जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Pregnancy टेस्ट निगेटिव्ह, लक्षणंही नाहीत; फक्त पोटात वेदना झाल्या आणि अचानक जन्माला आलं बाळ

Pregnancy टेस्ट निगेटिव्ह, लक्षणंही नाहीत; फक्त पोटात वेदना झाल्या आणि अचानक जन्माला आलं बाळ

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

महिलेची प्रेग्नन्सी टेस्ट तीन वेळा निगेटिव्ह होती. शिवाय बाळाचा जन्म होईपर्यंत ती गर्भनिरोधक गोळ्याही घेत होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

 लंडन, 14 मार्च : प्रेग्नन्सी म्हटलं की त्याची बरीच लक्षणं दिसतात. मासिक पाळी चुकणं ही पहिलं लक्षण. त्यानंतर उलटी, मळमळ, चक्कर येणं अशी लक्षणंही दिसून येतात. शिवाय प्रेग्नंट महिलांचं बेबी बम्प दिसतं. पण यापैकी काहीच न होता  (Pregnancy Without Symptoms) एका महिलेने अचानक एका बाळाला जन्म दिला. यामुळे तिलाही धक्का बसला बाळ होईपर्यंत आपण प्रेग्नंट आहोत, याची माहिती तिलाच नव्हती (Woman Gave Birth to Surprise Baby). ब्रिटनच्या एसेक्समध्ये राहणारी एली जॉनसन  (Ellie Johnson) प्रेग्नंट होऊ नये, यासाठी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स  (Contraceptive Pills) घेत होती. तिने आपली प्रेग्न्सन्सी टेस्टही (Pregnancy Test) करून घेतली होती, ती तीन वेळा निगेटिव्ह आली. प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांपर्यंत ती गर्भनिरोधक गोळ्या घेतच होती. तरी तिच्या पोटात बाळ होतं याची तिला माहितीच नव्हती.  तिच्यामध्ये प्रेग्नन्सीची लक्षणंही तिला दिसली नाहीत  अगदी तिचं बेबी बम्पही दिसत नव्हतं. हे वाचा -  अजबच! म्हणे, ‘पार्कमध्ये फिरायला गेलो आणि पायच हरवला’, शोधून देणाऱ्याला बक्षीस मिररच्या रिपोर्टनुसार एलीला ऑगस्ट 2018 साली थोडं विचित्र वाटू लागलं. शरीरात काहीतरी समस्या असल्याचं जाणवलं 20 डिसेंबरला तिने अल्ट्रासाऊंडही करून घेतलं पण त्यात काहीच दिसलं नाही. त्यानंतर एकदा आजीच्या बर्थ डे पार्टीनंतर ती झोपली आणि तेव्हा तिच्या पोटात, पाठीत तीव्र वेदना होऊ लागल्या  (Woman Gave birth after tummy ache). रात्री उशिरा दोन वाजता तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं टॉयलेटला तिला काहीतरी विचित्र असल्याचं जाणवलं. नर्सनी तिला पाहिलं तर ती लेबर पेनमध्ये होती. तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि तिने एका बाळाला जन्मही दिला. तिला एक मुलगी झाली. हे वाचा -  तुमचं बाळही सारखं-सारखं कान खाजवतंय? ही कारणं असतात त्या पाठिमागं, दुर्लक्ष नको अचानक झालेली ही प्रेग्नन्सी तिच्यासाठी मोठा धक्का होता. कारण तिने यासाठी काहीच प्लॅनिंग केलं नव्हतं. उलट ती प्रेग्नन्सी टाळण्यासाठी उपाय करत होते. असं असतानाही ती एका बाळाची आई झाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात