Home /News /lifestyle /

जन्मताच श्वास थांबलेल्या बाळामध्ये डॉक्टरने फुंकले आपले 'प्राण'; काही मिनिटांतच झाला चमत्कार

जन्मताच श्वास थांबलेल्या बाळामध्ये डॉक्टरने फुंकले आपले 'प्राण'; काही मिनिटांतच झाला चमत्कार

डॉक्टरने एका नवजात बाळाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं आहे.

    आग्रा, 14 मार्च : जीवन आणि मृत्यू कुणाच्याही हातात नसतो हे आपल्याला माहितीच आहे. पण डॉक्टर ज्यांना देव मानलं जातं जे कित्येक रुग्णांना मृत्यूच्या दारातूनही खेचून आणतात. अशीच एक महिला डॉक्टर चर्चेत आली आहे जिनं एका नवजात बाळाला असंच मृत्यूच्या दाढेतून परत आणलं आहे. श्वास थांबलेल्या या बाळाला तिने काही मिनिटांतच जिवंत केलं आहे. या बाळामध्ये तिने आपले प्राण फुंकले आहेत (Doctor gave mouth cpr to newborn baby). एत्मादपूर सार्वजनिक आरोग्य केंद्रातील ही घटना आहे. खुशबू नावाची महिला इथं डिलीव्हरीसाठी आली. तिने एका बाळाला जन्म दिला. पण बाळ जन्मानंतर रडत नव्हतं. त्याचा श्वासोच्छवासही होत नव्हता. जणू ते मृतावस्थेतच होतं. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांची धडपड सुरू झाली. त्याला कृत्रिम ऑक्सिजनने श्वास देण्यात आला. इतर प्रयत्नही करण्यात आले पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. हे वाचा - प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह, लक्षणं नाही; पोटात वेदना झाल्या आणि अचानक झालं बाळ अखेर या महिलेची डिलीव्हरी करणाऱ्या डॉ. सुरेखा यांनी बाळाच्या तोंडात आपलं तोंड घातलं आणि त्याला तोंडाने आपला श्वास द्यायला सुरुवात केली. बाळ रक्ताने माखलेलं होतं, त्याला स्वच्छ कऱण्यात आलं नव्हतं. असं असताना डॉ. सुरेखा यांनी दुसरा कोणताच विचार केला नाही. त्यांना फक्त बाळाचा जीव वाचवायचा होता. त्यासाठी त्यांनी रक्ताने माखलेल्या या बाळाच्या तोंडात आपलं तोंड घातलं आणि त्याच्यामध्ये आपला श्वास म्हणजे आपले प्राण फुंकले. सोबत त्याच्या पाठीवरही मारत होत्या. काही मिनिटं डॉ. सुरेखा यांची बाळामध्ये जीव आणण्यासाठी अशीच धडपड सुरू होती. अखेरच त्यांच्या प्रयत्नाला यश आलं. बाळात जीव आला, ते स्वतःहून श्वास घेऊ लागलं. त्यावेळी त्याच्यामध्ये आपला जीव ओतणाऱ्या डॉ. सुरेखा यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. हे वाचा - अजबच! म्हणे, 'पार्कमध्ये फिरायला गेलो आणि पायच हरवला', शोधून देणाऱ्याला बक्षीस यावेळी तिथं उपस्थित असलेला हॉस्टिपलचा स्टाफही थक्क झाला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ पाहिल्यानंतर या डॉक्टरचं कौतुक केलं जातं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Agra, Lifestyle, Small baby, Uttar pradesh, Woman doctor

    पुढील बातम्या