• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • आश्चर्य! प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह; अ‍ॅपेंडिक्सचं ऑपरेशन करायला गेली आणि पोटातून निघालं बाळ

आश्चर्य! प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह; अ‍ॅपेंडिक्सचं ऑपरेशन करायला गेली आणि पोटातून निघालं बाळ

दाम्पत्याने अनेक प्रयत्नांना मूल होण्याची आशा सोडली त्यांच्या पदरात नकळत अचानकपणे मूल पडलं.

 • Share this:
  ब्रिटन, 13 जुलै: काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्या नशीबातच असतात असं म्हणतात ना. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या नशीबात लिहिलेली असेल तर ती कुठून ना कुठून आणि कधी ना कधी मिळतेच. याचाच प्रत्यय आला तो ब्रिटनमधील दाम्पत्याला. कित्येक वर्षांपासून फक्त एका ंमुलासाठी (Pregnancy) प्रयत्न करणाऱ्या या दाम्पत्याने अखेर आई-बाबा होण्याची (Couple trying for baby) आशा सोडली. पण अचानक त्यांच्या नकळत त्यांच्या पदरात बाळ (Shocking pregnancy) पडलं. अ‍ॅ पेंडिक्सचं ऑपरेशन (Appendix) करायला गेलेल्या महिलेच्या पोटाच चक्क बाळ सापडलं. यामुळे दाम्पत्यासह डॉक्टरांनाही धक्का बसला. साऊथ ईस्ट लंडनच्या बेक्सलेहीथमध्ये राहणारे जेनिस आणि डेनिअल. हे दाम्पत्य गेल्या 10 वर्षांपासून मूल व्हावं यासाठी प्रयत्न करत होते. सुरुवातीला त्यांना मूल होण्यासाठी सामान्य मार्ग निवडला पण तरी मूल होत नसल्याने त्यांनी आयव्हीएफचा मार्ग निवडला. पण हा मार्गही यशस्वी झाला नाही. अखेर त्यांनी आपण आई-बाबा होऊ ही आशाच सोडून दिली. काही दिवसांनी जेनिसच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. या वेदना सातत्याने होत होत्या. तिचं वजनही झपाट्याने कमी होत होतं. जेनिसने अनेक डॉक्टरांना दाखवलं. तिने यानंतर एक दोन नाही तर तीन प्रेग्नन्सी टेस्ट केल्या. पण त्या निगेटिव्ह होत्या. तिच्या गेस्ट्रिकपासून न्यूमोनिया ते पोटाच्या इन्फेक्शनपर्यंत सर्व चाचण्या करण्यात आल्या. पण तिच्या आजाराचं निदान काही झालं नाही. अखेर जेनिसला अ‍ॅपेंडिक्स असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि सर्जरी करण्याचा सल्ला दिला. हे वाचा - Yuck! प्रेग्नन्सी सरप्राइझच्या नादात तिने नवऱ्याला चाखायला लावली आपली लघवी जेनिस आपल्या अ‍ॅपेंडिक्सच्या ऑपरेशनसाठी गेली. पण जेव्हा डॉक्टरांनी तिचं ऑपरेशन करायला घेतलं तेव्हा डॉक्टरांना जे दिसलं ते पाहून ते हैराण झाले. जेनिसलासुद्धा याची कल्पना नव्हती. तिच्या पोटात चक्क बाळ होतं.. तेसुद्धा आठ महिन्यांचं. जेनिसने सांगितल्यानुसार, ती ऑपरेशनची प्रतीक्षा करत होती. तिच्या पोटात तीव्र वेदना सुरूच होत्या. तिच्यावर लक्ष ठेवून असलेल्या नर्सने सांगितलं की जेनिसचं वॉटर ब्रेक झालं आहे आता ती कधीही आई होऊ शकते. डॉक्टर ज्याला अ‍ॅपेंडिक्स समजत होते, ते खरंतर आठ महिन्यांचं बाळ होतं. हे वाचा - भयंकर प्रथा: गर्भवती पत्नीला उचलून पती चालतो जळत्या कोळशांवरून जेनिस आणि डेनिअल दोघांनी मूल होण्याची आशा सोडली होती आणि त्यांना अचानाक बाळ झालं. आई-बाबा होण्याचं स्वप्नं अखेर पूर्ण झालं. बाळाला कुशीत घेताच जेनिसला रडूच कोसळलं. आता हे दाम्पत्य आनंदी आहे. त्यांनी आपल्या बाळाचं नाव अराबेला ठेवलं आहे. आपल्या मुलासोबत ते रुग्णालयातून घरी आले आणि आता तिघंही खूप मजा करत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: