मुंबई 15 जून : चहा (Tea) हे अनेक लोकांसाठी आवडते पेय आहे. ऑफिसमध्ये काम करताना तर लोक दिवसभरातून अनेक वेळा चहा (Drinking Tea) पितात. परंतु ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक (Tea Side Effects) ठरू शकते. बहुतेक लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. तर काही लोक नाश्त्यासोबत देखील चहा पितात. परंतु ही वारंवार चहा पिण्याची सवय (Tea Habit) तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक (Tea can be harmful) ठरू शकते. हे तुम्हालाही माहिती आहे. पण काही केल्या तुमची ही सवय सुटेना, तर तुमच्यासाठी हे सोपे उपाय आहेत.
तुम्ही दिवसातून 2 कप चहा पित असाल तर ती वाईट सवय नाही. परंतु यापेक्षा जास्त वेळा तुम्ही चहा पित असाल तर हे दारू किंवा सिगारेटच्या व्यसनासारखंच आहे. खूप चहा प्यायल्याने पोटाशी संबंधीत समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच पचनक्रिया देखील खराब होऊ शकते. त्यामुळे जास्त चहा पिणे ठाळावे. जास्त चहा प्यायल्याने पोटात गॅस, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच चहाच्या अतिसेवनामुळे छातीत जळजळ आणि अपचनासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे ही सवय (Tea For Health) आजच सोडा. असे काही उपाय (Health Care Tips) आहे जे करून तुम्ही ही सवय सहज सोडू शकता.
हे वाचा - तुम्ही चहा बनवताना या चुका करताय का? ही आहे Perfect Tea बनवण्याची योग्य पद्धत
दिवसभर द्रवपदार्थांचे सेवन करा : चहाची सवय कमी करण्यासाठी संपूर्ण दिवसात द्रवपदार्थांचं अधिक प्रमाणात सेवन करा. यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा टिकून राहील आणि तुम्हाला चाहाची आठवण येणार नाही. यामुळे चहाची तल्लफ देखील कमी होण्यास मदत होईल.
पुरेशी झोप घ्या : चहाची सवय सोडण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे पुरेशी झोप घ्या. चांगली आणि पुरेशी झोप घेतल्यास तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटेल आणि त्यामुळे जास्त चाहाची गरज भासणार नाही. त्यामुळे झोपेशी तडजोड करू नका.
हे वाचा - Tea For Health : गार झालेला चहा पुन्हा गरम करून पिऊ नका; होऊ शकतात गंभीर परिणाम
दररोज एक कप कमी चहा प्या : कधीही एकदम चहा सोडण्याचा प्रयत्न करू नका. ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्याऐवजी चहाची सवय सोडण्यासाठी दररोज एक कप कमी चहा प्या. यामुळे काही दिवसात तुमची चहा पिण्याची सवय कमी होऊ शकते.
चहाऐवजी आरोग्यदायी पेय प्या : चहाचे अतिसेवन टाळण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे जेव्हा तुम्हाला चहा प्यावासा वाटेल तेव्हा काहीतरी आरोग्यदायी पेय प्या. अशा वेळी तुम्ही उसाचा रस किंवा फळांचा ज्यूस पिऊ शकता. असे केल्याने काही दिवसात तुम्ही चहाची सवय कमी होण्यास मदत होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle, Tea, Tea drinker