जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / खराब कोलेस्ट्रॉलसाठी या हेल्दी गोष्टी आहारात घ्या, Heart Attack ची मग चिंता नाही

खराब कोलेस्ट्रॉलसाठी या हेल्दी गोष्टी आहारात घ्या, Heart Attack ची मग चिंता नाही

त्यामुळे शरीराच्या इतर भागात जाणाऱ्या रक्तालाही अडथळा निर्माण होतो आणि घातक स्थिती बनते.

त्यामुळे शरीराच्या इतर भागात जाणाऱ्या रक्तालाही अडथळा निर्माण होतो आणि घातक स्थिती बनते.

Heart Attack: खाण्याच्या चुकीच्या सवयी, आरोग्यास अपायकारक स्निग्ध पदार्थांच्या जास्त सेवनामुळं शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढतं, ज्यामुळं हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. कोलेस्टेरॉल जास्त वाढू नये यासाठी आहार कसा असावा याबाबत जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 जून : हार्ट अ‍ॅटॅक (Heart attack) हा शब्द काही वर्षांपूर्वी फक्त वयाची साठी उलटून गेलेल्या लोकांच्या बाबतीत ऐकायला मिळायचा. हृदयविकार म्हणजे ज्येष्ठांचा आजार (senior citizen) अशीच या आजाराबद्दलची सर्वसाधारण धारणा होती. पण गेल्या काही दिवसांत तिशीतल्या तरूणांनाही (Youth) हार्ट अ‍ॅटॅकने जीव गमावण्याची वेळ आली आहे. काही वेळा खाण्याच्या चुकीच्या सवयी, आरोग्यास अपायकारक स्निग्ध पदार्थांच्या जास्त सेवनामुळं शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढतं, ज्यामुळं हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. शरीरातील कोलेस्टेरॉल (Cholesterol control food) वाढल्याने हृदयाची क्षमता कमी होणं आणि हृदयविकाराची तीव्रता वाढणं हा धोका निर्माण होत आहे. कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवलं आणि त्यासाठी आहारात काही पदार्थ आवर्जून खाल्ल्यास हृदय निरोगी ठेवता येतं. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, किंवा ज्यांना गेल्या काही दिवसांत हृदयविकाराची लक्षणं दिसून येत आहेत त्यांनी  रोजच्या आहारात अक्रोड खाण्याला प्राधान्य दिल्यास हृदयाची कार्यक्षमता वाढते. सूर्यफूलांच्या बियांमध्ये शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्याची ताकद आहे. त्यामुळे सूर्यफूलच्या बिया (Sunflower seeds) खाणं फायदेशीर ठरू शकतं. मोहरीच्या तेलाचा आहारात वापर केल्यास कोलेस्ट्रॉवर नियंत्रण आणि पर्यायाने हृदयविकारापासून बचाव होऊ शकतो. सर्व प्रकारची कडधान्य हा तर सकस आहाराचा पाया आहे. त्यामुळे आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा, (Grains) तसंच उसळ स्वरूपातील भाज्या, कडधान्यांचं सूप हे असलंच पाहिजे. ज्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं जे कोलेस्टेरॉलचं शरीरातील प्रमाण वाढू देत नाही. या पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश केला तर हृदय अधिक सुदृढ होईल. फळे - सफरचंद : सफरचंद खाल्ल्याने वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यासही मदत होईल. सफरचंदांमध्ये पेक्टिनचे प्रमाण जास्त असते, जे फायबर असते आणि शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकते. लिंबूवर्गीय फळे : लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्याने देखील तुम्हाला फायदा होईल. तुम्ही संत्री आणि लिंबू खाऊ शकता. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल. लिंबूवर्गीय फळे व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्त्रोत आहेत आणि रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवतात. हे वाचा -  Diabetes असेल तर या भाज्या चुकून पण खायच्या नसतात; कंट्रोलमध्ये नाही राहणार शुगर द्राक्षे : द्राक्ष खाणे तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. याला तुम्ही हिवाळ्यातील हेल्दी नाश्ताही म्हणू शकता. द्राक्षे खाल्ल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त, त्यामुळे कोलेस्ट्रॉल देखील कमी होईल.

एवोकॅडो: बरेच लोक या गैरसमजामुळे एवोकॅडोचे सेवन करत नाहीत कारण त्यांना वाटते की, यामुळे कोलेस्ट्रॉल वाढेल. मात्र, असे होत नाही. एवोकॅडोमध्ये कोलेस्ट्रॉल शून्य असते. हा निरोगी चरबीचा चांगला स्त्रोत देखील आहे.

हे वाचा -  पुरुषांनी नक्की घ्यायला हव्यात या लसी; गंभीर आजारांचा राहत नाही धोका

मात्र, काही झाले तरी फळांचे सेवन माफक प्रमाणात करा. कारण, त्यात फ्रुक्टोज असते आणि ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने साखरेचे प्रमाण वाढू शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात