मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

दर सेकंदाला 67 लाख रुपये कमवतात Elon Musk; लहानपणीच केलेली व्यवसायाला सुरुवात

दर सेकंदाला 67 लाख रुपये कमवतात Elon Musk; लहानपणीच केलेली व्यवसायाला सुरुवात

एलन मस्क आज जगातले सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. खूप संघर्ष करत ते या स्थितीपर्यंत येऊन पोहोचले आहेत.

एलन मस्क आज जगातले सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. खूप संघर्ष करत ते या स्थितीपर्यंत येऊन पोहोचले आहेत.

एलन मस्क आज जगातले सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. खूप संघर्ष करत ते या स्थितीपर्यंत येऊन पोहोचले आहेत.

नवी दिल्ली 28 जून: स्पेस-एक्स (Space X) या कंपनीचे संस्थापक आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांचा आज वाढदिवस आहे. 28 जून 1971 रोजी जन्मलेल्या एलन मस्क यांना आज 50 वर्षं पूर्ण झाली. त्या निमित्ताने, आम्ही आज तुम्हाला त्यांच्या आयुष्यातला संघर्ष आणि अन्य गोष्टींबद्दल माहिती देत आहोत. एलन मस्क आज जगातले सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. खूप संघर्ष करत ते या स्थितीपर्यंत येऊन पोहोचले आहेत. बोलून तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा कृती करण्यावर त्यांचा अधिक भर आहे. तरुणांना त्यांच्या जीवनातून शिकण्यासारखं बरंच काही आहे. मस्क दर सेकंदाला 67 लाख रुपये कमावतात, असं म्हटलं जातं. तरीही त्यांच्या मनात कायम नव्या कल्पनांबद्दल काम सुरू असतं.

दक्षिण आफ्रिकेत जन्म

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) जन्म झालेले एलन मस्क वयाच्या 17व्या वर्षी कॅनडात (Canada) आले. लहानपणापासूनच त्यांना पुस्तकं वाचण्याचा छंद होता. लहानपणी ते खूपच शांत स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांना त्यांचे मित्र खूप त्रास द्यायचे. 10 वर्षांचे असतानाच त्यांनी कम्प्युटर प्रोग्रामिंग शिकून घेतलं होतं. वयाच्या 12व्या वर्षीच त्यांनी 'ब्लास्टर' (Blaster Video Game) नावाचा एक व्हिडिओ गेम तयार केला होता. एका स्थानिक मॅगझिनने तो गेम एलन यांच्याकडून पाचशे अमेरिकी डॉलर एवढ्या किमतीला खरेदी केला. एलन मस्क यांचं व्यावसायिक जीवनातलं हे पहिलं पाऊल होतं.

Post Office च्या या योजनेत गुंतवणूक फायद्याची; काही महिन्यांतच दुप्पट होईल रक्कम

कुटुंब, शिक्षण

माये मस्क आणि एरॉल मस्क हे एलन मस्क यांच्या आई आणि वडिलांचं नाव. त्यांची आई मॉडेल आणि डाएटिशियन होती, तर त्यांचे वडील इलेक्ट्रोमेकॅनिकल इंजिनीअर होते. एलन यांच्यासह मस्क दाम्पत्याला तीन मुलं. त्यापैकी एलन सर्वांत मोठे. एलन यांना बालपणापासून पुस्तकं आणि कम्प्युटरचा नाद होता. 1995 साली एलन पीएचडी करण्यासाठी अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीत पोहोचले. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत त्यांनी अॅप्लाइड फिजिक्स (Applied Physics) विभागात प्रवेशही घेतला; मात्र दोनच दिवसांत ते सगळं सोडून परत आले. त्याच दरम्यान एलन यांच्यापेक्षा 15 महिन्यांनी लहान असलेले भाऊ किम्बल यांनी क्वीन्स युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं.

