मुंबई, 11 नोव्हेंबर: दिवाळी (Diwali 2020) अगदी काही तासांवर आली आहे. तुम्ही सर्वच जण फराळ, डेकोरेशन करण्याच्या तयारीत असाल. अशावेळी अनेकदा काही फराळाचे पदार्थ करण्यास कठीण वाटतात म्हणून ते कधीकधी आपण करतच नाही किंवा रेडिमेड घेऊन येतो. चकली देखील अशाच कठीण पदार्थांपैकी एक. पण तुम्हाला देखील चकली करणं कठीण वाटत असेल, तर हे व्हिडीओ पाहणं तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचं आहे. कारण चकलीशिवाय फराळ अपूर्णच असतो, नाही का? साधासोप्या टीप्स फॉलो करून तुम्ही देखील घरच्याघरी खमंग चकली बनवू शकता.
चकली बनवण्याची पद्धत अनेकांची वेगळी असली तरी दिवाळी फराळामध्ये तिचं महत्त्व सारखंच आहे. YouTube वर चकलीच्या बेस्ट पद्धतींचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. भाजणी कशी बनवायची, त्यासाठी प्रमाण काय असलं पाहिजे, चकलीच्या सोऱ्याचा (चकलीपात्र) वापर कसा करावा, कडबोळी कशी बनवावी यांसारखे अनेक व्हिडीओ Food Vloggers आणि युट्यूबवर पोस्ट केले आहेत. तुम्हाला असे 5 बेस्ट व्हिडीओ इथे पाहता येणार आहेत.
1. कशी बनवाल भाजणीची कुरकूरीत चकली
भाजणीची चकली बनवताना त्यात पाणी किती प्रमाणात मिसळावे त्याचबरोबर पीठ मळण्याआधी काय काय साहित्याचे मिश्रण करावे हे या व्हिडीओत सांगण्यात आले आहे.
2. चकली तेलात टाकल्यावर तुटू नये किंवा जास्त तेल लागू नये याकरता काय कराल? पाहा हा VIDEO
या व्हिडीओमध्ये चकली तेलात टाकल्यावर तुटू नये किंवा तळताना त्याकरता जास्त तेल लागू नये यासाठीची ट्रीक सांगण्यात आली आहे. यामध्ये चकलीसाठी उकड तयार करून मग पुढील प्रक्रिया केली आहे.
3. भाजणी नाही आहे तरी नो टेन्शन! बनवा गव्हाच्या पीठाची चकली
विशेषत: भारताबाहेर राहणाऱ्यांना भाजणी उपलब्ध होत नाही, किंवा जरी त्यांनी भाजणी बनवली तर ती दळून आणण्याची सुविधा मिळत नाही. अशावेळी गव्हाची चकली बनवणे सहज आणि सोपे ठरते. भाजणी बनवण्याची प्रक्रियाही तशी मोठी आहे. त्यामुळे कधी चकली खाविशी वाटली तरी देखील झटपट अशी गव्हाची चकली बनवणे सोपे आहे
>
4. अशी बनवा रवा चकली
खवय्यांना नवीन पदार्थ म्हटला की तो ट्राय केल्यावाचून राहवत नाही. रवा चकली तसा फारसा प्रचलित पदार्थ नाही आहे. त्यामुळे काहीतरी नवीन बनवायला आणि खायला मिळणार आहे असा विचार करून खवय्यांच्या तोंडाला नक्की पाणी सुचेल. इथे पाहा कशाप्रकारे सोप्या पद्धतीने बनवाल रवा चकली
5. मूगडाळीची खमंग चकली
भाजणी नसेल तर मैदा मूगडाळ चकली हा देखील चांगला पर्याय आहे. फराळ प्रेमी विशेषत: चकली प्रेमींसाठी ही रेसिपी बेस्ट आहे. पारंपरिक फराळ केल्याचा आणि भाजणी व्यतिरिक्त नवीन चकली खाल्ल्याचा दुहेरी आनंद या चकलीतून मिळेल
6. साऊथ इंडियन चकली किंवा मुरूक्कू
चकलीचा हा प्रकार भारताच्या दक्षिणेकडे आणि श्रीलंकेत प्रसिद्ध आहे. तुम्ही देखील अशाप्रकारची चकली बनवून तुमच्या महाराष्ट्रीयन दिवाळीला दाक्षिणात्य टच देऊ शकता.
विशेष म्हणजे या सर्व रेसिपिज तुम्ही घरच्याघरी आणि अत्यंत सोप्या पद्धतीने ट्राय करू शकता. युट्यूबवर अशा असंख्य साहित्य आणि कृती उपलब्ध आहेत पण त्यातील हे काही निवडक व्हिडीओ तुमची दिवाळी या चकल्यांप्रमाणेत खुसखूशीत बनेल.