मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तोंडातील अल्सरकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते काही आजारांचे प्राथमिक लक्षण

तोंडातील अल्सरकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते काही आजारांचे प्राथमिक लक्षण

अनेकदा हार्मोनल चेंजेस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता, जीवनसत्त्वे बी आणि सीची कमतरता तसेच लोह आणि इतर पोषक तत्वांची कमतरता यामुळेसुद्धा तोंडात अल्सर होऊ शकते. मात्र त्यांच्यावर उपचारदेखील होऊ शकतात.

अनेकदा हार्मोनल चेंजेस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता, जीवनसत्त्वे बी आणि सीची कमतरता तसेच लोह आणि इतर पोषक तत्वांची कमतरता यामुळेसुद्धा तोंडात अल्सर होऊ शकते. मात्र त्यांच्यावर उपचारदेखील होऊ शकतात.

अनेकदा हार्मोनल चेंजेस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता, जीवनसत्त्वे बी आणि सीची कमतरता तसेच लोह आणि इतर पोषक तत्वांची कमतरता यामुळेसुद्धा तोंडात अल्सर होऊ शकते. मात्र त्यांच्यावर उपचारदेखील होऊ शकतात.

मुंबई, 5 जुलै : जास्त गोड खाल्ल्याने तोंडात फोडं येतात. कधी कधी पोट साफ नसले तरी हे फोड येतात. तुम्हालाही सारखा हा त्रास होतो का ? तोंडात अल्सर (Mouth Ulcer) किंवा फोड येण्याचे कारण प्रत्येक व्यक्तीनुसार वेहगवेगळे असते. माणसांच्या चुकीच्या सवयींमुळे (Bad Habits) किंवा चुकीचे पदार्थ खाल्यामुळे (Junk Food) तोंडात अल्सर होऊ शकतो. हे अनेकदा हार्मोनल चेंजेस, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता, जीवनसत्त्वे बी आणि सीची कमतरता तसेच लोह आणि इतर पोषक तत्वांची कमतरता यामुळेसुद्धा होऊ शकते. मात्र त्यांच्यावर उपचारदेखील होऊ शकतात. म्हणून हे धोकादाय मानले जात नाही. परंतु असे असले म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणेही योग्य नाही. कारण तोंडातील अल्सर अनेक आजारांचे प्राथमिक लक्षणदेखील (Primary Symptom Of Disease) असू शकते.

तोंडात अल्सर येण्याची कारणं यासोबतच आणखीही बरीच आहेत. जसे की, धूम्रपान, मसालेदार अन्न, जिभेच्या किंवा गालाच्या आतील त्वचेला दात चावला जाणे, तणाव, गर्भधारणा अशी अनेक कारणं असतात. बहुतेक वेळा तोंडातील अल्सर धोकादायक मानले जात नाहीत. परंतु काही गंभीर आजारांमध्ये तोंडातील अल्सर हे एक महत्त्वाचे लक्षण शकते. तोंडातील अल्सर अनेक आजचे संकेत देते. जसे की, मधुमेह, रोगप्रतिकारक विकार, आतड्याची जळजळ, बेहसेटचा आजार, एड्स (HIV).

Hair Care : केसांच्या प्रकारानुसार वापरा वेगवगेळे शॅम्पू, केस होतील सुंदर आणि मजबूत

तोंडातील अल्सर घालवण्यासाठी घरगुती उपाय (Mouth Ulcer Home Remedy)

कोरफड (Aloe Vera Benefits) त्वचेबरोबरच तोंडातील अल्सर घालवण्यासाठीही उपयुक्त ठरते. यासाठी अल्सरवर थोडासा नैसर्गिक कोरफडीचा रस लावा. कोरफडमध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म असतात त्यामुळे ते त्वरित आराम देण्यास मदत करते.

मधामध्ये (Honey Benefits) अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे नैसर्गिक इमोलियंट म्हणून काम करते. उपाय म्हणून मध वापरण्यासाठी, कापसाच्या मदतीने अल्सरवर थोडासा मध लावा आणि तुम्हाला फरक दिसेल.

अजूनही वेळ गेली नाही! तुमच्या आहारातील 'हे' 5 पदार्थ किडनी आतून सडवतील

हळद (Turmeric Benefits) तोंडाच्या अल्सरवर प्रभावी उपाय म्हणून काम करते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. पाण्यात अर्धा छोटा चमचा हळद घालून त्याची पेस्ट बनवा आणि नंतर अल्सरवर लावा. दोन मिनिटे राहू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Lifestyle, Mouth ulcer