• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • शाळा सुरू करण्याला ग्रीन सिग्नल मिळताच धोक्याची घंटा; 32 विद्यार्थी कोरोना संक्रमित

शाळा सुरू करण्याला ग्रीन सिग्नल मिळताच धोक्याची घंटा; 32 विद्यार्थी कोरोना संक्रमित

शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत.

 • Share this:
  श्रीनगर, 27 सप्टेंबर : महाराष्ट्रात (Maharashtra coronavirus) 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहेत (Maharashtra School reopen) . राज्य सरकारने शाळा सुरू करण्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. शाळा सुरू होत असल्या तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही (Corona positive student) आणि शाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही (Student infected with coronavirus). याचाच प्रत्यय आला तो जम्मू-काश्मीरमध्ये. जिथं शाळा सुरू होताच तब्बल 32 विद्यार्थी कोरोना संक्रमित आढळले आहेत (Jammu kashmir school student corona positive). जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील एका खासगी शाळेतील 32 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं निदान झालं आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर प्रशासनाने दहावी आणि बारावीसाठी शाळा सुरू करायला परवानगी दिली होती. पण हा निर्णय आता महागात पडेल की काय असंच वाटतं आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार शाळेत येणाऱ्या मुलांची अँटिजेन टेस्ट करावी, असे निर्देश प्रशासनाने दिले होते आणि या टेस्टमध्येच मुलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे वाचा - Maharashtra Schools Reopen : 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू, पालकांवर मोठी जबाबदारी; शिक्षणमंत्र्यांनी सांगितली नियमावली काही दिवसांपूर्वी लडाखच्या लेहमध्येही अशीच परिस्थिती झाली होती. कोरोनाची 71 नवीन प्रकरणं आढळली होती. त्यानंतर प्रशासनाने 2 ऑक्टोबरपर्यंत 15 दिवस शाळा पुन्हा बंद करण्याचे आदेश दिले. या रिपोर्टमुळे राज्याची चिंता वाढली महाराष्ट्रानेही शाळा सुरू करायला ग्रीन सिग्नल दिला आहे.  येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार (Maharashtra school reopen from 4 October) आहेत. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला  होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची मान्यता मिळाली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. हे वाचा - Maharashtra Unlock : प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर यापूर्वीही राज्यातील शाळा सुरू करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. पण आता पुन्हा शाळा सुरू होणार. पण महाराष्ट्रतल्या शाळा सुरू होण्याआधी इतर ठिकाणच्या शाळांची अशी परिस्थिती समोर येत असल्याने आता चिंता वाढली आहे.
  Published by:Priya Lad
  First published: