मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /ग्रीन टी पिऊन पिऊन कंटाळलात; वजन कमी करण्यासाठी आता प्या हा चहा

ग्रीन टी पिऊन पिऊन कंटाळलात; वजन कमी करण्यासाठी आता प्या हा चहा

अगदी घरीच मोजक्या साहित्यात तुम्ही हा चहा बनवू शकता.

अगदी घरीच मोजक्या साहित्यात तुम्ही हा चहा बनवू शकता.

अगदी घरीच मोजक्या साहित्यात तुम्ही हा चहा बनवू शकता.

    मुंबई, 05 सप्टेंबर : आजकाल लठ्ठपणा (Obesity) ही अनेकांना भेडसावणारी समस्या आहे. वाढत्या वजनामुळे आरोग्याच्या इतरही तक्रारी उद्भवतात त्यामुळे वजन कमी (Weight loss) करण्यासाठी लोक अनेक उपाय (Weight loss tips) करत असतात. यामध्ये व्यायामाबरोबरच आहारावरही (Weight loss food)  विशेष लक्ष दिलं जातं. वजन कमी करण्यासाठी अनेक जण ग्रीन टी (Green tea) पितात. पण दररोज ग्रीन टी पिऊनही कंटाळा येतोच. असाच कंटाळा तुम्हालाही आला असेल तर आता हा नवा चहा (Tea for Weight loss)  ट्राय करून पाहा. जो तुम्हाला अगदी घरच्या घरीच तयार करता येऊ शकतो.

    तुमच्या किचनमधील मसाल्यांचा वापर करून तुम्ही हा चहा बनवू शकता. अन्नपदार्थांची चव, गंध वाढवणारे भारतीय अनेक आजारांवरही उपयुक्त ठरत असल्याचे आपल्याला माहीत आहेच, पण आता वजन कमी करण्यातही ते उपयुक्त आहेत. आहारतज्ज्ञ सकाळी उठल्यावर जिरे किंवा दालचिनी घातलेले गरम पाणी तसंच काळ्या मिरीचा चहा पिण्याची शिफारस करतात.

    काळ्या मिरीचे फायदे

    काळ्या मिरीमध्ये (Black Pepper) अनेक खनिजं आणि अँटिऑक्सिडंट्स (Antioxidents) असतात. त्याचा आरोग्यासाठी चांगला फायदा होतो. काळ्या मिरीच्या विशिष्ट मसालेदार चवीमुळे चयापचयाचा वेग वाढतो. यामुळे कॅलरीज (Calories) अधिक वेगाने जाळल्या जातात.

    हे वाचा - Perfect Tea चं 'गणित'! 'या' फॉर्म्युल्याने चहा बनवाल तर कधीच बिघडणार नाही

    काळ्या मिरीत पिपेरिन नावाचा एक घटक असतो जो रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवतो. तसंच शरीरात साठलेली चरबी कमी करतो. यातील अँटी इन्फ्लेमेटरी (Anti Inflammatory) गुणधर्म शरीरातील घातक रॅडिकल्सशी लढतात. त्यामुळे काळी मिरी आरोग्याच्या समस्या दूर ठेवण्याबरोबरच वजन नियंत्रित करण्यासही उपयुक्त ठरते.

    कसा बनवाल काळ्या मिरीचा चहा

    वजन कमी करण्यासाठी काळी मिरी, आलं, मध आणि लिंबू यापासून बनवलेला चहा अत्यंत फायदेशीर ठरतो. हा चहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि याची प्रक्रियाही अगदी सोपी आहे.

    हे वाचा - ॲसिडिटी आणि करपट ढेकरांचा त्रास? डॉ. श्रीराम नेनेंनी सांगितला जालीम उपाय

    काळ्या मिरीचा चहा (Black Pepper Tea) बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात दोन कप पाणी घ्या. पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळलं की त्यात 1 टीस्पून काळी मिरी पावडर, 1 टीस्पून बारीक चिरलेलं आलं घाला. 3 ते 5 मिनिटं उकळून घ्या. नंतर हे मिश्रण गाळून घ्या. गाळून घेतलेल्या पाण्यात 1 टेबलस्पून मध, 1 टीस्पून लिंबाचा रस घाला. आता तुम्ही हा चहा पिऊ शकता.

    काळ्या मिरीच्या चहाचे फायदे

    थंडी, पाऊस या काळात होणारी सर्दी, खोकला यावरही हा चहा उपयुक्त ठरतो. तसंच दमा असलेल्या लोकांनाही याच्या सेवनाने आराम मिळतो. या चहानं मन शांत होतं. मूड सुधारण्यासही मदत होते. मात्र काळी मिरी उष्ण असल्याने या चहाचे सेवन योग्य प्रमाणात करणं आवश्यक आहे. जास्त प्रमाणात हा चहा पिण्याने अपयाही होऊ शकतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच आहारात याचा समावेश करणं योग्य आहे. आरोग्याच्या समस्या दूर करण्यासह वजन कमी करण्यात उपयुक्त ठरणारा हा काळ्या मिरीचा चहा योग्य प्रमाणात घ्या आणि वजनाची समस्या असेल तर ती दूर करा.

    सूचना - ही माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

    First published:

    Tags: Fitness, Health, Lifestyle, Weight loss, Weight loss tips