जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Winter Health: या पालेभाज्या आहारात घ्या, हिवाळ्यात राहाल एकदम फिट-निरोगी

Winter Health: या पालेभाज्या आहारात घ्या, हिवाळ्यात राहाल एकदम फिट-निरोगी

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

आजारांपासून वाचण्यासाठी पालेभाज्या आपणाला नैसर्गिकरित्या ताकद देत असतात. बऱ्याचशा पालेभाज्या आपणाला आवडत नसतात, परंतु हिवाळ्याच्या हंगामामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचा आहारात समावेश असायला हवा. खाली सविस्तर पाहुया.

  • -MIN READ Trending Desk Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर : हिवाळा म्हटलं की, सर्वत्र थंड वातावरण असतं. इतर ऋतुंच्या तुलनेत या ऋतुमध्ये रोजच्या वापरातील अन्नघटकांचे प्रमाण वाढवायला हवे, असा सल्ला आहारतज्ज्ञ देत असतात. शिवाय आजारांपासून दूर राहण्यासाठी या काळात भरपूर व्यायामही करायला हवा, असं आवर्जून सांगितल जातं. शरीराची अधिक उष्माकांची गरज भागेल व सर्व पोषक घटक मिळतील, अशा पालेभाज्यांचं सेवन केल्यास त्याचा निरोगी आयुष्यासाठी निश्चितच फायदा होऊ शकतो. हिवाळ्यात आहारामध्ये आवर्जून समाविष्ट केल्या जाव्यात, अशा काही महत्त्वाच्या पालेभाज्या व त्यांच्या गुणांविषयी ‘ झी न्यूज हिंदी ’नं वृत्त दिलं आहे. हिवाळा आला की, सर्दी-पडसं, खोकला, ताप अशा आजारांच्या तक्रारी वाढत असतात. त्यामुळे या काळात प्रकृतीकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आजारापासून वाचण्यासाठी पालेभाज्या आपणाला नैसर्गिकरित्या ताकद देत असतात. बऱ्याचशा पालेभाज्या आपणाला आवडत नसतात, परंतु हिवाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचा आहारात समावेश असायला हवा. यातील काही महत्त्वाच्या पालेभाज्यांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. पौष्टिक घटकांनी परिपूर्ण पालक पालक पौष्टिक घटकांनी परिपूर्ण आहे. यात व्हिटॅमिन बी, सी आणि ई यांचा समावेश असतो. हिवाळ्यामध्ये अनेक आजारांपासून वाचण्यासाठी पालक महत्त्वाची भूमिका बजावतो. पालकामध्ये आयर्न, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियमसारखे पौष्टिक घटक असतात. पालकाच्या वेगवेगळ्या डिश तयार करून आहारामध्ये त्यांचा समावेश करू शकता. चाकवतमध्ये आठ प्रकारचे व्हिटॅमिन्स संपूर्ण भारतभरात सेवन केली जाणारी चाकवताची भाजीही अत्यंत गुणकारी अशी आहे. यात मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्नसारखे पोषक घटक असतात. यात आठ प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात. या पालेभाजीत व्हिटॅमिन ए, बी 1 आणि व्हिटॅमिन सी याचा समावेश असतो.

    News18लोकमत
    News18लोकमत

    तांदुंळशाची भाजीत प्रोटीन प्रमाण अधिक तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तांदुळशाच्या भाजीचं सेवन करायला हवं. या पालेभाजीत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, आयर्न, कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हिवाळ्यात याचे आर्वजून सेवन करायला हवे. गाजर गाजर पौष्टिक घटकांचा खजिना आहे. सर्वांचा आवडता गाजराचा हलवा तर आपण नेहमी खातच असतो. पण हिवाळ्यात गाजराचा आहारात समावेश करायला हवा. यात व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि आयर्नसारखे घटक आहेत. सलाड म्हणूनही गाजराचे सेवन करायला हवं. हे वाचा -  PHOTO पाहूनही गुदमरायला होईल; राजधानी दिल्लीतील भयानक वास्तव बीट वजन कमी करण्यासाठी फायदेशीर फळ आणि भाजीपाला या दोन्हींमध्ये बीटरूटचा समावेश होतो. आरोग्यासाठी बीट अत्यंत गुणकारी आहे. वजन कमी करायचे असेल तर याची चांगली मदत होऊ शकते. यात सोडियम, पोटॅशियम, फायबरसारखे पोषक घटक आढळतात. रक्ताची कमतरता असेल तर याचे सेवन आर्वजून करायला हवे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात