मुंबई, 09 फेब्रुवारी: माणसाला अनेक सवयी असतात. सवयी चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या असतात. चांगल्या सवयी असणं साहजिकच चांगलं असतं आणि वाईट सवयी असल्या, तर त्या बदलण्यास सांगितलं जातं. कारण चांगल्या सवयींमुळे आपल्याला फायदा होत असतो, तर वाईट सवयींमुळे तोटा होतो. सवयींचा आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडतो. वाईट सवयींमुळे माणसाला अनेक समस्यांना (Problems) सामोरं जावं लागतं. चांगल्या किंवा वाईट सवयींचा ग्रहांवरदेखील परिणाम होतो. तुमच्या सवयीनुसार ग्रह (Planet) शक्तिशाली किंवा कमजोर होतात. ज्योतिषशास्त्रात (Astrology) याबाबत सांगण्यात आलं आहे. पंडित शैलेंद्र पांडे (Pandit Shailendra Pandey) यांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीच्या कुंडलीमधल्या ग्रहांवर तुमच्या सवयींनुसार कमी-अधिक प्रभाव पडत असतो. आपल्या सवयीनुसार आपले ग्रह कमजोर होतात. कधीकधी आपल्या वाईट सवयींमुळे आपल्या चांगल्या ग्रहांची स्थितीही खराब होते. त्यामुळे ग्रह कमजोर होण्याऐवजी शक्तिशाली होतील, अशा सवयी अंगीकारणं गरजेचं आहे. हे वाचा- तुम्ही बाळासाठी ही Baby powder वापरत असाल तर सावधान; कॅन्सरचा धोका तुमच्या कुंडलीत जे ग्रह कमजोर आहेत, त्यांच्या वाईट सवयी न लावणं आवश्यक आहे. अशा सवयी लावा, की जेणेकरून ते ग्रह शक्तिशाली होतील आणि त्यांचा फायदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळू शकेल. कुठल्या सवयींमुळे ग्रहांची स्थिती बदलते, याची थोडी माहिती घेऊ या. अनेकांना जागोजागी थुंकण्याची सवय असते. असं केल्याने कुंडलीत शनी कमजोर होतो. ही सवय लवकरात लवकर सोडणं फायदेशीर ठरेल. तसंच जेवल्यानंतर बरेच जण उष्टी भांडी तशीच ठेवतात आणि उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ करतात. असं केल्याने चंद्र आणि शनी क्रोधित होतात. त्यामुळे यश तुमच्यापासून दुरावतं. म्हणून जेवल्यानंतर भांडी लगेचच धुवावीत. वनस्पती, प्राणी किंवा पक्ष्यांना पाणी दिलं नाही, तर कुंडलीतला बुध ग्रह कमजोर होतो. यामुळे तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणून प्राण्यांवर प्रेम करावं. तसंच आपण राहत असलेल्या खोलीत स्वच्छता राखावी. ज्या व्यक्ती आपली बेडरूम आणि बाथरूममध्ये स्वच्छता ठेवत नाहीत, अशा व्यक्तींचा शुक्र अत्यंत कमजोर असतो. अशा परिस्थितीत या ठिकाणांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. यामुळे कामात यश मिळत नाही. अशा घरात राहणारे सदस्य मानसिक तणावाला बळी पडतात. हे वाचा- Breast surgery नंतर महिलेला झाला जीवघेणा आजार; आता उपचार करणंही अशक्य घरात चप्पल, कपडे, पुस्तकं व्यवस्थित न ठेवणाऱ्या व्यक्तींना नोकरीमध्ये चढ-उतारांना सामोरे जावे लागते. अशा व्यक्तींचा शनी खूप कमजोर असतो. यासोबतच अशा व्यक्तींच्या घरात चोरीच्या घटनाही घडतात. ही सवय सोडल्यास नोकरीत स्थिरता येते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्या, तर तुमचं करिअर सुधारतं आणि घरातल्या मुलांचा खोडकरपणादेखील खूप कमी होतो. याशिवाय, अनेक व्यक्तींना नखं चावण्याची सवय असते. अशा व्यक्तींना डोळ्यांच्या समस्येला सामोरं जावं लागते. नखं चावण्याची सवय सोडली, तर समाजात प्रतिष्ठा वाढते आणि आरोग्यही सुधारतं. अनेकांना कुठेही बसल्यावर सतत पाय हलवण्याची (Habit Of Shaking Legs) सवय असते. तुम्ही सतत पाय हलवत असाल तर याचा अर्थ असा होतो, की तुमच्या मनात सतत काही तरी चालू असतं. म्हणजेच तुम्ही सतत कशाचा तरी विचार करत असता. याचा अर्थ तुमचा चंद्र कमजोर आहे. पाय हलवण्याची सवय बंद करा. असं केल्याने तुमची मानसिक स्थिती चांगली राहील, असं ज्योतिषतज्ज्ञ सांगतात. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. lokmat.news18.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







