मुंबई, 12 जानेवारी : हिवाळ्यात दारू पिण्याचा ट्रेंड वाढतो. जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत एक कोटीहून अधिक दारूच्या बाटल्या विकल्या गेल्या यावरून याचा अंदाज लावता येतो. महिना कोणताही असो, हिवाळ्यात दारूचे सेवन वाढते. काही लोकांचे म्हणणे आहे की या ऋतूत ब्रॅन्डी आणि रम प्यायल्यास सर्दी-खोकला यांसारख्या समस्यांपासून बचाव होतो. लोक थंडीत भरपूर दारू पिण्याचे हे देखील एक कारण आहे. काही लोक याला अफवा म्हणतात की दारूमुळे सर्दी थांबते. आज आपण डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की, सर्दी आणि अल्कोहोलबद्दल वैद्यकीय शास्त्र काय सांगते.
हिवाळ्यात तुमचे पाय बर्फासारखे थंड असतात का? या गंभीर आजाराचे असू शकते लक्षणअल्कोहोल सर्दी आणि फ्लूसाठी औषध बनू शकते? नवी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलच्या प्रतिबंधात्मक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. सोनिया रावत यांच्या म्हणण्यानुसार, सर्दी, खोकला बरे करण्यासाठी डॉक्टर कधीही दारू पिण्याचा सल्ला देत नाहीत. काही लोकांना ब्रॅन्डी आणि रम पिऊन सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळू शकतो, परंतु हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. सर्दी टाळण्यासाठी मद्यपान करणे हा घरगुती उपाय मानला जाऊ शकतो. जे लोक मद्यपान करत नाहीत ते सर्दी टाळण्यासाठी आले आणि मध वापरू शकतात. सर्दी, खोकल्यामध्ये अधिकाधिक गरम पदार्थ आणि पेयांचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
घरच्या घरी ब्रॅन्डी आणि रमची रेसिपी जाणून घ्या डॉ.सोनिया रावत सांगतात की, जर एखाद्या व्यक्तीला सर्दी, खोकला टाळण्यासाठी दारूचे सेवन करायचे असेल तर त्याचे प्रमाण खूपच कमी असावे. एक चमचा ब्रॅन्डी किंवा रम मध आणि लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. हे दिवसातून तीन वेळा केले जाऊ शकते. मध किंवा लिंबू उपलब्ध नसल्यास अर्धा कप गरम पाण्यात एक चमचा रम किंवा ब्रॅन्डी टाकून घेता येते. झोपण्यापूर्वी असे केल्याने तुम्हाला अधिक आराम मिळू शकतो. मात्र वारंवार हा उपाय करू नये, अन्यथा तुम्हाला दारूचे व्यसन लागू शकते. डॉक्टरांच्या मते, सर्दीपासून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात लिंबू आणि आले यांचा समावेश केला पाहिजे. आले तुम्हाला त्वरित आराम देऊ शकते. मधाचे सेवन करणे देखील फायदेशीर आहे. खाण्यापिण्यात काही खबरदारी घेतल्यास सर्दीपासून सहज बचाव होऊ शकतो. त्रास वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध घ्यावे. चांगलं आरोग्य हवंय मग तुम्ही या चांगल्या सवयी फॉलो करता का? नसतील तर आजपासून सुरू करा (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)