लखनऊ, 27 एप्रिल : कोरोनापासून (Coronavirus) बचाव करावा, कोरोनातून आपण बरे व्हावे यासाठी प्रत्येक जण धडपड करत आहे. काही संपूर्ण कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. त्यापैकी काही जण कोरोनावर यशस्वीरित्या मात करत आहेत, तर काही जण कोरोनाविरोधातील लढा हरत आहे. असंच कुटुंब म्हणजे उत्तर प्रदेशातील जायसवाल कुटुंब. या कुटुंबातील दाम्पत्याला आणि त्यांच्या दोन्ही मुलांना कोरोनाची लागण झाली. आपण बरे व्हावं यासाठी या दाम्प्त्याने लाखो रुपये खर्च केले पण तरी कोरोनाना त्यांचा बळी घेतला.
गोरखपूरमधील ही मन हादरवणारी घटना आहे. पादरी बाजारमध्ये राहणारा 37 वर्षांचा अजय जायसवाल आणि त्याची 35 वर्षांची पत्नी अंशिका काही दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह झाले. त्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यावेळी त्यांची सहा वर्षांची मुलगी गुनगुन आणि दीड वर्षांचा मुलगा आनंदही कोरोना पॉझिटिव्ह होता.
हे वाचा - आर्थिक कुचंबणा! ज्या झाडाखाली असायची त्याची नाश्त्याची हातगाडी,तिथेच घेतला गळफास
कोरोना पॉझिटिव्ह आढळताच अजय आणि अंशिका यांची प्रकृती खूपच गंभीर झाली. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत होती. त्यामुळे सुरुवातीला त्यांना राजेंद्रनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात हललवण्यात आलं. इतकंच नव्हे तर अगदी अमेरिकेतील एका मोठ्या रुग्णालयाशीही संपर्क करण्यात आला. तिथल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला. यासाठी 7 दिवसांत तब्बल 17 लाख रुपये खर्च केले. पण काहीच फायदा झाला नाही. लाखो रुपये खर्च करूनही कोरानामुळे या दाम्पत्याचा मृत्यू झाला. इतके पैसे खर्च करूनही दाम्पत्याला वाचवता आलं नाही.
हे वाचा - भीषण! आधी औषधं, मग ऑक्सिजन आणि आता या शहरात लागल्या डेथ सर्टिफिकेटसाठी रांगा!
नवभारत टाइम्सच्या रिपोर्टनुसार अजय आणि अंशिका यांचा शुक्रवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. अवघ्या दीड वर्षांच्या आनंदवरी आईवडीलांचं छत्र हरपलं. कोरोनाने त्याच्या आईबाबांना त्याच्यापासून हिरावून घेतलं. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याल आले. स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या या चिमुकल्यानेच आपल्या आईबाबांना मुखाग्नी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Uttar pradesh