FACT CHECK : मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसले 169 कोरोनाबाधित रुग्ण?

FACT CHECK : मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसले 169 कोरोनाबाधित रुग्ण?

मुंबईबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच सोशल मीडियावर एक खळबळ माजवणारा फोटो व्हायरल केला जात आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जून : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईतील विविध भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. अनेक प्रभागांमध्ये 4 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच सोशल मीडियावर एक खळबळ माजवणारा फोटो व्हायरल केला जात आहे.

मालाड (पूर्व) मधील ओमकार अल्टा माँटे येथे 169 कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती समाज माध्यमांमधून छायाचित्रांसह पसरवली जात आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सदर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर 'न्यूज18 लोकमत'ने या फोटोमागील सत्य जाणून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

आमच्या व्हायरल चेकनंतर जे सत्य समोर आलं त्यातून सोशल मीडियाचा बेजबाबदारपण पुन्हा उघड झाला. कारण व्हायरल होत असलेला हा फोटो मुंबईतील असला तरी ही घटना मात्र वेगळीच असल्याचं स्पष्ट झालं. सोशल मीडियावर पसरवली जाणारी सदर माहिती चुकीची असून हे छायाचित्र तेथे आयोजित तपासणी शिबीर (स्क्रिनिंग कॅम्प) चे आहे. त्यामुळे नागरिकांनी कृपया घाबरून जाऊ नये, असं आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईत सुरुवातीच्या काळात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी, वरळी या भागातील प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आलं आहे. मात्र अंधेरीसह इतर भागात कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये आता नियम कडक करण्यात आले आहेत. कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक स्थळी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे बंधनकारक आहे.

कार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करतानादेखील प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यकच आहे. सार्वजनिक वाहतूक साधनांमधून प्रवास करतानाही मास्क लावणे गरजेचे आहे. कोणत्याही बैठकीला किंवा एकत्र येताना तसेच कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहणे हे नियमांच्या विरुद्ध मानलं जाणार आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 30, 2020, 7:53 PM IST

ताज्या बातम्या