Home /News /lifestyle /

पेपर कपमध्ये चहा पिणं इकोफ्रेंडली असेलही, पण आरोग्यासाठी ठरू शकतं धोकादायक

पेपर कपमध्ये चहा पिणं इकोफ्रेंडली असेलही, पण आरोग्यासाठी ठरू शकतं धोकादायक

गरम पेय कपात ओतल्यावर काही मिनिटांतच या प्लास्टिकच्या थराचे छोटे कण तयार होतात ते पेयात मिसळतात. हे हजारो प्लॅस्टिकचे कण पेयासोबत आपल्या पोटात जातात.

    नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : पेपर कपमधून चहा किंवा कॉफीसारखी पेय पिणं आपल्यासाठी घातक ठरू शकतं. नुकत्याच एका संशोधनात असं समोर आलं आहे की, पेपर कपमधून काहीही पिताना हजारो मायक्रोप्लॅस्टिक कण एखाद्या व्यक्तीच्या पोटात जाण्याचा धोका असतो. 'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तात, एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, आपण ज्या कागदी कपमधून पेय पितो त्याच्या आत एक प्लॅस्टिकचा थर असतो. त्यामुळे तो कप पेयामुळे भिजत नाही आणि आपण ते पिऊ शकतो. गरम पेय कपात ओतल्यावर काही मिनिटांतच या प्लास्टिकच्या थराचे छोटे कण तयार होतात ते पेयात मिसळतात. हे हजारो प्लॅस्टिकचे कण पेयासोबत आपल्या पोटात जातात. हे फक्त आपल्या आरोग्यासाठीच हानिकारक नाही, तर पर्यावरणासाठीही हानिकारक आहे. कारण ते कप रिसायकल करणं जवळपास अशक्य आहे. (वाचा - 'अरे क्या कर रहे हो', केस कापताना चिमुरड्याची न्हाव्यालाच धमकी,VIRAL VIDEO पाहाच) हे संशोधन करण्यासाठी, पेपर कपमध्ये 100 मिली गरम पाणी ओतण्यात आलं आणि कप 15 मिनिटं बाजूला ठेवला. यानंतर, एका शक्तिशाली मायक्रोस्कोपखाली या गरम पाण्याची तपासणी केली गेली. संशोधकांना आढळलं की, प्रत्येक कपामध्ये सरासरी 25,000 मायक्रोप्लॅस्टिकचे कण आढळले. झिंक, लेड आणि क्रोमियमसारखे हानिकारक धातूदेखील पाण्यात सापडले. संशोधकांच्या मते प्लॅस्टिकच्या थरातून हे विषारी धातू त्या पाण्यात आले आहेत. पाण्यात सापडलेले हे कण मायक्रॉनइतके मोठे होते. पश्चिम बंगालमधील खडकपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील संशोधक आणि या अभ्यासाच्या प्रमुख संशोधक डॉ. सुधा गोयल म्हणाल्या, 'दररोज पेपर कपमध्ये तीन कप चहा किंवा कॉफी प्यायल्याने, त्या व्यक्तीच्या पोटात मायक्रोप्लॅस्टिकचे 75 हजार सूक्ष्म कण जातात जे उघड्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत.' (वाचा - बियर पिणाऱ्या व्यक्तीने दिली तब्बल 2 लाखांची टीप, कारण ऐकून सगळे करताय कौतुक) हा अभ्यास जर्नल ऑफ हॅझार्ड्स मटेरियलमध्ये प्रकाशित झाला आहे. डॉ सुधा यांनी असंही सांगितलं की, 'मायक्रोप्लॅस्टिकचे कण हे आयन, पॅलेडियम, क्रोमियम आणि कॅडमियमसारख्या विषारी जड धातूंचे वाहक म्हणून काम करतात. त्यांचे नियमितपणे सेवन केल्याने कालांतराने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.' (वाचा - प्रेम जिंकलं! व्हिलचेअरवर नवरदेव अन् त्याच्यामागे नवरी; असा पार पडला अनोखा विवाह) परंतु, आतापर्यंत फूड पॅकेजिंगमध्ये सापडलेल्या प्लॅस्टिकच्या आरोग्यावर होणाऱ्या हानिकारक प्रभावांविषयी कोणताही पुरावा उपलब्ध नाही.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Environment, Health, Plastic

    पुढील बातम्या