मुंबई, 27 डिसेंबर : थंडीच्या हंगामात अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात कॉफीने करतात. आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या दिवसाची सुरुवात कॉफीने करतात. त्याच वेळी काही लोक आहेत जे रात्री निश्चितपणे दारूचे सेवन करतात. दारू हानिकारक आहे, हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण तरीही लोक थंडीच्या काळात याचे सेवन करतात. शेवटी अशा लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. पण आजकाल एक प्रश्न खूप चर्चिला जात आहे, की कॉफीचा पोटावर अल्कोहोलसारखाच परिणाम होतो का?
तज्ञांच्या मते, हे काही प्रकरणांमध्ये होऊ शकते, परंतु कॉफीच्या सामान्य सेवनाचे अनेक फायदे आहेत. दुसरीकडे अल्कोहोलमुळे प्रत्येक परिस्थितीत हानी होते. कॉफी कमी प्रमाणात वापरली गेली तर ती हानिकारकपेक्षा अधिक फायदेशीर आहे. कारण आपल्या आतड्यात सुमारे 1000 अब्ज जीवाणू असतात. याला गट फ्लोरा असेही म्हणतात, त्यामुळे काही चुकीच्या गोष्टी पोटात गेल्यास त्याचा थेट परिणाम गट फ्लोरावर होतो.
डोळ्यांचे हे त्रास असतात मोठे संकेत, ही लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा
कॉफीचे फायदे आहेत की तोटे?
इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीत डॉ. सुरंजित चॅटर्जी यांनी लिहिले आहे की, निःसंशयपणे आज कॉफी आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनली आहे. आकडेवारीनुसार, संपूर्ण जगात दररोज सुमारे 2 अब्ज कप कॉफी वापरली जाते. लोकांना कॉफीच्या चवीचं वेड असतं. कॉफीमध्ये कॅफिनचे संयुग आढळते. कॅफिनमध्ये अरबीनोगॅलॅक्टन्स आणि गॅलॅक्टोमॅनन्स संयुगे देखील असतात, जे प्रामुख्याने विरघळणारे तंतू असतात.
जेव्हा कॉफीचा विचार केला जातो तेव्हा त्याचा आपल्या आतड्यांवर कसा परिणाम होतो, हे आपण किती कॉफी प्यायलो यावर अवलंबून असते. अमेरिकन फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार, दररोज 400 मिलीग्राम कॉफी घेतल्याने कोणतेही महत्त्वपूर्ण नुकसान होत नाही. दिवसाला सुमारे दोन ते तीन कप तुम्ही पिऊ शकता.
त्यामुळे पोटातील क्रिया जलद होतात आणि सूज येण्याचा धोकाही कमी राहतो. दुसरीकडे पोटाच्या शस्त्रक्रियेनंतर कॉफी प्यायल्याने पोटाची पचन प्रक्रिया वेगवान होते. कॉफी हे प्रीबायोटिक असल्याचे अनेक अभ्यासांत आढळून आले आहे. म्हणजेच ते गट फ्लोराला हानी पोहोचवत नाही. परंतु जर ते जास्त प्रमाणात सेवन केले तर ते खालच्या अन्ननलिका स्फिंक्टर (LOS) सैल करते, ज्यामुळे अन्न वरच्या दिशेने जाऊ लागते आणि यामुळे अपचन आणि गॅस होतो. याशिवाय जास्त कॉफीमुळे पोटात अॅसिडची क्रिया वाढते, त्यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
आतड्यांवर अल्कोहोलचा प्रभाव
अल्कोहोल हे पोटासाठी खूप वाईट मानले जाते. हे गंभीर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या निर्माण करण्यासाठी ओळखले जाते. अल्कोहोल कोलनमध्ये जळजळ वाढवते. कारण ते क्लोस्ट्रिडियोइड्स प्रजातींची संख्या वाढवते. हे पोटातील एक प्रकारचे नको असलेले बॅक्टेरिया आहे. अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे पोट आणि पचनसंस्थेवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. काही प्रकरणांमध्ये, हे कॉफीसारखे कार्य करते आणि खालच्या एसोफेजल स्फिंक्टर (LOS) ला आराम देते, ज्यामुळे पोटात सामान्यपेक्षा जास्त ऍसिड तयार होते.
Winter Health : कॅन्सरचा धोका दूर करण्यासाठी हिवाळ्यात खा डाळिंब, अभ्यासात झाले सिद्ध
याशिवाय अल्कोहोलमुळे पोटातील बॅक्टेरियाचे संतुलन बिघडते. यामुळे प्रथिने आणि रोगप्रतिकारक पेशी सक्रिय होतात आणि यामुळे जळजळ वाढते. जास्त काळ अल्कोहोलचे सेवन केल्याने पाचन तंत्र आणि यकृताला गंभीर नुकसान होऊ शकते. अनेक अभ्यासांमध्ये असे सांगितले गेले आहे की, अल्कोहोलमुळे अनेक अवयवांवर परिणाम होतो.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alcohol, Coffee, Health, Health Tips, Lifestyle, Winter