जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Diwali Diya Decoration : घरीच तयार करा अशा हटके डिझाइनर पणत्या; बाजारात शोधूनही सापडणार नाहीत

Diwali Diya Decoration : घरीच तयार करा अशा हटके डिझाइनर पणत्या; बाजारात शोधूनही सापडणार नाहीत

Diwali Diya Decoration : घरीच तयार करा अशा हटके डिझाइनर पणत्या; बाजारात शोधूनही सापडणार नाहीत

सुंदर डेकोरेट केले दिवे सर्वांना आवडतात. मात्र बरेच महागदेखील असतात. अशावेळी आपण हे मातीचे दिवे घेऊन ते घरच्याघरी काही सोप्या वस्तूंच्या मदतीने डेकोरेट करू शकतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 ऑक्टोबर : दिवाळीची तयारी आता सर्वच घरांमध्ये सुरु झाली दिवाळीची साफसफाई, फराळाच्या पदार्थांची यादी, पाहुण्यांची यादी, कपडे दागिन्यांची खरेदी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दिवाळी त घरच्या सजावटीची तयारी, या सर्व गोष्टींमध्ये लोक व्यस्त आहेत. दिवाळीला गोष्ट आणखी एक खूप महत्वाची असते. ती म्हणजे पणत्या. दिवाळी हा दिव्यांचा असतो. अमावास्येच्या रात्री दिव्यांनी अंधकार दूर करावा अशी मान्यता आहे. दिवे या दिवसात सहज बाजारात उपलब्ध असतात. काही दिवे केले असतात. तर काही अगदी साधे केवळ मातीचे दिवे असतात. सुंदर डेकोरेट केले दिवे सर्वांना आवडतात. मात्र बरेच महागदेखील असतात. अशावेळी आपण हे मातीचे दिवे घेऊन ते घरच्याघरी काही सोप्या वस्तूंच्या मदतीने डेकोरेट करू शकतो. यामुळे तुमच्या घराच्या सजावटीत भर पडेल आणि मातीचे दिवे ज्यांच्याकडून खरेदी कराल अशा लोकांनाही आर्थिक आधार होईल.

Diwali 2022 : दिवाळीला कमी खर्चात घराची करा सुंदर सजावट, या आहेत काही सोप्या डेकोरेशन आयडिया

अशाप्रकारे सजवा पणत्या.. मातीचे कोणतेही दिवे सजावण्यापूर्वी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. जेव्हा आपण बाजारातून दिवे आणतो. तेव्हा ते एकत्र उन्हातून आपण खरेदी करतो आणि ते भट्टीमध्ये बनवलेले असतात. त्यामुळे दोव्यांना रंग देण्याअगोदर त्यांना काही सेकंदांसाठी वेळ पाण्यात भिजवून घ्या. यामुळे तुमचे दिवे रंग सोडणार नाहीत.

News18लोकमत
News18लोकमत

- वेगवेगळ्या आकाराच्या आणि डिझाईनच्या पणत्या घेऊन तुम्ही त्याला वेगवेगळ्या रंगानी सजवू शकता. डिझाइननुसार तुम्ही दिव्यांचा रंग निवडा आणि असल्यास त्यावर नक्षीकाम काम करा. युट्युबवरील या व्हिडीओवरून तुम्ही आयडिया घेऊ शकता.

- तुम्ही तांदळाच्या मदतीनेदेखील पणती सजवू शकता. यासाठी दोन अगदी सध्या पणत्या घ्या. त्यांना आपल्याला हवा तो रंग द्या. नंतर त्याच्या बाहेरील बाजूने तांदूळ चिकटवा. एका कार्डबोरचे छोटे गोलाकार स्टॅन्ड बनवून त्या पणत्या विरुद्ध पद्धतीने एकवार एक लावा. आणि पुन्हा त्या पणत्यांना हव्या रंगांनी आणि मोती किंवा स्टोनने सजवा.

- तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सुंदर पणती सजवू शकता. पानातील आधी एक रंग देऊन घ्या. त्यानंतर रंगांचे ठिपके देऊन पणतीवर डिझाईन तयार करा.

- लक्ष्मी पूजनासाठी छोट्या छोट्या पणत्या वापरल्या जातात. या पणत्या आपण सुंदर पद्धतीने सजवू शकता. पणत्यांना वेगवेगळे रंग द्या आणि पणत्यांप्रमाणेच छोट्या आणि नाजूक डिझाईन त्यावर बनवा.

- पणतीला पांढरा रंग देऊन त्यावर रंगीबेरंगी टिकल्या लावा. आणि इतर रंगांच्या मदतीने त्यावर छोटे छोटे ठिपके द्या. या पणत्या सध्या तरीही खूप सुंदर दिसतात.

यंदाच्या दिवाळीला या पद्धतीने पणत्यांचे डेकोरेशन नक्की तुमचे साधे साधे दिवेदेखील खूप सुंदर आणि आकर्षक दिसतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात