• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • दुधाला ‘हा’ पर्यायही आहे उत्तम; रोज घेतल्यास वजन होईल कमी, डायबेटीज राहील दूर

दुधाला ‘हा’ पर्यायही आहे उत्तम; रोज घेतल्यास वजन होईल कमी, डायबेटीज राहील दूर

ब्लीचिंगमुळे त्वचेवर हलके रॅसेस किंवा पुरळ उठलं असेल तर चेहऱ्यावर नारळाचं दूध किंवा नारळाचं पाणी वापरू शकता. यासाठी कॉटन पॅडमध्ये नारळ पाणी किंवा नारळाचं दूध घेऊन लावा. 15 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा.

ब्लीचिंगमुळे त्वचेवर हलके रॅसेस किंवा पुरळ उठलं असेल तर चेहऱ्यावर नारळाचं दूध किंवा नारळाचं पाणी वापरू शकता. यासाठी कॉटन पॅडमध्ये नारळ पाणी किंवा नारळाचं दूध घेऊन लावा. 15 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा.

 • Share this:
  नवी दिल्ली,04 ऑगस्ट : निरोगी राहण्यासाठी (To Stay Healthy) आहारात दुधाचा (Milk) समावेश केला जातोच पण, दुधाबरोबर नारळाचं दूधही आरोग्यासाठी चांगलं (Health Benefits Of Coconut Milk) आहे. नारळाचं दूध प्यायल्याने रोग प्रतिकारशक्ती (Boost Immunity) मजबूत होते,ज्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होतं. नारळाचं दूध मधुमेहाच्या रुग्णांसाठी(Diabetes Patient) खुप फायदेशीर आहे, वजन नियंत्रणात (Weight Control) राहतं. पाहुयात नारळाचं दूध पिण्याचे फायदे. मधुमेहात फायदा मधुमेहासारख्या आजारात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे लवकर आजार होतात. नारळाच्या दुधात अ‍ॅन्टीडायबेटीक गुण असतात. त्यामुळे डायबेटीज होण्याचा धोका कित्येक पटींनी कमी होतो. त्यामुळे आहारात नारळाच्या दुधाचा नक्कीच समावेश करा. (Stressमुळे मुलांमध्ये दिसतात ‘ही’ लक्षणं; Online अभ्यासामुळे होतोय वाईट परिणाम) लठ्ठपणा कमी करतं लठ्ठपणा कमी करायचा असेल तर, नारळाचं दूध प्या. यात खास प्रकारचं फॅटी अ‍ॅसिड असतं. ज्यामुळे वजन कमी होतं. लठ्ठपणाची भीती राहत नाही. तोंड येण्यावर औषधी पोटात बिघाड झाला असेल तर, तोंड येण्याचा त्रास होत राहतो. त्यामुळे तोंड येण्याचा त्रास कमी करण्यासाठी पोट साफ व्हायला हवं. यासाठी नारळाचं दूध प्यावं त्यामुळे अल्सर सारखा त्रासही कमी होतो. (डासांनीच काढणार मलेरियाचा काटा; मादी डासांना नपुसंक बनवून होणार आजाराचा खात्मा) व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव नारळाच्या दुधात अ‍ॅन्टीबॅक्टेरियल, अ‍ॅन्टीव्हायरल आणि अ‍ॅन्टीफंगल प्रॉपर्टीज असतात. यामुळे व्हायरल इन्फेक्शन कमी होतं. इम्युनिटी वाढून विविध प्रकरचे रोग दूर राहतात. (पॉर्न पाहण्यात विवाहित स्त्रियांना अधिक रस, अभ्यासातून झाला कारणांचाही खुलासा) त्वचा सॉफ्ट राहते कोकनट मिल्क त्वचेमध्ये ओलावा टिकवून वाढत्या वयाचा परिणाम कमी करतं. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या कमी येतात. नारळाच्या दुधात मॉइश्चरायजिंग गुण असतात.  त्यामुळे ड्राय त्वचेचा त्रास असेल तर, कमी होतो. त्वचा चमकदार होते.
  Published by:News18 Desk
  First published: