Home /News /lifestyle /

Porn बघण्याची सवय लागली आहे का? मग 'हे' उपाय करून बघा; कायम राहाल दूर

Porn बघण्याची सवय लागली आहे का? मग 'हे' उपाय करून बघा; कायम राहाल दूर

अशा लोकांसाठी आम्ही काही उपाय (Tips to avoid porn watching) सांगणार आहोत जे करून तुम्ही Porn बघण्याची सवय सोडू शकता.

    मुंबई, 30 ऑगस्ट: आजकालच्या काळात अगदी लहान मुलांपासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांकडे स्मार्टफोन (Smartphones) आहेत. त्यात लहान मुलांची  शाळा ऑनलाईन असल्यामुळे पालकांना स्मार्टफोन लहान मुलांकडे द्यावा लागत आहे. पण आजकालच्या प्रगत जगात टेक्नॉलॉजीचे जितके फायदे आहेत तितकेच वाईट परिणामही (Side Effect of Technology) आहेत. लहान मुलांना, तरुणांना इतकंच काय तर तरुणींनाही Porn (Bad habit of watching Porn) बघण्याची सवय लागली आहे. ज्यांना Porn बघितल्याशिवाय झोप लागत नाही  काही जण असेही आहेत. अनेकांना ही सवय वाईट सवय सोडण्याची (How to avoid porn watching) इच्छा आहे पण सोडू शकत नाहीत. अशा लोकांसाठी आम्ही काही उपाय (Tips to avoid porn watching) सांगणार आहोत जे करून तुम्ही Porn बघण्याची सवय सोडू शकता. डिलीट करा पॉर्न पॉर्नचे सर्व स्त्रोत काढून टाका. पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क किंवा मोबाईल फाईल प्रमाणे सर्वांपासून पॉर्न डिलीट करा. पोर्न वेबसाइटला भेट देऊ नका किंवा त्यांना कायमचं ब्लॉक करा. अँटी पॉर्न सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा जेणेकरून भविष्यात त्याच्याशी संबंधित जाहिराती कधीही तुमच्या समोर येऊ शकणार नाहीत. यामुळे नक्कीच पॉर्न बघण्यापासून तुम्ही बचाव करू शकाल. नवनवीन उपक्रमांमध्ये भाग घ्या कोणत्याही सवयीपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नवीन उपक्रमांमध्ये भाग घेणं नवीन गोष्टी शिका जेणेकरून तुम्ही पोर्नच्या आणि पर्यायानं मोबाईलच्या दूर राहू शकाल. हळूहळू तुम्हाला या नवीन उपक्रमांमध्ये इंटरेस्ट वाटू लागेल आणि पोर्नमधून लक्ष दूर होईल. हे वाचा - आधीच 242 किलो वजन आणि म्हणे अजून वाढवायचंय; पण कशासाठी? कारण वाचून व्हाल थक्क स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या पॉर्न बघितल्यामुळे फक्त मनाला आणि बुद्धीलाच नाही तर शरीरालाही नुकसान होतं. त्यामुळे आपल्या प्रकृतीकडे सतत लक्ष द्या. कोणताही त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतःला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही सहजतेनं पॉर्न बघण्यापासून दूर होऊ शकाल. सतत कामात व्यस्त राहा तुम्ही जितका जास्त वेळ एकटा घालवाल तितका तुम्हाला पुन्हा पॉर्न बघण्याची इच्छा होईल. म्हणून एकटे राहू नका, स्वतःला शक्य तितकं व्यस्त ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवा, मित्रांसोबत गप्पा मारा, नवीन लोकांशी मैत्री करा किंवा स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी पॉर्न व्यतिरिक्त तुम्हाला जे आवडतं ते करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Lifestyle

    पुढील बातम्या