जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / गरोदरपणात आयर्न कॅप्सूल घेतल्याने खरंच बाळाच्या रंगावर परिणाम होतो का? वाचा तज्ज्ञांचं मत

गरोदरपणात आयर्न कॅप्सूल घेतल्याने खरंच बाळाच्या रंगावर परिणाम होतो का? वाचा तज्ज्ञांचं मत

गरोदरपणात आयर्न कॅप्सूल घेतल्याने खरंच बाळाच्या रंगावर परिणाम होतो का? वाचा तज्ज्ञांचं मत

गरोदरपणात स्त्रीच्या आरोग्यात अनेक चढ-उतार येतात. या कालावधीत स्त्रीला तिच्या आरोग्याची जास्त आणि उत्तमरित्या काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. गर्भधारणनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 डिसेंबर : कोणत्याही स्त्रीसाठी आई होणे ही एक सुंदर भावना असते. गर्भधारणा झाल्यानंतरचा 9 महिन्यांचा काळ सर्वांत महत्त्वाचा असतो. आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा काळ अतिशय संवेदनशील आणि काही प्रकरणांत कठीण असतो. या काळात स्त्रीच्या आरोग्यात अनेक चढ-उतार येतात. या कालावधीत स्त्रीला तिच्या आरोग्याची जास्त आणि उत्तमरित्या काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. गर्भधारणनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. अशा स्थितीत शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासू नये यासाठी डॉक्टर काही औषधी आणि पौष्टीक पदार्थ सुचवतात. यात आयर्नचा देखील समावेश असतो. गर्भधारणेबाबात आपल्या समाजात अनेक समज आहेत. गर्भधारणेदरम्यान आयर्न घेतल्याने मुलाच्या रंगावर परिणाम होतो असा एक समज अनेक स्त्रियांमध्ये आहे. या दाव्यामध्ये किती तथ्य आहे आणि आयर्नचा शरीरावर कसा परिणाम होतो हे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

Pregnancy Tips : गरोदरपणात जास्त तूप खाल्याने काय होते, तूप किती प्रमाणात खाणं योग्य?

गरोदरपणात आयर्न का दिले जाते? गरोदरपणात आयर्नचा कमतरतेमुळे म्हणजेच लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होण्याचा धोका असतो. याला सामान्य भाषेत रक्ताची कमतरता असे म्हटले जाते. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान डॉक्टर आयर्न कॅप्सूल्स घेण्याचा सल्ला देतात. यामुळे आईची हिमोग्लोबिन पातळी चांगली राहते आणि बाळालाही ऑक्सिजन योग्य प्रकारे मिळतो.

News18लोकमत
News18लोकमत

आयर्नमुळे बाळाचा रंग काळा होतो? टीव्ही नाईनच्या रिपोर्टनुसार, प्रसिद्ध आयव्हीएफ तज्ज्ञ आणि डॉ.शोभा गुप्ता यांनी गरोदरपणात लोहाच्या गोळ्या खाल्ल्याने मुलाचा रंग काळा होत नाही असे स्पष्ट केले आहे. या गोळ्यांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केले जावे. तसेच शरीरात लोहाची कमतरता असेल तर मुदतीपूर्वी प्रसूती होण्याची शक्यता असते असे देखील त्यांनी सांगितले. Mushroom In Pregnancy : प्रेग्नन्सीमध्ये मशरूम खाणं सुरक्षित आहे का? वाचा तज्ज्ञांचा सल्ला लोहाची कमतरतेमुळे बाळाची होते हानी तज्ञांच्या मते गर्भधारणेदरम्या आईच्या शरीरात लोहाचे प्रमाण योग्य असणे अतिशय आवश्यक आहे. आईच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर बाळाच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. रिपोर्टनुसार गर्भधारणेच्या सुरुवातीला भारतातील महिलांची हिमोग्लोबिन पातळी कमी असते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात