मुंबई, 20 ऑक्टोबर : दिवाळी म्हंटलं की कपड्यांची खरेदी ही आलीच. दिवाळीनिमित्त महिलांना कपडे खरेदीसाठी अनेक प्रकारचे पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मुंबईच्या सायनमधील गांधी मार्केट हे आशिया खंडातील कपड्यांच्या मोठ्या बाजारपेठेपैकी एक आहे. या मार्केटमध्ये
दिवाळी
ची खरेदी करण्यासाठी महिलांची सध्या मोठी गर्दी आहे. कोणत्या कपड्यांना मागणी? मसलीन मटेरियल, गरारा, पेपलीन असे कपड्यांचे प्रकार ट्रेंडमध्ये आहेत. दिवाळीनिमित्त मसलीन मटेरियलच्या कपड्यांना मागणी वाढली आहे. तसेच नायरा कट, कॉटन सलवार कुर्ती, जोर्जेट अश्या विविध कपडाच्या प्रकारातील कपडे डिस्प्ले करण्यात आले आहेत. काय आहे किंमत? गांधी मार्केटमध्ये कपडे खूप स्वस्त दरात मिळतात. या मार्केट बाहेरील शोरूम किंवा दुकानात गेल्यावर मिळणाऱ्या किमतीच्या अर्ध्या किमतीमध्ये इथं कपड्यांची विक्री होत असते. येथील अनेक दुकानदार कपडे स्वतःच डिझाईन करतात. त्यामुळे गांधी मार्केटमध्ये स्वस्त दरात कपडे उपलब्ध होतात. 500 पासून ते 10000 पर्यंत वेगवेगळ्या डिझाईनचे ड्रेस याठिकाणी उपलब्ध आहेत.
दिवाळीसाठी मुंबईच्या साडी मार्केटमध्ये काय आहे नवं? पाहा Video
गांधी मार्केटमध्ये हैदराबाद, सुरत, अहमदाबाद तसंच मुंबईतून कपडे येतात. विशेषत: डायमंड डिझाईनचे कपडे इथं मोठ्या प्रमाणात पाहयला मिळतात. या खरेदीसाठी अनेक सेलिब्रिटीही मार्केटला भेट देत असतात. शरारा, गरारा, प्लाझो, कुर्ती असे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे डायमंड डिझाईनमध्ये इथं खरेदी करता येतात. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे दुकानामध्ये अडकलेले कपडे स्वस्त दरात विकावे लागले. फॅशन गेल्यावर सहसा ते कपडे कुणी वापरत नाही.असं कपडे विक्रेता विकी अलग यांनी सांगितले. यावर्षी दिवाळीनिमित्त विशेष खरेदीसाठी मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरातून तसेच महाराष्ट्रातुन अनेक जण गांधी मार्केटमध्ये खरेदी करत आहेत. यावर्षी दिवाळीनिमित्त खूप वेगळं कलेक्शन इथं उपलब्ध आहे, अशी माहिती येथील विक्रेते सोनी सेतपाल यांनी दिली.
दिवाळीत दागिन्यांव्यतिरिक्त अशाप्रकारे करा सोन्यामध्ये गुंतवणूक, दरवर्षी मिळेल मोठा फायदा
गुगल मॅपवरून साभार
कुठे कराल खरेदी? गांधी मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, नामदेव कोळी मार्ग, सायन, मुंबई, 400022