चंदीगढ, 19 एप्रिल : कष्ट करायची तयारी असेल, तर यश आपल्या पायावर लोळण घालतं. अडचणींवर मात करत स्वप्नपूर्तीचा आनंद काही वेगळाच असतो. वडिलांच्या निधनानंतर मुलाच्या शिक्षणासाठी दिवस-रात्र झटणाऱ्य़ा आईसाठी मुलाने यश मिळवलं असेल तर, त्याचे मोल अनमोल असते. तन्मय महाजनचे हे असंच एक उदाहरण आहे. तन्मयचे वडील त्याच्या लहानपणीच वारले. त्याच्या आईने घराची जबाबदारी उचलंत मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. घर चालविण्यासाठी त्या कपडे शिवण्याचं काम करीत होत्या. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी कधीच कोणाकडे हात पसरले नाहीत.
शाळेपासूनच अभ्यासू असलेल्या तन्मयने 2019 मध्ये पंजाब इंजिनियरींग कॉलेजमधून (Punjab Engineering College) सिव्हील इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर त्याने UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. त्याने इंजीनियरिंग सर्विसेस(Indian Engineering Service) मध्ये 64वा रँक मिळवला. आता तो IES अधिकारी बनला आहे. तन्मयने GATE परीक्षेतही आठवा रँक मिळवला आहे. तन्मयच्या या यशात त्याची आई विपिन गुप्ता यांचा मोठा हात आहे. तन्मयचे वडील गेल्यानंतर आईवर सगळी जबाबदारी आली होती. आईने शिवणकाम केलं. त्यातुन मिळणाऱ्या पैशांवर त्यांची गुजराण होत होती. तन्मय हुशार असल्याने मुलाने इंजिनियर व्हावं अशी आईची इच्छा होती. तन्मयने सिव्हील इंजिनियरींगचा अभ्यास करताना गेट आणि इंजीनियरिंग सर्विसेसाठीही तयारी केली.
हे ही वाचा-तरुण शिक्षकाने तोडले सर्व विक्रम, UGC-NET परीक्षा तब्बल 6 विषयांत उत्तीर्ण
शिक्षणाचा खर्च करण्यासाठी आणि आईला हातभार लावण्यासाठी तन्मयही खाजगी कोचींग क्लासेसमध्ये शिकवत होता. हे यश तन्मयला सहज मिळालं नाही. 2 वर्ष योजनाबद्धरितीने अथक मेहनत घेत अभ्यास केला. तन्मयची मोठी बहिणही आईप्रमाणे त्यांच्या पाठिशी उभी राहिली. तन्मयची पोस्टींग लवकरच होईल. देशसेवा हेच त्याचं ध्येय आहे. अभ्यासात सातत्य आणि मेहनत हे त्याच्या यशाचं सिक्रेट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Childhood struggle, Inspiration, Inspiring story, Motivation, Punjab