त्यानंतर किम्बल कॅलिफोर्नियाला एलन यांच्याकडे आले. दोघांनी मिळून स्टार्टअप कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. जिप-2 असं त्या कंपनीचं नाव ठेवण्यात आलं. ती एक ऑनलाइन बिझनेस डिरेक्टरी होती. त्यात नकाशेही दिलेले होते. त्यातून मिळालेल्या पैशांच्या आधारे 27 व्या वर्षी एलॉन मस्क यांनी 'एक्स डॉट कॉम' (X Dot Com) ही कंपनी उभारली. पैसे ट्रान्स्फर करण्याच्या यंत्रणेत क्रांती आणण्याचा दावा या कंपनीने केला होता. 2002 साली ही कंपनी 'ई-बेय'ने खरेदी केली. त्यासाठी मस्क यांना 165 दशलक्ष डॉलर एवढं मूल्य मिळालं. मस्क यांची तीच कंपनी आज पे-पल (PayPal) या नावाने ओळखली जाते. मस्क यांच्या करिअरमधला हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा होता.

1993 साली एलन मस्क यांनी एक जुनी बीएमडब्ल्यू कार खरेदी केली होती. 1978 साली तयार झालेल्या त्या कारच्या काचा बदलण्यासाठी एलन मस्क यांनी भंगारच्या दुकानातून 20 डॉलरमध्ये जुन्या काचा खरेदी केल्या होत्या.

Gold price today: दोन महिन्याच्या निच्चांकी स्तरावर पोहचल्या किंमती,पाहा आजचा दर

2004 साली एलन मस्क यांनी टेस्ला (Tesla) या इलेक्ट्रिक कार कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. 'भविष्यात सगळं काही इलेक्ट्रिक असेल. अवकाशात जाणाऱ्या रॉकेट्सचाही त्यात अपवाद असणार नाही. हा बदल घडवून आणण्यासाठी टेस्ला ही कंपनी महत्त्वाची भूमिका निभावेल,' अशी भूमिका त्यावेळी मस्क यांनी मांडली होती.

टेस्लामध्ये केवळ इलेक्ट्रिक कार्स (Electric Cars) बनवल्या जात नाहीत, तर इलेक्ट्रिक कार्ससाठी लागणारे सुटे भाग, बॅटरीजदेखील बनवल्या जातात. त्यांची विक्री अन्य कार उत्पादक कंपन्यांना केली जाते.

एलन यांचं आपल्या वडिलांशी फार पटलं नाही. एलन यांच्या वडिलांनी त्यांच्या स्वप्नांना कधीच प्रोत्साहन दिलं नाही. आपलं बालपण अनेक समस्यांनी भरलेलं होतं, असं एलन यांनी यापूर्वी एकदा सांगितलं होतं. अनेकदा एलन यांनी वडिलांशी बोलणंही बंद केलं होतं. आपल्या घरात घुसलेल्या तीन चोरांना एलन यांच्या वडिलांनी गोळ्या घातल्या होत्या.

मस्क यांचं कौटुंबिक जीवन

एलन मस्क यांनी कॅनडातल्या लेखिका जस्टिन यांच्याशी 2000 साली विवाह केला. त्यांचं हे नातं आठ वर्षं टिकलं. त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. 2010मध्ये एलन यांनी ब्रिटिश अभिनेत्री तालुला राइली यांच्याशी विवाह केला; मात्र हा विवाह केवळ दोनच वर्षं टिकला. 2013मध्ये एलन यांनी तिसरा विवाह केला; मात्र तीनच वर्षांत पुन्हा घटस्फोट झाला. त्यानंतर एलन आणि सुपरस्टार अभिनेत्री अँबर हर्ड यांच्यातल्या रिलेशनशिपबद्दल अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या; मात्र दोघांनीही आपापल्या बिझी शेड्युलमुळे लवकरच ब्रेक-अप केलं.

पहिली पत्नी जस्टिन यांच्यापासून एलन यांना सहा मुलं झाली. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. याच वर्षी मे महिन्यात एलन यांना गर्लफ्रेंडपासून एक मुलगा झाला आहे. एलॉन यांनी त्याचं नाव X Æ A-12 असं ठेवलं. त्यानंतर ते बदलून X Æ A-Xii असं करण्यात आलं. सोशल मीडियावर या नावामुळे बरीच चर्चा झाली होती. अशा प्रकारे एलन यांना आधीचे पाच आणि आताचा एक अशी सहा मुले आहेत.

First published:

Tags: Elon musk, Money, Start business