विषयांत यूजीसी-नेट परीक्षा उत्तीर्ण होता आली. जून 2010 मध्ये ते यूजीसी-नेट-जेआरएफ (UGC-NET-JRF) परीक्षा कॉमर्स (Commerce) विषयात उत्तीर्ण झाले. त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांनी इकॉनॉमिक्स (Economics) या विषयातही यूजीसी-नेट परीक्षा उत्तीर्ण केली. महत्त्वाकांक्षी शिक्षकाचा प्रवास इथे थांबत नाही.

डिसेंबर 2012 मध्ये मॅनेजमेंट, डिसेंबर 2015 मध्ये एज्युकेशन (Education),डिसेंबर 2019 मध्ये पॉलिटिकल सायन्स (Political Science) आणि जून 2020 मध्ये सोशिऑलॉजी (Sociology) या विषयांमध्ये अमित यूजीसी-नेट परीक्षा उत्तीर्ण झाले. एवढंच नव्हे तर कानपूरच्या आयआयटीमधून (IIT Kanpur) त्यांनी 2015 मध्ये इकॉनॉमिक्स या विषयात पीएचडीही मिळवली आहे.

यूजीसी-नेटपरीक्षा सहा वेगवेगळ्या विषयांत देण्याचं का ठरवलं आणि त्याची प्रेरणा कुठून मिळाली, हे जाणून घेण्यासाठी न्यूज 18 ने त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, 'शिक्षण हे सेवेपेक्षाही एखाद्या व्यवसायासारखं आहे. यासाठी मला माझ्या विद्यार्थ्यांकडूनच प्रेरणा मिळाली. विद्यार्थ्यांचं कुतुहल आणि कधीही न संपणारे प्रश्न हा माझ्यासाठी कधीही न संपणारा प्रेरणेचा स्रोत आहे,' असं त्यांनी सांगितलं.

अमित 37वर्षांचे असून, इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स या विषयांत शिकवण्याचा 12 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. तज्ज्ञता मिळवलेल्या या सहा विषयांचं सखोल ज्ञान मिळवणं एवढंच त्यांचं उद्दिष्ट नाही, तर भविष्यात नॅशनल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याचीही त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.

(वाचा - भारतीय मोबाईल युजरच्या फोनला मालवेअर अटॅकचा धोका; हा Malware कसा ओळखाल?)

अमित शिक्षक बनले ते स्वतःला शिकण्याच्या चांगल्या सुविधा न मिळाल्यामुळे. चांगल्या मार्गदर्शना अभावी धडपडणाऱ्या विद्यार्थ्याचं दुःख काय असतं, याची आपल्याला जाणीव असल्याचं ते सांगतात. अशा प्रकारचे अनुभव भविष्यात कोणाही विद्यार्थ्यांना येऊ नयेत यासाठी भारतीय शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणला पाहिजे, असं त्यांना वाटतं, जेणेकरून शिक्षकी पेशात येणाऱ्या व्यक्ती स्वेच्छेने यायला हव्यात, मनाविरुद्ध यायला नकोत. अशा शिक्षण पद्धतीसाठी ते नियोजनही करत आहेत.

भारतातली मूलभूत शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांचं तर्कशास्त्र आणि मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यासाठी पुरेशी मजबूत आहे आणि आयआयटी, आयआयएम यांसारख्या संस्था हे त्याचे पुरावे आहेत, असं अमित म्हणतात. 'सीबीएसई, आयसीएसई यांसारखी चांगली देशांतर्गत शिक्षण मंडळं असताना इंटरनॅशनल बोर्ड्सची भलामण करण्याचीआवश्यकता नाही,' असं ते म्हणतात.

(वाचा - फोन हरवल्यास किंवा चोरी झाल्यास WhatsApp Account असं करा प्रोटेक्ट)

अमित यांनी सहा विषयांत तज्ज्ञता प्राप्त केली आहे; पण पॉलिटिकल सायन्स हा त्यांच्या सर्वाधिक आवडीचा विषयआहे. 'आजच्या जगात प्रत्येक जण राजकीय मत तयार करत असतो. त्यामागची बहुतांश पार्श्वभूमी सोशल मीडियावर आधारित असते. सोशल मीडिया बहुतांश वेळा योग्य नसतो आणि संतुलितही नसतो. त्यामुळे भारतीय राजकारण समजून घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला मूलभूत कायदे, हक्क, लोकशाहीची तत्त्वं आदी गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे,' असं अमित म्हणतात. तसंच राजकारणात जाण्याचा आपला कोणताही विचार नाही, पण योग्य माहिती आणि ज्ञान असणं हा खजिनाच असतो, असंही ते म्हणाले.

सायकॉलॉजी (Psychology), फिलॉसॉफी (Philosophy),लिटरेचर (Literature) अशा आणखी काही विषयांत यूजीसी-नेट परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या दिशेने अमित यांचे प्रयत्न सुरू आहेत. स्वतःचं एक चांगलं प्रकाशन सुरू करण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत, त्यासाठी चांगल्या लेखकांच्या ते शोधात आहेत.

First published:

Tags: Kanpur