मुंबई, 21 मार्च : गेल्या काही वर्षांत जीवनशैलीत (Life Style) मोठा बदल झाल्याचं दिसून येत आहे. धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना डायबेटीस, ब्लड प्रेशर यांसारख्या गंभीर विकारांना (Disease) सामोरं जावं लागत आहे. अशा जीवनशैलीमुळे आहारात (Diet) मोठा बदल झाला असून, तुलनेनं नियमित व्यायामाचं प्रमाण काहीसं कमी झालं आहे. काही जणांना जेवणानंतर हृदयाचे ठोके (Heartbeat) जलद झाल्याचं जाणवतं. खरं तर ही एक गंभीर समस्या आहे. असं होण्यामागं काही कारणं आहेत. त्यावर वेळीच उपाय केल्यास संभाव्य धोके दूर होऊ शकतात. अनेकदा अतितिखट किंवा मसालेदार पदार्थ (Spicy foods) खाल्ल्यानंतर हृदयाचे ठोके जलद पडतात. याशिवाय तुम्हाला आधीपासून हृदयाशी संबंधित कोणताही आजार असेल किंवा तुम्ही जास्त प्रमाणात कॅफिन, निकोटीन किंवा अल्कोहोलचं सेवन करत असाल तर यामुळे जेवल्यानंतर तुमच्या हृदयाची गती वाढू शकते. हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढला असेल, तर अशा वेळी हृदय खूप वेगानं काम करत असल्याचं जाणवतं. या दरम्यान, छाती, घसा आणि मानेमध्येही बदल जाणवू शकतात. त्यामुळे जेवल्यानंतर तुमच्या हृदयाची गती वाढत असेल तर तुम्ही थोडं सतर्क राहणं आवश्यक आहे. तर तातडीनं वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक हृदयाचे ठोके जलद पडत असतील तर तुम्हाला हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्यासोबत अनेक समस्या येऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने हृदयाच्या धमन्यांशी संबंधित आजार, हृदयक्रिया थांबणं, हृदयाच्या झडपांतल्या समस्या आणि हृदयाच्या स्नायूंच्या समस्यांचा समावेश आहे. जेवणानंतर हृदयाचे ठोके जलद होत असतील तर चक्कर येणं, श्वास घेण्यास त्रास होणं, छातीत वेदना आणि बेशुद्ध पडणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अशी कोणतीही लक्षणं दिसत असतील तर तातडीनं वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक आहे. कोरफडीपासून घरीच तयार करा असा शॅम्पू; केस होतील शायनी, मिळेल नॅचरल ग्लो जेवणानंतर हृदयाचे ठोके वाढतात का? तसंच, जेवणानंतर हृदयाचे ठोके वाढत असतील तर मीठ (Salt), गोड किंवा साखरेचे पदार्थ आणि फॅटयुक्त पदार्थांचं सेवन कमी करणं आवश्यक आहे. याशिवाय अन्नपदार्थ बनवताना तेलाचा (Oil) मर्यादित वापर आवश्यक आहे. तसंच, शक्य असेल तर रोज किंवा दोन-चार दिवसांनी वेगवेगळ्या तेलाचा वापर अवश्य करावा. याशिवाय आहारात धान्य, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि फळांचा जास्त प्रमाणात समावेश करावा. आहारात असे बदल केल्यास जेवणानंतर हृदयाचे ठोके वाढण्याची समस्या काही प्रमाणात नियंत्रणात येऊ शकते. आहारात बदल करूनही लक्षणं कायम राहिल्यास जोखीम न पत्करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







