मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /OMG! 32 नाही तर 82; 17 वर्षीय तरुणाच्या जबड्यातील दात पाहून डॉक्टरही शॉक

OMG! 32 नाही तर 82; 17 वर्षीय तरुणाच्या जबड्यातील दात पाहून डॉक्टरही शॉक

या तरुणाला जबड्यातील दुर्मिळ ट्युमर होता.

या तरुणाला जबड्यातील दुर्मिळ ट्युमर होता.

या तरुणाला जबड्यातील दुर्मिळ ट्युमर होता.

दिवाकर/पाटणा, 10 जुलै : आपल्या तोंडात किती दात (Teeth) असतात, असं विचारलं तर साहजिकच आपण 32 सांगू. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल एका व्यक्तीच्या तोंडातून तब्बल 84 दात काढण्यात आले आहेत. हे दात त्याच्या तोंडात नाही तर जबड्याच्या आत होते. त्याच्या जबड्यातील ट्युमरमध्ये हे दात होते (Teeth in tumor).

बिहारमधील 17 वर्षीय नितीश कुमार. गेल्या पाच वर्षांपासून त्याला कॉम्प्लेक्स ओडोन्टोम हा जबड्यातील एक दुर्मिळ ट्युमर होता.  पाटणातील IGIMS मध्ये त्याच्यावर उपचार झाले. त्याच्या जबड्यातील ट्युमर बाहेर काढण्यात आला. त्यात तब्बल 82 दात होते.

IGIMS चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष मंडल यांनी सांगितलं, "आरा जिल्ह्यातील 17 वर्षांचा नितीश कुमार 5 वर्षांपासून  कॉम्प्लेक्स ओडोन्टोम या जबड्याच्या ट्युमरने ग्रस्त होता. योग्य उपचार न मिळाल्याने तो आईजीआईएमएसला आला होता. त्याचवेळी प्रारंभिक तपासात त्याला कॉम्प्लेक्स ओडोन्टोम हा दुर्मिळ ट्युमर असल्याचं निदान झालं"

हे वाचा - OMG! 9 नाही तर 15 महिन्यांचं बाळ; तब्बल 16 तासांनंतर आईच्या पोटातून आलं बाहेर

त्याच्या दोन्ही गालाच्या खालच्या बाजूला आणि मानेच्या वर दोन्ही दिशेने असे हे ट्युमर होतो. डॉ. प्रियंकर सिंह आणि डॉ. जावेद इकबाल यांनी सांगितलं, "जबड्याचा हा एक असामान्य असा ट्युमर आहे. आनुवंशिक कारण किंवा जबड्याला हानी पोहोचल्यामुळे जबडा किंवा दातांचा विकस होण्याच्या प्रक्रियेत विकृती आल्यानेही होऊ शकतो"

हे वाचा - कमाल! वजन कमी करण्यासाठी तोंडाला, नव्हे दातांना लावा खरोखरचं कुलूप!

या रुग्णाच्या ट्युमरच्या आत जवळपास 82 दात होते. ते नीटपणे काढण्यात आले. या रुग्णावर उपचार करणं म्हणजे आव्हानात्मक होतं. पण हे आव्हान डॉक्टरांनी पेललं आणि त्याच्यावर यशस्वी उपचार केले.

First published:

Tags: Health, Lifestyle