मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weight Loss साठी सकाळीच नाही तर रात्री देखील प्या गरम पाणी! मानसिक ताणही होतो कमी

Weight Loss साठी सकाळीच नाही तर रात्री देखील प्या गरम पाणी! मानसिक ताणही होतो कमी

पाणी पिणे - 
अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायला हरकत नाही.

पाणी पिणे - अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायला हरकत नाही.

पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी अशा अनेक कारणांसाठी लोक गरम पाण्यात लिंबू, मध वैगेरे घालून सकाळी पितात. पण रात्री गरम पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

    मुंबई, 09 फेब्रुवारी: अनेकांना सकाळी उठल्यानंतर गरम पाणी (Drinking hot water in the morning) पिण्याचे फायदे माहीत असतात. वजन कमी  (weight loss) करण्यासाठी, पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी अशा अनेक कारणांसाठी लोक गरम पाण्यात लिंबू, मध वैगेरे घालून सकाळी पितात. पण रात्री गरम पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?, नसतील तर आज आम्ही तुम्हाला रात्री गरम पाणी पिण्याचे काय फायदे आहेत ते सांगणार आहोत.

    सकाळी उपाशीपोटी गरम पाणी पिणं फायदेशीर आहे, हे सर्वांना माहीत असतं. यासोबतच रात्रीही गरम पाणी पिणं आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतं. जाणून घेऊया रात्री गरम पाणी पिण्याचे कोणते फायदे आहेत.

    चांगली झोप लागते

    रात्री गरम पाणी प्यायल्याने झोप (sleep) चांगली लागते. फक्त सकाळीच गरम पाणी पिण्याचे फायदे मिळत नाहीत. तर, रात्रीही गरम पाणी पिणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतं.

    हे वाचा-स्ट्रेच मार्क्स दूर करायला, हे तेल आहे रामबाण उपाय! कसं वापरायचं आणि कधी?

    अपचनाची समस्या दूर होते

    गरम पाणी प्यायल्याने अपचनाची समस्या दूर होऊन पचनक्रिया सुधारते. कारण गरम पाण्यामुळे अन्न पचण्यासाठी पोटातील पाचक रसांचा स्राव वाढतो. पचनक्रिया बरोबर असेल तर गॅस किंवा अ‍ॅसिडिटीही (acidity) टळते. रात्री गरम पाणी प्यायल्यानंतर अन्न लवकर पचते आणि आपल्याला फ्रेश (fresh) वाटतं.

    शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत

    रात्री झोपताना गरम पाणी प्यायल्यास शरीराच्या तापमानात वाढ होते. त्यामुळे जास्त घाम येण्याची सुद्धा शक्यता असते. तसंच ब्लड सर्क्युलेशन (blood circulation) व्यवस्थित होतं. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते.

    हे वाचा-ओठांवरील सूज किंवा लाल रंगाच्या खुणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष; कॅन्सरची भीती

    वजन कमी करण्यात फायदेशीर

    रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते. डॉक्टरही रात्री गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. गरम पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते असे म्हणतात.

    मानसिक तणाव कमी होतो

    तज्ज्ञांच्या मते, रात्री गरम पाणी प्यायल्याने मानसिक ताणही कमी होतो. मानसिक ताण नसेल तर झोपही चांगली लागते आणि सकाळी उठल्यावर फ्रेशही वाटतं. डिप्रेशनच्या (depression) समस्येतही यामुळे खूप आराम मिळतो.

    शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित राहतं

    रात्री झोपण्याआधी कोमट पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याचं प्रमाण संतुलित राहतं आणि शरीराचं तापमानसुद्धा नियंत्रित राहतं. ज्यामुळे कायम ताजंतवानं असल्याचं तुम्हाला जाणवतं.

    हे वाचा-या सवयींमुळे बंद होईल नशिबाचं दार, थांबेल तुमची प्रगती; वेळीच करा वागण्यात बदल

    त्वचेसाठी फायदेशीर

    गरम पाणी पिण्याचे केवळ पोटासाठीच नाही तर त्वचेसाठीही (skin) अनेक फायदे आहेत. असं म्हटलं जातं की रात्री झोपताना गरम पाणी प्यायल्याने त्वचा उजळते आणि अनेक आजारही दूर राहतात.

    First published:
    top videos

      Tags: Drink water, Water