मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

थंडीत शरीराच्या गरजा बदलतात; फायबर्स मिळणाऱ्या या गोष्टी भरपूर खा अन् निरोगी रहा

थंडीत शरीराच्या गरजा बदलतात; फायबर्स मिळणाऱ्या या गोष्टी भरपूर खा अन् निरोगी रहा

आहारातील फायबरचे महत्त्व

आहारातील फायबरचे महत्त्व

या मोसमात शरीराला इतर वर्षभरापेक्षा जास्त फायबर पाहिजे असतात. फायबर्स (fibers)म्हणजे तंतूमय पदार्थ. फायबर हे हिरव्या पालेभाज्यांमध्ये (green vegetables) सापडणारं एकप्रकारचं कर्बोदक असतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 27 नोव्हेंबर : थंडीच्या दिवसात (winter) आरोग्याची (health) काळजी घेणं हे एक मोठंच आव्हान असतं. थंडीत शरीराच्या गरजाही बदलतात. वेगळी पोषकत्त्वंही (nutrients) या काळात शरीराला पाहिजे असतात. शरीराला त्याच्या गरजेप्रमाणे पोषकत्त्वं मिळाली नाहीत तर शरीरात पोषकतत्वांचं असंतुलन निर्माण होतं. यातून अनेक आजारांना निमंत्रण मिळतं.

या मोसमात शरीराला इतर वर्षभरापेक्षा जास्त फायबर पाहिजे असतात. फायबर्स (fibers)म्हणजे तंतूमय पदार्थ. फायबर हे हिरव्या पालेभाज्यांमध्ये (green vegetables) सापडणारं एकप्रकारचं कर्बोदक असतं.

तुम्ही जास्त फायबर खाल तर एरवीपेक्षा कमी कॅलरीज अर्थात उष्मांक जळतील. यातून तुमची एनर्जी स्टोअर होईल. यातून तुम्ही जास्त सक्रिय रहाल. तुमची प्रतिकारशक्तीही जास्त मजबूत होईल.

फायबर्स दोन प्रकारचे असतात. सॉल्युबल आणि इनसॉल्युबल सॉल्यूबल फायबर म्हणजे ज्याला आपण सहजपणे चावून खाऊ शकतो. उदा. सेब आणि पेरू. इनसॉल्यूबल फायबर म्हणजे ज्याला आपण चावून खातो तरीही ते तंतूच्या स्वरूपात राहतं. उदा. हिरव्या भाज्या, वाटाणे, रताळी

आपण जेवणाच्या माध्यमातून या दोन्ही प्रकारचे तंतूमय पदार्थ खातो. तुम्ही तुमचा आहार अधिक आरोग्यदायी बनवू इच्छित असाल, तर जेवणात आवर्जून फायबर्स घ्या. त्याचे अनेक फायदे आहेत.

- फायबर्स वजन घटवण्यात मदत करतात. फायबर्स दीर्घकाळ पोट भरल्याची भावना देतात. त्यातून अनावश्यक भूक लागत नाही. गरजेतून जास्त खाणं टाळलं जातं.

- फायबर्स हृदयासाठी फायदेशीर असतात. शरीरात कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर त्यातून हृदयाला धोका उद्भवतो. यातून हृदयाशी जोडलेले अनेक रोगसुद्धा होऊ शकतात. तंतूमय पदार्थयुक्त आहार घेतला तर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. शिवाय हृदय (heart) मजबूत होतं.

- रक्तदाब (blood pressure) आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. उच्च रक्तदाब आता तसा अनेकांमध्ये आढळतो. यातून हार्टअटॅकचा धोका वाढतो. फायबर्स भरपूर असलेला आहार रक्तदाब नियंत्रणात ठेवतो. यातून केवळ रक्तदाब नाही तर रक्तातील साखरही नियंत्रणात राहते.

- पचन चांगलं होत. आहारात फायबर्सचा समावेश केला तर पचनही चांगलं होतं. फायबर शरीरात ब्रशसारखं काम करतो. शरीरातून सगळी विषारी द्रव्यं बाहेर काढणं हे फायबर्सचं काम आहे.

हे वाचा - शिजवलेल्या अन्नासोबत कच्ची काकडी का खाऊ नये? जाणून घ्या

- कर्करोगाचा धोका कमी होतो. अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे, की फायबर्स आहारात समाविष्ट केले तर कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका कमी होतो. फायबरयुक्त भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फोटोकेमिकल्स असतात. यातून कॅन्सरचा धोका 30 ते 40 टक्के कमी होतो.

First published:

Tags: Food, Health, Lifestyle, Vegetables, Winter