बीजिंग, 10 नोव्हेंबर : 95 वर्षांची एक व्यक्ती आपल्या उपचारासाठी रुग्णालयात गेली होती. तिथं तिच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. त्या व्यक्तीच्या मानेचा एक्स-रे काढण्यात आला. तेव्हा जे दिसलं ते पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. त्या व्यक्तीच्या मानेत डॉक्टरांना चक्क मृत्यू दिसला. गेल्या 77 वर्षांपासून या व्यक्तीचा मानेत मृत्यू अडकला आहे. पण त्या व्यक्तीला याची माहितीच नाही. मेडिकल रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरांनाही त्या व्यक्तीचं ऑपरेशन करायला नकार दिला आहे. चीन मधील 95 वर्षांचे झाओ एक निवृत्त सैनिक आहे. शँनडाँगमधील एका रुग्णालयात ते गेले. तिथं त्यांच्या मानेचा एक्स-रे काढण्यात आला. जो पाहून डॉक्टर हादरले. कारण त्यांच्या मानेत बंदुकीची गोळी अडकली होती. मानेत बंदुकीची बुलेट म्हणजे मृत्यूच म्हणावा लागेल. त्यांनाही त्यांच्या गळ्यात गोळीत अडकल्याचं पहिल्यांदाच समजलं. दुसऱ्या महायुद्धावेळी त्यांना ही गोळी लागली होती. याला जवळपास 77 वर्षे उलटली आहेत. हे वाचा - अजब प्रकरण! गुन्ह्यांवर भारी पडलं वजन; लठ्ठ म्हणून आरोपीची सुटका, हायकोर्टाकडून जामीन झाओ यांचे जावई वांग यांनी सांगितलं की, युद्धावेळी त्यांना खूपदा गोळ्या लागल्या होत्या. त्यांच्या शरीरावर युद्धात झालेल्या जखमांच्या खुणाही आहेत. पण त्यांच्या मानेत गोळी लागली याची माहितीच नव्हती.
डॉक्टर म्हणाले, “गेल्या 77 वर्षांपासून त्यांच्या मानेत ही गोळी अडकली आहे. पण झाओ यांना यामुळे कधीच समस्या झाली नाही हे चमत्कारिक आहे. पण आता माहिती झाल्यानंतरसुद्धा त्यांच्य मानेतील ही गोळी आपण काढू शकत नाही याचं कारण म्हणजे झाओ यांचं वय. त्यांचं वय खूप आहे आणि जर आता त्यांच्या मानेचं ऑपरेशन करून गोळी काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या जीवाला धोका आहे. झाओ यांनासुद्धा मानेतील ही गोळी काढण्याची गरज वाटत नाही. “मी इतकी वर्षे निरोगी आहे. त्यामुळे आता काही बदलण्याची गरजच नाही”, असं ते म्हणाले. हे वाचा - 15 वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्टसोबत नको तो खेळ; मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरही हादरले डेली स्टारच्या रिपोर्टनुसार झाओ दोन युद्ध लढले होते. आता ते सामान्य जीवन जहत आहेत. त्यांनी स्थानिक कारखान्यांमध्येही काम केलं आहे.