जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Diwali 2022 : दिवाळीला लक्ष्मीपूजनावेळी `या` गोष्टी अजिबात नका विसरू; होईल लक्ष्मीमातेची कृपादृष्टी

Diwali 2022 : दिवाळीला लक्ष्मीपूजनावेळी `या` गोष्टी अजिबात नका विसरू; होईल लक्ष्मीमातेची कृपादृष्टी

Diwali 2022

Diwali 2022

दिवाळीच्या दिवशी प्रदोष काळात भगवान गणपतीसोबत लक्ष्मीची पूजा केली जाते. या संपूर्ण पूजाविधीत काही गोष्टींचा आवर्जून समावेश केल्यास लक्ष्मीमातेची कृपादृष्टी प्राप्त होते, असं जाणकार सांगतात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : दिवाळी हा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जातो. दिवाळीत लक्ष्मीपूजन केलं जातं. या पूजनामागे विशिष्ट असा हेतू असतो. जीवनात सुख-समृद्धी यावी यासाठी दिवाळीला लक्ष्मीपूजन केलं जातं. या दिवशी घरासोबतच दुकानं आणि कार्यालयांमध्ये लक्ष्मीमातेची विधिवत पूजा केली जाते. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीमातेची विधिवत पूजा करण्यासाठी काही गोष्टी आवश्यकता असते. या वस्तूंचा पूजाविधीत समावेश असेल तर लक्ष्मीची कृपादृष्टी लाभते, असं जाणकार सांगतात. या वस्तूंमध्ये प्रामुख्याने कवड्या, दिवा, मंगल कलश आदींचा समावेश असतो. `एनडीटीव्ही इंडिया`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. दिवाळीच्या शुभपर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. लक्ष्मीपूजन हा या पर्वातला महत्त्वाचा दिवस मानला जातो. यंदा सोमवारी (24 ऑक्टोबर) लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी लक्ष्मीमातेची विधिवत पूजा केली जाते. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीमाता एका ठराविक कालावधीत पृथ्वीवर भ्रमण करत असते, असं मानलं जातं. त्यामुळे तिच्या स्वागतासाठी या दिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन केलं जातं. दिवाळीच्या दिवशी प्रदोष काळात भगवान गणपतीसोबत लक्ष्मीची पूजा केली जाते. या संपूर्ण पूजाविधीत काही गोष्टींचा आवर्जून समावेश केल्यास लक्ष्मीमातेची कृपादृष्टी प्राप्त होते, असं जाणकार सांगतात. दिवाळीच्या दिवशी मंगल कलशाची विधिवत पूजा करावी, असं धर्मशास्त्रात सांगण्यात आलं आहे. या दिवशी पूजेच्या ठिकाणी जमिनीवर अष्टकोनी कमळ काढून त्यावर मंगल कलश ठेवून त्याची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनापूर्वी पितळ, तांबे, चांदी किंवा सोन्याचा कलश पाण्याने भरून त्यात आंब्याची डहाळी ठेवून त्यावर नारळ ठेवला जातो. कलशावर कुंकवाचं स्वस्तिक काढलं जातं. याशिवाय कलशावर एक धागा बांधला जातो. दिवाळीच्या दिवशी या पद्धतीने कलश ठेवल्यास लक्ष्मीमाता प्रसन्न होते, असं मानलं जातं. हेही वाचा - धनत्रयोदशीच्या दिवशी ‘या’ पदार्थांचं करा सेवन; होईल सौभाग्याची प्राप्ती लक्ष्मीमातेचं श्रीयंत्र धन-समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. श्रीयंत्र हे सर्वांत प्राचीन आणि लोकप्रिय आहे. दिवाळीच्या दिवशी श्रीयंत्राची विधिवत स्थापना करून त्याचं पूजन केल्यास लक्ष्मीमाता प्रसन्न होते, असं मानलं जातं. तांबं हा धातू सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. दिवाळीच्या दिवशी तांब्याच्या कलशात तांब्याची नाणी ठेवून त्याची पूजा करणं शुभ मानलं जातं. दिवाळीच्या दिवशी अशी पूजा केल्याने लक्ष्मीमाता प्रसन्न होते. दिवाळी हा दिव्यांचा सण. या दिवशी दिव्यांना विशेष महत्त्व असतं. या दिवशी माती आणि धातूचे दिवे लावले जातात. माती ही पंचतत्त्वांपैकी एक आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी मातीचा दिवा लावणं शुभ मानलं जातं. दिवाळीला लक्ष्मीमातेसमोर किमान एक चारमुखी दिवा लावावा. असं केल्यानं लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

    News18लोकमत
    News18लोकमत

    दिवाळीत कवड्यांना विशेष महत्त्व दिलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, कवडी हे लक्ष्मीमातेचं प्रतीक असतं. दिवाळीच्या दिवशी चांदीच्या नाण्यांसह कवड्यांची पूजा केली जाते. पूजा झाल्यानंतर कवड्या लाल वस्त्रात गुंडाळून तिजोरीत ठेवल्या जातात. यामुळे धनवृद्धी होते, सुख-समृद्धी वाढते असं मानलं जातं. दिवाळीला घराच्या दारासमोर, तुळशीसमोर रांगोळी काढणं शुभ मानलं जातं. समृद्धीसाठी दिवाळीला रांगोळी काढावी, असं जाणकार सांगतात. दिवाळीला लक्ष्मीमातेच्या पूजेकरिता कमळाच्या फुलाचा वापर करणं शुभ मानलं जातं. यासोबतच या दिवशी लक्ष्मीमातेला झेंडूची फुलंही अर्पण केली जातात. दिवाळी सणादरम्यान घराच्या सजावटीसाठी आणि लक्ष्मीमातेच्या कृपादृष्टीसाठी या फुलांचा वापर केला जातो. दिवाळीच्या दिवशी अर्थात लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीमातेला नैवेद्य म्हणून फळ, मिठाई आदी अर्पण केला जातो. याशिवाय बत्तासे, लाह्यादेखील लक्ष्मीला अर्पण केल्या जातात. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीमातेला या पदार्थांचा नैवेद्य दाखवणं शुभ मानलं जातं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात